पणजी, दि.२०(प्रतिनिधी)-राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक उद्या २१ रोजी होणार असून यावेळी विविध विषय चर्चेला येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. काणकोण येथील पूरग्रस्त भागातील पुनर्वसनाच्या कामाचा आढावा व मडगाव येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोट हे विषय प्रामुख्याने चर्चेला येणार आहेत. मडगाव स्फोटाची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना राजकीय पटलावर मात्र सत्ताधारी पक्षातील दोन मंत्र्यांत याविषयावरून कलगीतुरा सुरू असल्याचे बोलले जाते. या वादाचे पडसादही उद्याच्या बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या व्यतिरिक्त गोवा लोकसेवा आयोगाने निवडलेल्या ५२ शिक्षकांचा विषय, शॅक्समालकांनी सुरू केलेले आंदोलन, हाय सिक्युरिटी नंबरप्लेट आदी विषयही प्रामुख्याने चर्चिल जातील, असेही सूत्रांनी सांगितले.
Wednesday, 21 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment