एका मृतदेहावर तारांचे ‘सर्किट’
नवी दिल्ली, दि. १४ : ‘‘मुंबई बॉम्बस्ङ्गोट मालिकेत आत्मघाती हल्लेखोर असण्याची शक्यता नाकारली जाऊ शकणार नाही. सरकार या विषयीची शक्यता ङ्गेटाळत नाही. स्ङ्गोटमालिकेमागे ‘इंडियन मुजाहिद्दीन’ ही दहशतवादी संघटना असू शकते. या संघटनेवर संशय आहे. काही काळापूर्वी ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या काही अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. त्यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे,’’ असे महत्त्वपूर्ण मत केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी आज व्यक्त केले.
‘‘मुंबईत झालेल्या स्ङ्गोटांच्या तीनपैकी एका स्थळावर सापडलेल्या मृतदेहाच्या अंगावर तारांचे सर्किट गुंडाळलेले आढळून आले, या विषयीची माहिती ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’च्या (एनएसजी) महासंचालकांनी दिलेली आहे. त्यामुळे हे आत्मघाती हल्ले असण्याची शक्यता आम्ही ङ्गेटाळत नाही,’’ असे सिंह यांनी म्हटले. ते पत्रकारांशी बोलत होते.
‘‘आता या क्षणी मुंबईतील स्ङ्गोटमालिकेमागे सीमेपलीकडील घातपाती तत्त्वांचा हात असल्याची पार्श्वभूमी नाही. एका मृतदेहाला तारांचे सर्किट गुंडाळलेले आढळल्याने आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही,’’ असेही सिंह यांनी स्पष्ट केले. स्ङ्गोट कसे झालेत, त्यात कोणता पदार्थ वापरला गेला? कोणते लोक या घातपातामागे आहेत, याविषयीची चौकशी वेगाने केली जात आहे, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
Friday, 15 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment