पणजी, दि.२६ (सांस्कृतिक प्रतिनिधी) : चित्रपटाच्या माध्यमातून देशादेशांतील, जातिधर्मातील सीमा नष्ट करून माणसामाणसांतील प्रेम, शांती अबाधित राखण्याच्या उद्देशाने दक्षिण आशिया फाउन्डेशनने आयोजित केलेल्या चौथ्या आणि गोव्यात दुसऱ्यांदा दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाचा कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात तरुणाईच्या जोशात,मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री दिगंबर कामत ,कला अकादमीचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे, आयोजन समितीचे अध्यक्ष जितेंद्र देशप्रभु, दक्षिण आशियाई फाउन्डेशनचे सचिव राहुल बरुआ , मनोज श्रीवास्तव,अभिनेता कृणाल खेमू, अभिनेत्री फातीमा नाहुला जलसिंचन मंत्री फिलीप नेरी रोड्रीगीस, केंद्रीय राज्यमंत्री विल्सन पाला, पंकज पराशर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दक्षिण आशिया फाउन्डेशनने आयोजित केलेल्या या महोत्सवाला गोवा कला अकादमी, गोवा मनोरंजन संस्था ,गोवा सरकार व माहिती व प्रसारण मंत्रालय यांचा सहकार्य लाभला आहे. चित्रपट आणि संगीताला सिमा नसते.म्हणून अशा माध्यमातून दक्षिण आशियाई खंडातील सीमा नष्ट करून शांती आणि समृध्दीचा प्रसार करण सोपे आहे. यावेळी तरुण नवोदित संगीतकार जोशी साबरीव सरीब यांनी " जश्न 'या कार्यक्रमांतर्गत तरुणाईच्या जोशात एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून उद्घाटन सोहळ्याला रंग चढवला. त्यांना ध्यान सुमन अंजना गोस्वामी व शहाना दास या अभिनेता व अभिनेत्रीने साथ दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की विविध चित्रपट महोत्सवासाठी गोवा हे कायमस्वरूपी केंद्र होण्याच्या मार्गावर आहे तसेच गोव्यातील विविध पर्यटक स्थळे व निसर्ग गोव्यात चित्रपट महोत्सव होण्यास साहाय्यभूत ठरत असून या महोत्सवांचा गोव्यातील नवोदित कलाकारांना, निर्मात्यांना चांगलाच फायदा होईल. आज कुठल्याही व्यवसायापेक्षा चित्रपट व्यवसायात झटपट प्रसिद्धी पैसा मिळत असते, म्हणूनच तरुण पिढी त्याकडे लवकर आकर्षित होते. अशा व्यवसायात चालना देणे काळाची गरज आहे,असेही त्यांनी सांगितले. शेवटी ते म्हणाले की दक्षिण आशिया फाउन्डेशन दुसऱ्यांदा गोव्यात हा महोत्सव यशस्वीपणे करत असून त्याला तरुणवर्गाला जास्त वाव देत आहे म्हणूनच ते अभिनंदनास पात्र ठरतात. मनोज श्रीवास्तव यांनाही आपले विचार मांडले. प्रतापसिंह राणे यांनी दक्षिण आशिया फाउन्डेशच अभिनंदन केले. ते म्हणाले की दिवसेंदिवस गोवा हा चित्रपटनगरी बनत चालली असून काही दिवसांनी चित्रपट महोत्सवासाठी प्रमुख केंद्र होणार आहे, यात शंकाच नाही.दक्षिण आशिया फाउन्डेशनचे सचिव राहुल बरुआ यांनी उपस्थितांचे स्वागत करून निमंत्रण मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. त्यात अनूमल करीम -दिग्दर्शक बंगलादेश ,मोहन सुरी ऐहमल मुस्ताफ जमात अनिर भंडार , ध्यान सुमन ,अब्दुल फताप दिग्दर्शक मोल्डीस उगेत बांदी (भूतान) -हसन सिता, शहा आसिफ रेहमन, देवानु कुंडु शहाना गोस्वामी , अजंना सुखानी फरीद गुलाम तोशी साबरी सरीब साबरी पंकज पराशर यांचा सहभाग होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. आयोजन समितीचे अध्यक्ष जितेंद्र देशप्रभू यांनी आभार मानले. उद्घाटन समारंभानंतर युसुफ हा मालदिवच्या चित्रपट दाखविण्यात आला.
Saturday, 27 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment