Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 29 August 2009

वाहतूक खात्याचा वाहतूकदारांना इशारा

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : बस मालक संघटनेने पुकारलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी एस्मा कायदा लागू केलेला असतानाच वाहतूक खात्याने या संपात सहभागी होणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा एका नोटिशीद्वारे दिला आहे.
सार्वजनिक वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असून अशा वाहतूकदारांना संपावर जाण्यास कायद्यानुसार बंदी आहे. त्यासाठी कायम तसेच तात्पुरत्या वाहतूक परवानाधारकांनी दि. ३१ ऑगस्ट रोजी उत्तर गोवा बस मालक संघटनेच्या आंदोलनात सहभागी न होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मालवाहतुकीचा तात्पुरता परवाना असलेल्या वाहन मालकांनीही संपात सहभागी होऊ नये. या संपामध्ये सहभागी झाल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

No comments: