चेन्नई, दि. ८
‘क्रिकेटचे कॉकटेल’ अशी ओळख बनलेल्या इंडियन प्रिमियर लीग अर्थात ‘आयपीएल’ टी-२० क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी धमाकेदार, बॉलिवूड स्टाइल उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरुवात झाली. चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या एका रंगतदार सोहळ्यात, बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आयपीएलच्या चौथ्या हंगामाला सुरुवात झाल्याचे जाहीर केले. जगातील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा प्रथमच आयपीएलच्या संकल्पनेचे जनक ललित मोदी यांच्याशिवाय आयोजित होत आहे.
आयोजनातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोदी यांची कमिशनरपदावरून उचलबांगडी करून, बीसीसीआयने ही जबाबदारी चिरायू अमीन यांच्यावर सोपवली आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा एक मालक आणि चित्रपट अभिनेता शाहरुख खान याचा ‘परङ्गॉर्मन्स’ सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या दहाही संघांच्या कर्णधारांनी या सोहळ्यात क्रिकेट बॅनरवर स्वाक्षर्या केल्या. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकर आणि पुणे वॉरियर्सचा कर्णधार युवराज सिंग व्यासपीठावर आल्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अमीन यांच्या छोटेखानी प्रास्ताविकानंतर मनोहर यांचे भाषण झाले. मनोहर यांनी प्रथम भारतीय क्रिकेट संघाचे वर्ल्डकप विजयाबद्दल अभिनंदन केले. चौथ्या हंगामात नव्याने सामील झालेल्या कोची टस्कर्स, केरळ आणि पुणे वॉरियर्स या दोन संघांचे त्यांनी स्वागत केले. स्पर्धेतील पहिली लढत महेंद्रसिंग धोनीचे चेन्नई सुपरकिंग्ज आणि गौतम गंभीरचे कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झाली.
Saturday, 9 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment