Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 22 June 2009

लंकादहन

पाकिस्तान विश्वविजेता
लॉर्डस्, दि. २१ - वर्षभरापासून संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तान संघाने जिद्दीने खेळ करत लंडन येथील ऐतिहासिक लॉडर्‌स मैदानावर झालेल्या टी-२०- २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा सहज पराभव करत टी-२० विश्वचषकावर अखेर आपले नाव कोरले. श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु कर्णधार कुमार संगकारा याने घेतलेला हा निर्णय श्रीलंकन संघाला महागात पडला. संगकारा वगळता इतर फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळले. संगकाराने ५२ चेंडूत ६४ धावा ठोकल्या. त्याला अँजेलो मॅथ्यूजने चांगली साथ दिली. हे दोन खेळाडू वगळता श्रीलंकेचे इतर फलंदाज मैदानावर अधिककाळ टिकू शकले नाहीत. १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाक संघाने अत्यंत संयमी खेळ केला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कामरान अकमल आणि शाहझैब हसन याने अत्यंत संथ गतीने विकेट न गमावता फलंदाजीची सुरुवात केली. फटकेबाजी करण्याच्या नादात कामरान हा सनथ जयसूर्याच्या तर शाहझैब खान हा मुरलीच्या षटकात बाद झाला. यानंतर शाहीद अफ्रिदी(नाबाद ५४) आणि शोएब मलिक(नाबाद ३४) यांनी परिस्थितीनुसार खेळ करत १८.४ षटकांत पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

No comments: