‘फेमा’ व कस्टम कायद्याचे बाबूश मोन्सेरात यांनी मोठ्या प्रमाणात उल्लंघन केल्याचे कस्टम खाते सांगते. हा साधासुधा गुन्हा नसून ते ‘हवाला’कांडच आहे. हल्लीच हसन अली याला अशाच एका चलन तस्करी प्रकरणात पकडण्यात आले होते. आता ‘बाबूश अली’ला पकडण्यात आले आहे, असा हल्ला पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत चढवला.
मोन्सेरात यांना मुंबई कस्टमने ताब्यात घेतल्यापासून ते सोडेपर्यंत त्यांनी कुणाकुणाला फोन केले, त्यांना कुणाचे फोन आले व कस्टम अधिकार्यांना केंद्रातील कोणत्या महनीय व्यक्तीने फोनवरून आदेश दिले या सगळ्या प्रकाराची कसून चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. या प्रकरणी सुरू असलेला सारवासारवीचा प्रयत्न पाहता या प्रकरणात सरकारातील अन्य काही मंत्रीही गुंतले असल्याचा दाट संशय येतो आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बाबूश मोन्सेरात शॉपींगसाठी दुबईला पैसे घेऊन जात होते ते काय फ्रीज आणि टीव्ही घ्यायला, असा टोलाही त्यांनी लगावला.
Wednesday, 6 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment