पणजी, दि. १ (प्रतिनिधी): शिरगावात अलीकडेच खाण खात्यातर्फे ‘मेसर्स राजाराम बांदेकर खाण कंपनी’ च्या ‘लीझ’ कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या ‘लीझ’ करारात समावेश झालेल्या जमिनीत कोमुनिदादच्या मालकीची जमीन असल्याची तक्रार या गावातील काही ग्रामस्थांनी केल्याने त्याची गंभीर दखल महसूल खात्यातर्फे घेण्यात आली आहे. महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी याप्रकरणी खाण सचिवांना चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार, खाण खात्यातर्फे अलीकडेच शिरगावात एकूण ९६ हेक्टर जमिनीत खाण उद्योगासाठी ‘लीझ’ कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या ‘लीझ’ करारात खरोखरच कोमुनिदाद जमिनीचा समावेश आहे का व त्यासाठी खाण खात्याने किंवा सदर कंपनीने कोमुनिदाद किंवा महसूल खात्याकडून परवानगी घेतली आहे काय, याची चौकशी खाण सचिवांनी करावी, असे या आदेशात म्हटले आहे.
शिरगावातील या कोमुनिदाद जमिनीसंबंधी वाद सुरू असून काही ग्रामस्थांनी याप्रकरणी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. एकीकडे या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकार्यांमार्फत सुरू असतानाच आता खाण खात्याकडून जारी करण्यात आलेल्या ‘लीझ’ करारात या जमिनीचा समावेश असल्याने महसूल खात्याने हे चौकशीचे आदेश जारी केले आहेत, असे यावेळी जुझे फिलिप यांनी स्पष्ट केले.
Thursday, 2 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment