पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाने "स्टॅंप ड्युटी'व्दारे सरकारला मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध ठिकाणांचे दर अधिसूचित करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, त्यामुळे खरोखरच सरकारचे उत्पन्न वाढेल की घटेल यावर मतभिन्नता दिसून येते. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही सरकारच्या या निर्णयाबाबत शंका व्यक्त केली आहे. यापुढे सरकारला भूसंपादन करावयाचे झाल्यास अधिसूचित दरांप्रमाणेच पैसे देणे भाग पडणार असल्याने या निर्णयाचा व्यापक विचार होणे गरजेचे होते,असेही ते म्हणाले.
सरकारने अधिसूचित केलेल्या दरांप्रमाणे सासष्टी, तिसवाडी व मुरगाव आदी काही तालुक्यांतील शहरी भागांचे दर सर्वांत जास्त अर्थांत २५०० हजार रुपये प्रतिचौरसमीटर निश्चित केले आहेत. सरकारने नमूद केल्याप्रमाणे जमिनीसंबंधी असलेल्या वादावर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी आणि १ लाख चौरस मीटरपेक्षा अधिक असलेल्या जागेसंबंधीचे दर विशेष समिती ठरवणार असल्याचेही या अधिसूचनेद्वारे कळवण्यात आले आहे. या अधिसूचनेप्रमाणे जमिनीचे दर किमान ५ रुपये प्रति चौरस मीटर असतील, असा निर्णयही घेण्यात आला आहे.
तालुकानिहाय निश्चित झालेले दर खालीलप्रमाणेः तिसवाडीः (विकासात्मक विभाग) पणजी (भाग-१)-२५०० चौ.मी., ताळगाव-२००० चौ.मी., पणजी (भाग-२)-१५०० चौ.मी., बांबोळी,चिंबल-५०० चौ. मी.. बार्देश- म्हापसा शहर (भाग-१)-१५००चौ.मी., गिरी,पर्रा,सालय,पिळर्ण,थिवी-५००, म्हापसा (भाग-२)-१००० चौ.मी., सांगोल्डा,मयडे,आसगाव-३०० चौ.मी., हळदोणा-४०० व शिवोली-५०० चौ.मी., हणजूण-६०० चौ.मी., कळंगुट,कांदोळी-१००० चौ.मी. व नेरूल-७००चौ.मी.
पेडणे-पालिका विभाग-५००चौ. मी., तुये,धारगळ-२५०चौ. मी., पार्से,विर्नोडा-१०० चौ.मी., पोरस्कडे-२०० चौ.मी., आगरवाडा-१५० चौ.मी., कोरगांव-१००चौ.मी. व मोपा-६० चौ.मी.
डिचोली-पालिका विभाग-५०० चौ.मी., मुळगाव,साखळी,म्हावळिंगे-३०० चौ.मी., हरवळे,कारापुर-२००चौ.मी. आमोणे-१५० चौ.मी., मये-१००चौ.मी., कुडणे,नावेली,पाळी,शिरगाव-१५०चौ.मी., अडवलपाल,विर्डी- १०० चौ.मी.
सत्तरी- वाळपई पालिका विभाग-१०० चौ.मी., होंडा-१५० चौ.मी., नाणूस-१००चौ.मी., सालेली-४०चौ.मी., सुर्ला-२५चौ.मी., सोनाळ,आंबेडे,भुयपाल,मासोर्डे-५०चौ.मी., पर्ये,भिर्रोडा,झर्मे,वेळगे-३५ चौ.मी.. फोंडा-फोंडा (भाग-१)१५००चौ.मी., बांदोडे,उसगाव,कुंडई-३००चौ.मी., शिरोडा,बोरी.बेतोडा,कुर्टी व मडकई-२००चौ.मी., फोंडा(भाग-२)-१०००चौ.मी., भोमा, खांडेपार, दुर्भाट, प्रियोळ, तिवरे, वाघुर्मे, खांडोळा-१५०चौ.मी., पंचवाडी, सावईवेरे-१००चौ.मी.
सासष्टी- मडगाव (भाग-१)-२५००चौ.मी.,(भाग-२)-२०००चौ.मी.,(भाग-३)-१५०० चौ.मी.,नावेली, आकें, दवर्ली व नुवे-८०० चौ.मी., कोलवा-८००चौ.मी., बेतालभाटी-७००चौ.मी., माजोर्डे-६००चौ.मि, बाणावली-५००चौ.मी.,कासावली व वार्का-४००चौ.मी.,बाणावली-३००चौ.मी.,चिंचणी,दिकरपाल,राय,राशेल-२५०चौ.मी.,चांदर,लोटली,आंबेली-२००चौ.मी.,उतोर्डा-४००चौ.मी.,सां जुझे दी आरियल,शेरावली-५००चौ.मी.
मुरगाव-वास्को(भाग-१)२५००चौ.मी.,वास्को(भाग-२)-२०००चौ.मी.,वास्को(भाग-३)-१५००चौ.मी.,चिखली,दाबोळ-१००० चौ.मि, सांकवाळ-७५०चौ.मी., कुठ्ठाळी-६००चौ.मी., आरोशी,कासावली, वेळसाव,पाळे-३००चौ.मी.,केळशी-२००चौ.मी.,सेंट जासिंतो जुवें-३००चौ.मी.
केपे-केपे व कुडचडे शहर-४००चौ.मी., काकोडे पालिका विभाग-३५०चौ.मी., शेल्डे,शिरवई-१५०चौ.मी., कुसमणे,आमोणे-२००चौ.मी., फातर्फे-१००चौ.मी., किटल, नाकेरी-१५०चौ.मी.,आसोल्डा,आवडे-७५चौ.मी., बाळ्ळी,बेंदोडे,बार्शे,मोरपिर्ल-२५चौ.मी..
काणकोण- शहरी भाग-३००चौ.मी., नगर्से,पाळोळे-३०० चौ.मी., पैंगीण-२५०चौ.मी., आगोंद,खोल-२०० चौ.मी.,लोलये-२००चौ.मी.,कोणकोण-७५चौ.मी.,गावडोंगरी-५०चौ.मी.,खोतीगाव-३०चौ.मी. सांगे- पालिका विभाग-३००चौ.मी., सावर्डे, धारबांदोडा-२००चौ.मी., कुळे,मोले-१५० चौ.मी.,उगे-१००चौ.मी.,कष्टी-७५चौ.मि,कुर्टी,भोमा-४०चौ.मी. असे दर निश्चित झाले आहेत.
Sunday, 28 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment