"आयएसआय'चा गौप्यस्फोट
इस्लामाबाद, दि. २७ - पाकिस्तानातील अनेक राजकीय पक्षांना, तसेच राजकीय नेत्यांना पैसे वाटल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानातील गुप्तचर संघटना "आयएसआय'ने आज न्यायालयात केला. या राजकीय नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान नवाज शरीफ, गुलाम मुस्तफा जटोई, जफरुल्ला जमाली आणि महम्मद खान जुनेजो यांची नावे समोर आली आहेत.
हे पैसे प्रत्यक्ष माजी पंतप्रधानांना देण्यात आले नसले तरी, त्यांच्या पक्षाशी संबंधित लोकांना दिले गेले आहेत, असेही जाहीर करण्यात आले. या वृत्ताचा गौप्यस्फोट पाकिस्तानचे माजी न्यायाधीश सईदुज जमन सिद्दिकी यांनी केला आहे. या संदर्भातील खटला १९९९ सालापासून रखडला होता. आयएसआय प्रमुख लेफ्ट. जन. असद दुर्राणी यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळेच ही बाब उघडकीस आली आहे.
दुर्राणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक रहस्य उलगडली आहेत, असे वृत्त डेली टाईम्सने प्रसिद्ध केले आहे. दुर्राणी यांच्या मुलाखतीतील वक्तव्यानुसार माजी अध्यक्ष गुलाम ईशाक खान यांच्या कारकीर्दीत अनेक राजकीय नेत्यांना इस्लामिक जम्हुरी इत्तेहाद या पक्षात येण्यासाठी करोडो रुपये वाटण्यात आले होते. तेव्हा या पक्षाचे प्रमुख गुलाम मुस्तफा जतोई होते. पाकिस्तान पीपल्स पार्टीला निवडणुकीत शह देण्यासाठी १९८८ साली या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. स्वत: खान यांना मात्र आयएसआयने कोणत्याही राजकीय पक्षाशी साटेलोटे करणे अजीबात मान्य नव्हते. परंतु, हा संपूर्ण व्यवहार दुर्राणी यांच्या म्हणण्यानुसार सरकारच्या संमतीनेच झाला होता. पैसे ठेवण्यासाठी कराची, रावळपिंडी, क्वेट्टा येथे अनेक खाती उघडण्यात आली होती आणि या व्यवहारात १.४ अब्ज रुपयांची देवाणघेवाण झाली होती.
Friday, 28 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment