Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 19 October 2008

जेनिफर मोन्सेरातनाही सहआरोपी करून घ्या, 'त्या' पीडित मुलीच्या आईचे पोलिसांना पत्र

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): रोहित मोन्सेरात याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत जेनिफर मोन्सेरात यांनाही सहआरोपी करून घेण्याची मागणी आज "त्या' पीडित मुलीच्या आईने केली. तिने उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना तशा मागणीचे लिहिले आहे. रोहितच्याविरोधात आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर जेनिफर, शारदा मंदिरची एक शिक्षिका व अन्य एक व्यक्ती यांनी सदर तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा ठपका तिने या पत्रात ठेवला आहे.
आज कांपाल क्लिनिक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी ही माहिती दिली. यावेळी सदर महिलाही उपस्थित होती. जेनिफर मोन्सेरात हिने परवा पत्रकार परिषदेत आपण सदर जर्मन महिलेच्या घरीच गेलो नव्हतो,असा पवित्रा घेतला होता. दरम्यान,जेनिफर यांनी या भेटीवेळी आपल्या हस्ताक्षरात आपले नाव व मोबाईल क्रमांक लिहून दिलेला कागदाचा तुकडा यावेळी सादर करण्यात आला. हा कागद सदर पत्राबरोबर पोलिसांना सादर करण्यात आला आहे. रोहित याचे कारनामे इंटरनेटवरील "फेसबुक'संकेतस्थळावर सर्वांनी पाहिल्याचेही ऍड. रॉड्रिगीस म्हणाले. दरम्यान, रोहित याच्याकडून सदर मुलीला अश्लील संदेश पाठवण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल हा बाबूश मोन्सेरात यांचा असल्याने ते याप्रकरणी सहआरोपी ठरतात असा दावा करून आता थेट तक्रारदारावर दडपण आणून तक्रार मागे घेण्याचे प्रयत्न केल्याने जेनिफर यांनाही सहआरोपी करून घेण्याची मागणी सदर विदेशी महिलेने केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत ती मुलगी बिथरली असून तिची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठवडाभरात बिगर सरकारी संस्था व पोलिसांच्या साहाय्याने पुढील आठवड्यापर्यंत तिची जबानी घेतली जाईल,असा विश्वास ऍड. रॉड्रिगीस यांनी व्यक्त केला.
राज्याचे ऍड.जनरल यांनी सरकारला सल्ला द्यायचा असतो. मात्र रोहित मोन्सेरात तक्रार नोंद केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेली प्रक्रिया चुकीची असल्याचा जो सल्ला ऍडव्होकेट जनरल यांनी मोन्सेरात कुटुंबीयांना दिला तो कसा, असा महत्त्वपूर्णसवाल ऍड.रॉड्रिगीस यांनी उपस्थित करून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याप्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
मंत्र्यांच्या आदेशावरूनच संशयित गोमेकॉत
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघा संशयितांना एकाच वेळी छातीत दुखण्याचा त्रास जाणवल्याने त्यांना "गोमेकॉ'तील अतिदक्षता विभागात दाखल केल्याच्या कृतीची चौकशी करा,अशी मागणी ऍड.रॉड्रिगीस यांनी केली. कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक बी. के. हरिप्रसाद गोव्यात पोहचले व लगेच हे तिघेही संशयित "गोमेकॉ'तील वातानुकूलित विभागात दाखल झाले. सुरुवातीस बाबूश यांनी प्रयत्न केले व नंतर एका आरोग्यमंत्र्यांच्या आदेशावरूनच ही कृती घडल्याचा आरोपही ऍड.रॉड्रिगीस यांनी केला. गोमेकॉच्या अधीक्षकांनी विविध विभागांतील डॉक्टरांना पाचारण करून या तिघांना अतिदक्षता विभागात दाखल करून घेतल्याचा आरोप ऍड. आयरिश यांनी केला.
पोलिसांच्या कार्यतत्परतेचे स्वागत
पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात सुरू केलेल्या चौकशीबाबत बाबूश यांनी समाधान व्यक्त केले.परंतु बी.के.हरिप्रसाद यांच्या भेटीनंतर या प्रकरणी पोलिस चौकशीच्या दिशेबाबत संशय निर्माण होत असल्याचे ऍड. रॉड्रिगीस यांचे म्हणणे आहे. सर्वकाही कायद्याप्रमाणे होईल,असे सांगणाऱ्या हरिप्रसाद यांनी आता काहीही बेकायदा होणार नाही, याची दक्षता घ्यावी,असा सल्लाही ऍड.रॉड्रिगीस यांनी दिला.
घरी पाठवले
दरम्यान, ऍड. रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांना आज (शनिवारी) उपचारानंतर घरी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दरम्यान,हा सुरू केलेला लढा संपवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही,असा निर्धार व्यक्त करून गोवेकरांनी दिलेल्या धीराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys