अनेक मराठीजन गजाआड एन.डी.पाटील यांना अटक
बेळगाव, दि. १६ : कानडीकरणाचा छुपा उद्देश बाळगत बेळगावमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला असून या अधिवेशनाला विरोध करणाऱ्या अनेक मराठीजनांची धरपकड सुरू आहे. या आंदोलनाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनाही अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे आयोजित महामेळावा कर्नाटक पोलिसांनी उधळून लावला. महामेळाव्याला येणारे नेते व कार्यकर्ते यांच्यावर बेछूट लाठीमार करत पोलिसांनी सुमारे २०० जणांना अटक केली. उद्या दि. १७ रोजी हुतात्मा दिन असून पोलिसांनी यादिवशी जमावबंदीचे आदेश दिले आहे.
बेळगावात आजपासून कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. पण, या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. या विरोधात सारे मराठी एक आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. सध्या एकीकरण समितीतच मतभेद असून किरण ठाकूर गट आणि एन. डी. पाटील गट असे दोन गट पडले आहेत. पण, या अधिवेशनाविरोधात आम्ही एक असून हे अधिवेशन आणि या माध्यमातून होणारा कानडीकरणाचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा निर्धार दोन्ही गटांनी व्यक्त केला आहे.
कर्नाटक सरकारने बुधवारी एकीकरण समितीच्या पाच नेत्यांना अटक केली. एकीकरण समितीचा महामेळावा आणि १७ जानेवारी रोजी होणारा हुतात्मा दिनाचा कार्यक्रम होऊ नये, असा कानडी सरकारचा प्रयत्न आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू केली आहे. अनेक कार्यकर्ते भूमिगत असून काही कानडी नजरकैदेत आहेत. अधिवेशन परिसरात जमावबंदी लावण्यात आली असून कडक सुरक्षा व्यवस्थेत अधिवेशनाचे काम सुरू आहे.
Saturday, 17 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment