Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 4 July 2010

दोन हजार यात्रेकरूंचा जत्था अमरनाथकडे रवाना

जम्मू, दि. ३ कडक सुरक्षा बंदोबस्तात आज येथून २०८८ यात्रेकरूंचा एक जत्था दक्षिण काश्मीरच्या हिमालय पर्वतराजीत स्थित असलेल्या पवित्र अमरनाथ गुफेकडे रवाना झाला.
या जत्थ्यात १४१७ पुरुष, ३९३ महिला, ७४ लहान मुले आणि २०४ साधूंचा समावेश होता. हे सारे जण जम्मूस्थित असलेल्या भगवती नगर यात्री भवन या बेस कॅम्पवरून ८५ वाहनांनी पहाटे पाचच्या सुमारास रवाना झाले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या यात्रेकरूंच्या जत्थ्यात सीआरपीएफ, स्थानिक पोलिस आणि आयटीबीपी आदी सुरक्षा पथकांचाही समावेश होता. ही यात्रा सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत २५,५०० यात्रेकरूंनी पवित्र गुफेत जाऊन बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले असल्याची माहिती श्री अमरनाथ देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मार्गात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रा सध्या शांततेत सुरू आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तारा चंद यांनी सांगितले.
२५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी आतापर्यंत संपूर्ण देशातून सुमारे तीन लाख भाविकांनी आपल्या नावांची नोंदणी केली आहे.

No comments: