आगोंद, दि. १४ ( वार्ताहर): खैरीमाळ माटवे खोला काणकोण येथे आज लागलेल्या भीषण आगीत कृष्णा नाईक यांचे घर, गोठा, व झोपडी जळून खाक झाली. त्यात जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. ही दुर्घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
नेहमीप्रमाणे कृष्णा नाईक यांची पत्नी मासे विक्री करण्यासाठी गेली होती. तसेच मुले शाळेत गेली होती. नाईक हे घराच्या मागील बाजूस असलेल्या झावळ्यांनी शाकारलेल्या स्वयंपाकघरातील चुलीत विस्तव करून पाणी आणण्यासाठी गेले. त्यावेळी दुपारी येणाऱ्या वाऱ्यामुळे आग लागली आणि ती वेगाने फैलावली. त्यामुळे केवळ अर्ध्या तासात घर, गोठा व झोपडी खाक झाली. स्थानिकांनी आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बाजूची चार घरे व झोपड्या बचावल्या. साहाय्यक उपनिरीक्षक गावकर यांनी ही माहिती दिली व त्यांनी स्थानिकांचे कौतुक केले. आगीची माहिती मिळताच तेथे अग्निशामक दल दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी दलाला चार बंब वापरावे लागले. घरातील फर्निचर, जीवनोपयोगी वस्तू, इतर सामान खाक झाले. घरमालक कृष्णा नाईक व सौ. आशा नाईक तसेच शाली नामदेव नाईक यांना या घटनेने धक्का बसल्याने त्यांना काणकोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काणकोणचे मामलेदार विनायक वळवईकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता, मामलेदार कचेरीतील कर्मचारी, पोलिस कर्मचारी रमेश वेळीप, साहाय्यक उपनिरीक्षक कमलाकर नाईक गावकर, यावेळी उपस्थित होते. अग्निशामक दलाच्या जवांनानी याकामी महत्त्वाची कामगिरी बजावली.
----------------------------------------
वेतनही आगीच्या भक्ष्यस्थानी
कृष्णा नाईक हे मच्छीमारी ट्रॉलर्सवर काम करून नुकतेच घरी आले होते. त्यांच्याकडील पाच ते सहा महिन्यांचे वेतन या आगीत खाक झाले. त्यामुळे या कुटुंबापुढे मोठाच पेच निर्माण झाला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment