Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 11 July 2010

गोव्यात पर्यावरणाचा विद्ध्वंस

पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांची चिंता

भोपाळ, दि. १० - गोव्यात विकासाच्या नावावर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे, असे जाहीर विधान काल केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी केले आहे. या सुंदर प्रदेशाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी वनीकरण कार्यक्रम राबवण्याची नितांत गरजही त्यांनी यावेळी प्रतिपादिली.भोपाळ येथे एका बिगर सरकारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
विकास व पर्यावरण यांचा समतोल राखणे हे खरोखरच देशासमोरील मोठे आव्हान आहे. आपण महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना नेहमीच आडकाठी आणतो, अशी सर्रास टीका आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडून होते आहे. या पार्श्वभूमीवर श्री. रमेश यांनी वरील विधान करून आपली भूमिका स्पष्ट केली.
विकास प्रकल्पांसंदर्भात आपली "रावण' म्हणूनच संभावना केली जाते. पर्यावरण व वनमंत्रालय म्हणजे विकास प्रकल्पांचा शत्रू असेही मानले जाते. आपण कोणत्याही विकास प्रकल्पांच्या विरोधात नाही.विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे; परंतु पर्यावरणाची किंमत मोजून आपण विकासाला अनन्यसाधारण महत्त्व देत राहिलो तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

No comments: