पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): पर्वरी पोलिस स्थानकावरील पोलिस उपनिरीक्षक दिनेश गडेकर हे सध्या पोलिस महासंचालकापेक्षा जास्त व्यस्त झाले असून कोणत्याही गुन्ह्यांविषयी माहिती विचारण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधल्यास नेहमी ते ‘बिझी’ असल्याचे सांगून दूरध्वनी बंद करतात. काल रात्री पर्वरी पोलिसांनी घरफोडी करणारी एका टोळीला ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेसह तीन पुरुषांना ताब्यात घेतल्याची माहिती हाती आल्याने याविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी पर्वरी पोलिस स्थानकात संपर्क साधण्यात आला होता. त्यावेळी या टोळीविषयीची सर्व माहिती उपनिरीक्षक गडेकर यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले. रात्री ७ वाजता श्री. गडेकर हे पोलिस स्थानकावर उपस्थित नसल्याने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. यावेळी त्यांना मोबाईल उचलला; पण आपण व्यस्त असून आता माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही उद्या दूरध्वनी करा, असे सांगून मोबाईल बंद केला.
आज पुन्हा त्यांच्याशी पर्वरी पोलिस स्थानकात संपर्क साधण्यात आला. आजही ते पोलिस स्थानकावर उपस्थित नसल्याने त्यांचा मोबाईल क्रमांक देण्यात आला. तेव्हा पुन्हा संपर्क साधला असता आपण व्यस्त असून माहिती देऊ शकत नाही, असे सांगून आजही त्यांनी गुन्हेगारांविषयी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ करणार्या हे अधिकारी गुन्ह्यागारांना पाठीशी घालीत आहे की, माहिती दडपण्याचा प्रयत्न करतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार काय, असा सवाल विचारला जात आहे.
Wednesday, 29 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment