Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 22 May 2009

कॅसिनोंसाठी नियामक मंडळाची गरज

गृहखाते अस्थायी समिती बैठकीची शिफारस

मडगाव, दि.२१ (प्रतिनिधी): गृहखात्याच्या अस्थायी समितीच्या आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत झालेल्या बैठकीत कॅसिनोंवर गंभीर चर्चा केली गेली व लोकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून सध्या अस्तित्वात असलेल्या कॅसिनोंवर नियंत्रण ठेवण्यासाठी व या व्यवसायाच्या नियमनासाठी एक नियामक मंडळ स्थापन करण्याची शिफारस केली गेली.
अशा मंडळाचा तपशील ठरविण्यासाठी आजच्या बैठकीने संबंधित कॅसिनोंना दिलेल्या परवान्यांची फाईल मागविण्याचा निर्णय घेतला. समितीचे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी सांगितले की त्यामुळे सरकारने नेमक्या किती कॅसिनोंना परवाने दिले ते तरी उघड होईल तसेच या कॅसिनोंव्दारा नेमका किती महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होतो ते उघड होईल.
सरकार आपण "ऑफ शोर कॅसिनों'ना परवाने दिल्याचा जो दावा करीत आहे तो तकलादू असल्याची टिप्पणी पर्रीकर यांनी केली व म्हटले की ऑफ शोर च्या व्याख्येत तलाव, सरोवर आदींही मोडतात व कॅसिनोवाले सध्या सरकारच्या कृतीला आव्हान देण्याची जी भाषा करीत आहेत ते पाहाता सरकारची बाजू कमजोर वाटते, यासाठी अशा नियमन मंडळाची गरज आहे. एका प्रश्र्नावर ते म्हणाले की आणखी कॅसिनो हवेत की नकोत हा मुद्दा नंतरचा, जे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणणे ही आजची खरी गरज आहे.

No comments: