Saturday, 1 January 2011
‘बाई मी दगूड फोडिते’ प्रथम
अकादमीची अ गट नाट्यस्पर्धा
‘तथागत’ द्वितीय तर ‘अशोकायन’ तृतीय
पणजी, दि. ३१ (सांस्कृतिक प्रतिनिधी)
कला अकादमीने आयोजित केलेल्या ४३ व्या ‘अ’ गट मराठी नाटयस्पर्धेतभार्गवी थिएटर्स, पर्वरी यांनी सादर केलेल्या ‘बाई मी दगूड फोडिते’ या नाटकास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धेत द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे वरदांबिका कलासंघ, फोंडा व श्री रुद्रेश्वर, पणजी या संस्थांनी सादर केलेल्या ‘तथागत’ व ‘अशोकायन’ या नाट्यप्रयोगांस मिळाले आहे. सदर स्पर्धा ही महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक कार्य संचालनालय, मुंबई यांचे गोवा केंद्र म्हणूनही ओळखली जाते. स्पर्धेत प्रथम आलेल्या नाटकाला मुंबईत होणार्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत सादरीकरणाची संधी मिळते. स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस विवेकानंद कला सादरीकरण मंच, केरी-सत्तरी यांच्या ‘वैराग्यमठ’ या नाटकास प्राप्त झाले.
जयेंद्रनाथ हळदणकर यांना दिग्दर्शनासाठीचे (बाई मी दगूड फोडिते) प्रथम पारितोषिक मिळाले. द्वितीय पारितोषिक आनंद मासूर यांना (तथागत), तर तृतीय पारितोषिक देविदास आमोणकर यांना (अशोकायन) प्राप्त झाले आहे. इतर पारितोषिके पुढीलप्रमाणे ः
वैयक्तीक अभिनय ः पुरूष गट ः प्रथम - प्रकाश साळकर (शकार ः प्राचीवरी ये भास्कर) द्वितीय - संजय मापारे (शंकर्या ः बाई मी दगूड फोडिते), सौरभ कारखानीस (दरवटकर - चौथा स्तंभ), दिलीप वझे (राधिक - अशोकायन), अजित कामत (कमांडर हेराक - तथागत), मंदार जोग (भन्नाट - संमूल्य), चंद्रकांत प्रियोळकर (मैत्रेय - प्राचिवरी...), तुकाराम गावस (लहान्या - बाई मी...) व पांडुरंग नाईक (शाणू - वैराग्यमठ) यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
स्त्री गट ः प्रथम सिद्धी उपाध्ये (समीरा अमीन - तथागत), द्वितीय माधुरी शेटकर (अचला - बाई मी...) प्रशस्तीपत्रकांसाठी स्नेहल गावकर (मृणाल, नटी- चौथा स्तंभ), ज्योती पांचाळ (पार्वती - बाई मी...), हेमा सिनारी (वसंतसेना - प्राचिवरी....), नेहा तेलंग (उज्वला - अशोकायन), मंजूषा आमशेकर (आस्मा जलाल - तथागत) व प्रतीक्षा कुडाळकर (नीला - संमूल्य) यांची निवड करण्यात आली.
नेपथ्यासाठी प्रसन्ना कामत (तथागत) तर प्रशस्तीपत्रासाठी राजा खेडेकर (बाई मी दगूड फोडिते), प्रकाशयोजना सुशांत नाईक (वैराग्यमठ) तर प्रशस्तिपत्रासाठी युवराज मंगेशकर (तथागत), वेशभूषा मनुजा अभिजीत लोकूर व गौरादेवी अंकुश शेट शिरोडकर (अशोकायन), प्रशस्तीपत्र अक्षका नाईक(बाई मी दगूड फोडिते), ध्वनिसंकलन उमेश नाईक (वैराग्यमठ) तर प्रशस्तिपत्र दीपक आमोणकर (अशोकायन), रंगभूषेचे पारितोषिक प्राचिवरी ये भास्कर नाटकासाठी सुरेश शिरोडकर यांना जाहीर झाले असून प्रशस्तीपत्रासाठी अशोकायन या नाटकासाठी एकनाथ नाईक यांची निवड झाली.
नाट्यलेखन प्रथम विष्णू सुर्या वाघ (वैराग्यमठ), द्वितीय प्रशांत म्हार्दोळकर (तथागत)
या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी रमेश कदम, विठ्ठल वाघ व डॉ. अजय वैद्य यांनी सांभाळली होती. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मागाहून जाहीर करण्यात येईल, असे अकादमीने कळविले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment