पणजी, दि. १५(प्रतिनिधी): 'सर्व शिक्षा अभियान' योजनेच्या यशस्वितेनंतर आता "राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान' राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गोवा सरकारने या योजनेची आखणी सुरू केली असून शिक्षण खात्याकडून त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली आहे.
शिक्षण खात्याच्या संचालक सेल्सा पिंटो यांनी "गोवादूत'कडे बोलताना ही माहिती दिली. राष्ट्रीय पातळीवर ९ वी ते १२ वी इयत्तेसाठी ही योजना राबवण्यात येणार असली तरी गोव्यात मात्र सुरुवातीस ९ वी व १० वी पातळीवर ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शिक्षा अभियानामार्फत प्राथमिक शाळांवर जसा भर देण्यात आला आहे तसाच भर आता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानामार्फत इयत्ता ९ वी व १० वीसाठी राबवण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या विविध सुविधा, अद्ययावत प्रयोगशाळा, मल्टी मीडियाचा शिक्षणासाठी वापर, संगणक प्रयोगशाळा तसेच या विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या इतर संबंधित अत्यावश्यक सेवा आदींची पूर्तता या योजनेमार्फत करण्यात येणार असल्याचे यावेळी श्रीमती पिंटो यांनी सांगितले.
या योजनेचा आराखडा तयार केल्यानंतर ही योजना सर्व शिक्षा अभियानाप्रमाणे वेगळा विभाग स्थापन करून राबवण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
Friday, 16 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment