पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - चार खून प्रकरणातील आरोपी चंद्रकांत तलवार याला एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा वरदहस्त होता. हाच चंद्रकांत पोलिसांनी माशेल दरोडा प्रकरणात हवा होता. परंतु, त्या पोलिस अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे तो मुक्त राहिला. त्यामुळेच चार खून करण्याचे धाडस केले असल्याची टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केली. काही महिन्यांपूर्वी माशेल येथे टाकलेल्या दरोडा प्रकरणात तलवार पोलिसांना हवा होता. त्यावेळी केवळ चंद्रकांत तलवार हा एकाच संशयित पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
दरोडा प्रकरणात "मानशीयो' याला मुंबईत अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्याकडे एक वादग्रस्त डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यात कोणत्या उपअधिक्षकाला आणि निरीक्षकाला किती पैसे देण्यात आले, याची नोंद ठेवण्यात आली होती. ही डायरी विधानसभेतही बरीच गाजली होती.
चिंबल गुन्हेगारांचे आश्रयस्थान...
चिंबल हा परिसर अनेक गुन्हेगारांचे आश्रय स्थान बनले असल्याची टाका यावेळी श्री. पर्रीकर यांनी केली. पोलिस याठिकाणी कॉंबिंग ऑपरेशन किंवा छापा टाकण्यासाठी गेल्यास लगेच त्यांना मागे फिरण्याचे आदेश दिले जातात. त्यामुळे या गुन्हेगारांचे फावले. या खून प्रकरणात आता चंद्रकांत गुन्हा अन्वेषण विभागाच्या हाती लागल्याने काही पोलिस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचेही ते म्हणाले.
Monday, 19 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment