उत्तरांचलच्या युवकाला अटक
पेडणे, दि. २७ (प्रतिनिधी) - पेडणे पोलिसांनी आज (२७ रोजी) सकाळी ९.३० च्या सुमारास मालपे - पेडणे येथे एका हॉटेलजवळ उत्तरांचल येथील दीपककुमार नरेंद्रकु मार सुनारी (वय २७) या युवकाकडून १४ किलो २०० ग्रॅम चरस जप्त केला. त्याची बाजारातील किमंत १५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले.
पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार एक नेपाळी युवक आठ ते साडेनऊच्या दरम्यान मालपे भागातील एका हॉटेलात चरस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक अजित उमर्ये, उपनिरीक्षक दत्ताराम राऊत, हवालदार लाडू शेटये, लवू राऊळ, दीपक कुडव, सतीश नाईक, प्रेमनाथ सावळ देसाई आदी पोलिसांचे पथक हॉटेल परिसरात दबा धरून होते.
सकाळी ९.३० च्या दरम्यान एक २६ वर्षीय युवक बॅग पाठीवर मारून येत असताना पोलिसांना दृष्टीस पडला आणि दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता बॅगवर भाजीपाला, द्राक्षे तर खाली ब्राऊन रंगाची चिकटपट्टी लावून आत चरसची २६ पाकीटे आढळली.
त्यानंतर सुनारी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.
उपनिरीक्षक उमर्ये व प्रेमनाथ सावळ देसाई हे दोघेजण २४ तास ड्युटी केली होती. त्यानंतर सकाळी थोडी डुलकी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हाच त्यांना चरस घेऊन एक व्यक्ती येणार अशी माहिती मिळाली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मोठे घबाड पकडले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पेडणे पोलिसांनी या दोन महिन्यांतील चरस पकडण्याच्या प्रकरणांतील १४ किलो चरस हे घबाड मोठे आहे. पोलिसांची कामगिरी लक्षात घेऊन सकाळी पोलिस उपअधीक्षक सॅमी तावारीस यांनी पेडणे पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिसांच्या कमगिरीचे कौतुक केले.
तावारीस यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना मादक पदार्थांविरोधात यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली. किनारी भागात येणारे विदेशी पर्यटक हेच चरसचे ग्राहक असतात. त्यामुळेच राज्यात चरस मोठ्या प्रमाणात येणार चोरट्या मार्गाने येतो असा दावा करून यावर पोलिस पूर्णपणे नियंत्रण मिळवणार आहेत, असे तावारीस यांनी सांगितले.
निरीक्षक राऊत देसाई यांनी सांगितले, अमली पदार्थविषयक या वर्षात पाच प्रकरणे नोंद करून संशयितांना अटक करण्यात आली. यापूर्वी २० जानेवारी २०१० रोजी हरमल येथे एक किलो चरस जप्त करण्यात आला होता.
Sunday, 28 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment