Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 13 January 2009

ए. आर. रेहमान यांना "गोल्डन ग्लोब' पुरस्कार

पहिलेच भारतीय संगीतकार
संगीत क्षेत्रात इतिहासाची नोंद


न्यूयॉर्क, दि. १२ - देशातील आघाडीचे संगीतकार ए.आर.रेहमान यांनी "स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटाला दिलेल्या कर्णमधूर संगीतासाठी सोमवारी प्रतिष्ठेचा "गोल्डन ग्लोब' पुरस्कार जिंकून भारतीय संगीत क्षेत्रात इतिहासाची नोंद केली. असे यश मिळविणारे ते पहिलेच भारतीय आहेत, हे विशेष.
गुलजार लिखित गीत "जय हो...' चे संगीत देणाऱ्या रहमान यांनी सर्वोत्कृष्ट मूळ संगीत रचनेसाठी "गोल्डन ग्लोब' पुरस्कार जिंकला आहे.
चित्रपटात मुंबईतील एका दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीच्या गरीब ते धनाढ्य अशा प्रवासाचे वर्णन आहे. या "स्लमडॉग मिलेनियर'ने तीन विविध श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले. मूळ संगीतासाठी ए.आर.रहमान, सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्लेसाठी सिमन बोफोय, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाकरिता डॅनी बॉयल यांनी "गोल्डन ग्लोब' पुरस्कार मिळविला आहे.
हा पुरस्कार मिळेल असा मला विश्वास नव्हता. मी केवळ दर्जेदार संगीत देण्याचा प्रयत्न केला. या यशासाठी मी देवासोबतच डॅनी बॉयल, फॉक्स पिक्चर चेन्नई, मुंबईतील माझे संगीतकार सहकारी आणि कोट्यवधी भारतीय नागरिकांचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया आनंदीत रहमानने दिली.
"स्लमडॉग मिलेनियर' हा चित्रपट विकास स्वरूप यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित असून यात अभिनेता अनिल कपूर व इरफान खान यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रीकरण मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांमध्ये तसेच अन्य महत्त्वपूर्ण ठिकाणांवर झाले. २६ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांचे लक्ष्य बनलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरही या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.
"द रिडर' या हॉलिवुडपटातील भूमिकेसाठी "टायटॅनिक' फेम अभिनेत्री केट विन्सलेटने सर्वोत्कृष्ट सह-नायिका गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला. यापूर्वी पाचवेळी विन्सलेटला ऑस्करसाठी नामांकन मिळाले परंतु अद्याप तिच्या खात्यात हा पुरस्कार जमा झाला नाही. ६६ व्या वार्षिक गोल्डन ग्लोब पुरस्कार समारंभात ब्रूस स्प्रिंगस्टीनने दिलेल्या "द रेसलर'च्या शीर्षक गीताला सर्वोत्कृष्ट गीत पुरस्काराने गौरविण्यात आले.
एका वर्षापूर्वी हॉलिवूडमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे गोल्ड ग्लोब पुरस्कार समारंभ रद्द झाला होता. त्यामुळे यावेळी पूर्वीपेक्षाही दमदार व आकर्षक स्वरूपात पुरस्कार समारंभाचे सादरीकरण होईल असे आश्वासन आयोजकांनी दिले होते. त्यानुसार शब्द पाळला. कारण ऑस्करनंतर अमेरिकेतील गोल्डन ग्लोब हा दुसरा सर्वात मोठा हॉलिवूड समारंभ आहे. समारंभात भारताचा प्रतिनिधी म्हणून शाहरूख खान उपस्थित होता. त्याने स्लमडॉगची अभिनेत्री फीडा पिंटोसह विदेशी प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल माहिती दिली.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys