पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): ड्रग्ज व्यवहारात गुंतल्याने आधीच विश्वासार्हता गमावून बसलेल्या गोवा पोलिसांचा आता बनावट नोटा पुरवण्याच्या व्यवहारातही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. कॅसिनोंत बनावट नोटा खपवण्याच्या इराद्यात असलेली एक टोळी कळंगुट पोलिसांच्या तावडीत सापडली असता त्यांनी चौकशीवेळी या नोटा वास्को पोलिस स्थानकातील एका अधिकार्याने आपल्याला पुरवल्या, असा खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे.
कळंगुट येथील कॅसिनोत ५०० रुपयांच्या बनावट नोटा (सुमारे दोन लाखांच्या) खपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या वास्को व सावंतवाडी येथील तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. सुदेश गौड (सावंतवाडी), हेमंत चोडणकर (बायणा, वास्को) व आदित्य यादव (मंगोरहील, वास्को) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांची चौकशी केली असता, त्यांनी वास्को येथील एका पोलिस अधिकार्याकडून या बनावट नोटा आपण मिळवल्याचे जबानीत सांगितल्याची माहिती समोर आली आहे. आज (दि. २८) मध्यरात्री कळंगुट पोलिसांच्या एका पथकाने या बनावट नोटांप्रकरणी सदर पोलिस अधिकार्याची चौकशी केली असता आरोपींच्या जबानीत तथ्य असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, ‘त्या’ पोलिस अधिकार्याचे नाव जाणून घेण्यासाठी कळंगुट पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.
Friday, 29 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment