मुंबई, दि. ५ - पुढील वर्षी होऊ घातलेल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती विजयी झाली आणि शिवसेनेच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा जास्त असली तर, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.
शिवसेनेने आज हा संकेत दिला. सेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी एका खाजगी वाहिनीशी बोलताना याचे सूतोवाच केले.
९ ऑक्टोबरला होणा-या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हेच आमचे मुख्यमंत्री असतील. कारण, ते महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत !
शिवसैनिकांच्या मनात तर उद्धवजींचे मुख्यमंत्रिपद आहेच. पण राज्यातील इतर जनतेच्या मनातही ते आहे, असे सांगताना राऊत म्हणाले की, त्यांनी ठिकठिकाणी प्रचंड जाहीर सभा घेऊन राज्य पिंजून काढले आहे. त्यामुळे शेतक-यांपसून शिवसैनिकांपर्यंत सा-यांनाच त्यांच्याविषयी आदर वाटत आहे.
अर्थात, उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा दसरा मेळाव्यातच होण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे यावेळी प्रथमच भाषण होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब केले जाईल, असे मानले जाते. तसे झाले तर ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी होण्यासाठी मैदानात उतरेल. असे कोणतेही पद न घेऊन बाळासाहेबांनी गेली ४३ वर्षे शिवसेनेचे व स्वत:चे वैशिष्ट्य जपले आहे.
परंतु यावेळी, राज ठाकरे यांनी उभ्या केलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी हा उपाय योजला जाईल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. मराठीचा मुद्दा राज ठाकरे यांनी शिवसेनेकडून जवळजवळ पळविला आहे. याशिवाय, ते आपल्या चुलत भावावर आणि त्यांच्याभोवतालच्या नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. आजही त्यांनी, शिवसेना बाळासाहेब चालवत नाहीत, तसेच सामनामधील अग्रलेखही ते लिहीत नाहीत, असे विधान एका मुलाखतीत केले आहे. या वारंवारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आत्ताच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले जाऊ शकते.
ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असे सूत्र भाजप-शिवसेना युतीमध्ये आधीच ठरलेले आहे. शिवसेना जास्त जागा लढवत (२८८ पैकी १७१) असल्याने त्यांचाच नेता मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, यावेळी ११७ पेक्षा थोड्या जास्त जागा मागण्याची तयारी भाजपने केली असल्याचे कळते. तरीही शिवसेना आपले वर्चस्व कायम ठेवूनच युती करेल. त्या स्थितीत युती जिंकल्यास उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
Monday, 6 October 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making
Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment