...संशयितांवर कारवाई नाही
...पोलिस अहवाल न्यायालयात
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): शिरसई कोमुनिदादमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याचा तपास सुरू असून कोमुनिदादचे खाते गोठवले असल्याची माहिती आज पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली. परंतु, पोलिसांनी अजूनही ज्या लोकांनी हा घोटाळा केला आहे, त्यांची खाती जप्त केलेली नसल्याची माहिती यावेळी याचिकादाराने दिली. गेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली, याचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
आज सदर प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले असता, पोलिसांनी आपल्या तपासाचा अहवाल सादर केला. कोमुनिदादची जुनी समिती आता नसून त्याचा ताबा प्रशासकाकडे आहे. त्यामुळे पोलिसांनी कोमुनिदादचेच खाते जप्त करण्याऐवजी ज्यांनी आर्थिक घोटाळा केला आहे, त्याचे खाते जप्त करायला हवे, अशी मुद्दा यावेळी मांडण्यात आला. तसेच त्यांनी कोणताच हिशेबही दिलेला नाही. त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडून वसून करून घेतले जावे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.
शिरसई कोमुनिदादमध्ये झालेल्या गैरप्रकारावरून आग्नेल डिसोझा, निशीकेत परब आणि पांडुरंग परब या तिघांकडून पैसे वसूल करून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
Wednesday, 2 December 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment