"हिंदू जनजागृती'कडून तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रस्तावनेतच ६७ चुका
'भारत आणि समकालीन जग' असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. त्याच्या सुरुवातीलाच गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष एल. एम. टी फर्नांडिस यांची प्रस्तावना छापण्यात आली आहे. या प्रस्तावनेतच ६७ चुका आहेत. हे पूर्ण पुस्तकच विषयाला सोडून असून त्यामध्ये प्रतिज्ञेचा पत्ताच नाही. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा उल्लेख एकेरी करण्यात आला आहे.
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): गोवा शालान्त मंडळाने दहावीच्या परीक्षेला केवळ ४४ दिवस बाकी असताना अनेक चुकांचे आगर असलेले "भारत आणि समकालीन जग' हे इतिहासाचे मराठीतील पुस्तक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची भयानक कोंडी केली आहे. या पुस्तकाविरोधात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज हिंदू जनजागृतीचे पश्चिम विभाग प्रचार प्रमुख रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेला दिलीप बेतकीकर, शिवसेनेचे गोवा प्रमुख उपेंद्र गावकर, "मराप्रस'चे अध्यक्ष रमेश नाईक, व स्वतंत्र सैनिक शामसुंदर नागवेकर उपस्थित होते. यावेळी शिवसेनेने आपला या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
हे "भयावह' पुस्तक २४ मार्चपर्यंत मागे न घेतल्यास पुस्तकाची होळी करण्याचा इशारा देण्यात आला. पुस्तकाच्या प्रत्येक पानावर चुकीचा इतिहास व मुलांना संभ्रमात पाडणारे धडे आहेत. त्याच्या पुराव्यासह एक निवेदन आज मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री दिगंबर कामत यांना सादर करण्यात आले. सरकारने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या दहावीचे पुस्तकच चुकीचे असल्याने मुलांनी अभ्यास कसा करावा,असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. पदवीधरांनाही या पुस्तकाचे आकलन होणे महाकठीण आहे. ते मराठीत आहे, की हिंदीत हेही कळणे मुश्किल असल्याचे शिंदे म्हणाले. पुस्तकातील अनेक परिच्छेदांचा अर्थच लागत नाही. पुस्तकात महात्मा गांधींचा उल्लेख एकेरी म्हणजे " गांधीचे, गांधीला, गांधीने असा करण्यात आला आहे. धड्यांचे मुख्य मथळेही चुकीचे देण्यात आले आहेत. ज्या पुस्तकातील मजकूर पदवीधरांनाही नीटपणे समजू शकत नाही, तो दहावीच्या विद्यार्थ्यांना कसा समजणार आणि त्यावर ते विद्यार्थी परीक्षेत कसे लिहिणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्रातील अनुसूचित जाती जमाती आयोगाने १८ जानेवारी ०८ रोजी "दलित' हा शब्द घटनाविरोधी असल्याने, कोणत्याही राज्य सरकारने शासकीय कागदपत्रांत "दलित' शब्द वापरू नये, असा आदेश काढलेला आहे. मात्र असे असताना या पुस्तकात "दलित' शब्दाचा अमर्याद वापर करण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी धूम्रपानाच्या विरोधात कडक भूमिका घेऊन सिनेअभिनेत्यांना चित्रपटात धूम्रपान न करण्याची विनंती केली आहे. तथापि, या पुस्तकातील एका छायाचित्रात जनरल हेन्री नवार्रे यांना धूम्रपान करताना दाखवले आहे. तसेच हे "पुस्तक कसे वापरावे' यासंबंधीची माहिती "हाऊ टू युज धिस बुक' या नावाखाली पूर्णपणे इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे. पुस्तकात जागोजागी इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Thursday, 20 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment