वॉशिंग्टन, दि. १० - मूळची भारतीय असलेली परंतु अमेरिकेत स्थायी झालेली अवकाश यात्री सुनीता विलियम्स पुन्हा एकदा म्हणजे जून २०१२ मध्ये अवकाश यात्रेवर जाणार आहे.
अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा, सहयोगी रशियन अवकाश संस्था तसेच जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजंसी यांनी यासंदर्भात माहिती दिली की, अंतराळातील अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या सोयुझ ३१ उड्डाणात रशियन अवकाशवीर युरी मालेनचेंको व जपानी अवकाशवीर अकिहितो होशिदे सोबत सुनीता विलियम्स जाणार आहे.
महिला अवकाशवीर म्हणून विलियम्सला १९५ दिवसांचा अनुभव आहे. सुनीता विलियम्सचे आईवडील गुजराती आहेत. तिचा जन्म ओहिओ प्रांतातील युक्लिड येथे झाला. यासंदर्भात माहिती देताना नासाने सांगितले की, विलियम्स ऑक्टोबर २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राची स्टेशन कमांडर बनेल. याआधी जून १९९८ मध्ये सुनीताने आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात फ्लाईट इंजिनिअर म्हणून काम केलेले आहे. नऊ डिसंेंबर २००६ मध्ये एसटीएस-११६ पथकातील एक सदस्य म्हणून ती अवकाशात गेली होती.
Sunday, 11 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment