आमोण्यातील सभेत नार्वेकरांचा सवाल
आमोणे, दि. २७ (वार्ताहर): गोव्याचे आरोग्यमंत्री आपल्या कार्यकाळात २२०० बेरोजगारांना नोकरीला लावल्याचे सांगतात. मात्र त्यातील पाळी व डिचोली मतदारसंघातील केवळ ३० जण आहेत उर्वरित सर्वजण हे सत्तरी मतदारसंघातील आहेत. त्यामुळे हे आरोग्यमंत्री गोव्याचे आहेत की केवळ सत्तरीचे आहेत असा सवाल हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी केला आहे. आमोणे येथील महालक्ष्मी रवळनाथ मंदिराच्या पटांगणावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ऍड. नार्वेकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्रकाश फडते, माजी आमदार ऍड. विष्णू नाईक, सरपंच शंकर नाईक, खेमलो सावंत, वेळग्याचे दिनेश सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ऍड. नार्वेकर यांनी सरकारच्या पीपीपी तत्त्वावर कडाडून टीका केली. ऍड. नार्वेकर म्हणाले की, सरकारने डिचोली मतदारसंघातील मये तलाव हा एका बड्या हॉटेल मालकाला पीपीपी तत्त्वावर देण्याचा डाव आखला आहे. त्याचप्रमाणे कळंगुट बागा येथील ५२ हजार स्क्वे. मी. जागा पीपीपी तत्त्वावर देण्याचा घाट रचला आहे. यासाठी वीस वर्षांचा करार केला असून वीस वर्षानंतर सदर जागा ही त्याच मालकाकडे जाणार आहे. त्याचप्रमाणे साकवाळ वास्को येथील नैसर्गिक झरा २८०० स्क्वे. मी. जागाही पीपीपी तत्त्वावर बड्या उद्योजकाकडे देण्याचा घाट आहे. सरकारी मालमत्ता पीपीपी तत्त्वावर देऊन नंतर ती विकण्याचा कुटील डाव गोमंतकीयांनी हाणून पाडला पाहिजे. असे आवाहन यावेळी श्री. नार्वेकर यांनी केले.
पुढे बोलताना ऍड. नार्वेकर म्हणाले की, मी कॉंग्रेसचा आमदार व सक्रिय कार्यकर्ता असलो तरी या चार वर्षात सरकारने ‘पीपीपी’ उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. माझ्या तीस वर्षांच्या कारकिर्दीला काळिमा फासणारे हे कृत्य असल्याने मी या विरुद्ध आवाज उठवला आहे. मागील दाराने येणार्या कॉंग्रेस सत्ताधारींना धडा शिकवण्यासाठी हा उपक्रम मी राबवीत आहे.
यावेळी त्यांनी खाण वाहतुकीविरोधातही आवाज उठवताना गोव्यात आज खाण कंपन्यांत कुरघोडी करत असून त्यामुळे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला. पुढे श्री. नार्वेकर म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला चिरडून टाकण्याचा हा घाला परतवून लावण्यास नागरिक सज्ज आहेत. या भागातील प्रदूषणामुळे क्षयरोगी रुग्णांत वाढ झालेली आहे. तसेच आमोणे, खांडोळा, बेतकी, माशेलमधील मुले जन्मतःच अस्थमा घेऊन येत आहेत. त्यामुळे त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे आवाहन करताना आपल्या पुढील सभा काणकोण व मडगाव येथे आयोजित केल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते प्रकाश फडते यांनी नार्वेकर यांनी सुरू केलेल्या उपक्रमास पाठिंबा असल्याचे सांगितले तर ऍड. विष्णू नाईक यांनी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच कोणत्याही प्रकरणावर कारवाई होते. मग सरकार कशासाठी असा सवाल केला. यावेळी सरपंच शंकर नाईक व श्री. सहस्त्रबुद्धे यांनीही आपले विचार मांडले.
खेमलो सावंत यांनी प्रास्ताविक केले. व नंतर आभार मानले.
Monday, 28 February 2011
बाबूशकडून मतदारांना आमिषे
विरोधकांचा जोरदार आरोप
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून मतदारांना विविध वस्तूंचे आमिष दाखवण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे. विविध भागांत फ्रीज, टीव्ही, ‘एलसीडी’ मोबाईल तसेच सायकलींचे वितरण जोरात सुरू आहे. काही लोकांच्या घरांचे दुरुस्ती कामही सुरू करण्यात आले असून भाटले तसेच इतर काही भागांतील लोकवस्तीत असलेले भले मोठे वृक्षही कापून साफ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
कोणत्याही परिस्थितीत पणजी महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांनी सध्या बराच जोर लावला आहे. आपल्या पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते घरोघरी भेटी देत आहेत. या भेटीत अनेकांना विविध वस्तूंचे वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांचे विरोधक करीत आहेत. विविध भागांत शालेय मुलांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे तसेच विविध वस्तूंचेही निर्धास्तपणे वाटप सुरू असून निवडणूक यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान, घराशेजारील धोकादायक वृक्ष कापण्यासाठी सामान्य लोकांना सरकारी खात्यांत खेपा माराव्या लागण्याचे अनेक प्रकार ताजे असताना महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाटले तथा इतर भागांतील भलेमोठे वृक्ष कापण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हे वृक्ष वन खात्याची परवानगी न घेताच कापण्यात आले असले तरी त्याचे काहीही सोयरसुतक वन खात्यालाही पडून गेलेले नाही. बाबूश यांच्याकडून सरकारी यंत्रणेचाच गैरवापर होतो आहे, अशी टीकाही त्यांच्यावर केली जात आहे.
गेली पाच वर्षे पणजी महापालिकेवर बाबूश समर्थक गटाचीच सत्ता असताना सामान्य जनतेच्या समस्यांची आठवण त्यांना आत्ताच कशी काय झाली, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी एका पणजीकराने दिलेली प्रतिक्रिया मात्र इथे महत्त्वाची ठरली आहे. ‘देणार्याने देत राहावे, घेणार्याने घेत राहावे, पणजीसाठी मत देताना मात्र मतदाराने सजग राहावे’.

कॅसिनो, विद्यार्थी व ‘गोवादूत’
पणजीतील साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाने ‘गोवादूत’ला पाठवलेल्या स्पष्टीकरणात आपण आयोजित केलेल्या ‘तत्व २०११’ या कार्यक्रमासाठी काही बिगरसरकारी व सरकारी संस्थांबरोबरच, ‘कॅसिनो रॉयल्स’कडून प्रायोजक म्हणून आर्थिक मदत घेतल्याचे नमूद केले आहे. दोन दिवसांचा हा कार्यक्रम कसा शिस्तबद्ध होता, सांस्कृतिक ऐक्य दाखवणारा होता आणि त्याचा लाभ गोव्यातील दहा महाविद्यालयांतील मुलांनी कसा घेतला हेही नमूद केले आहे. विद्यार्थी मंडळातर्फे प्राची सावंत यांनी हा खुलासा पाठवला आहे.
‘गोवादूत’ने या कार्यक्रमाला कोणताही आक्षेप घेतलेला नाही किंवा त्या कार्यक्रमाच्या स्वरूपावरही टीका केलेली नाही. केवळ ‘कॅसिनो’कडून विद्यार्थ्यांनी मदत स्वीकारावी का आणि या मार्गाने कॅसिनो युवावर्गापर्यंत कशी घुसखोरी करीत आहेत, त्याचे दुष्परिणाम काय यावरच बातमी व अग्रलेखात भर दिला होता. कॅसिनो ही गोव्याला लागलेली कीड आहे आणि त्यामुळेच अशा अनिष्ट गोष्टींचा शिरकाव युवावर्गात होऊ नये, असे ‘गोवादूत’ला आजही वाटते. समाजातील धुरिणांनी आणि संघटनांनीही या विषयावर सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेतच. ठरलेल्या भेटीवेळी विद्यार्थी न आल्याने हे सर्व प्रत्यक्षात सांगता आले नाही.
-संपादक

शून्यातून विश्व निर्माण करणार्या‘राजबी’
पणजी, दि. २७ (शैलेश तिवरेकर): जीवन म्हणजे एक नाटकच आहे. आम्ही माणसे म्हणजे या नाटकातील कलाकार असून त्याचा निर्माता दिग्दर्शक साक्षात परमेश्वर आहे. प्रत्येक माणसाच्या वाट्याला जो अभिनय येईल तो त्याने व्यवस्थित पार पाडून रंगमंच सोडावा ही तर जीवनाची रीतच आहे. या रंगमंचावरील प्रत्येकाचे अनुभव मात्र वेगवेगळे असतात. काहींच्या नशिबात पावलागणिक सुख तर काहींच्या नशिबात दुःखाचे डोंगर असतात. परंतु हिमतीने आणि चिकाटीने काम करून उशिरा का असेना परंतु या दुःखाच्या डोंगरातून सोईस्करपणे आर्थिक आणि मानसिक दृष्टिकोनातून सुखाचा मार्ग शोधणारी अनेक माणसे आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘राजबी’.
विवाह झाल्यापासून त्यांच्या पाचवीला केवळ दुःखच पुजलेले आहे. परंतु त्यांनी कधीही जीवनाच्या या नाटकात हार मानली नाही. जे काही समोर येईल त्याला खंबीरपणे सामोरे जाणे आणि आपले नसले तरी आपल्या मुलांचे चांगले भविष्य घडविणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकले आणि आज २५ वर्षानंतर ज्या गोष्टीची त्या वाट पाहत होत्या त्या त्या गोष्टी त्यांच्या पायाशी लोळत आहेत. आज राजबींचा स्वतःचा फ्लॅट आहे. दोन मुलगे आणि एक कन्या अशी त्यांना अपत्ये असून कन्येला त्यांनी आपल्या परिवारातील योग्य असा नवरा मुलगा पाहून योग्यरितीने विवाह करून कन्येला सासरी पाठवण्यात आले आहे. तर मोठ्या मुलाचे लग्न करून आपल्या नातवंडासहित त्या मजेत वेळ काढत आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींसोबतच राजबींनी आपल्या व्यवसायात अजूनही काहीच कमी केलेले नसून उलट दिवसेंदिवस त्याचा विस्तार वाढवत आहेत.
मूळ बेळगाव येथील असलेल्या ‘राजबी’ आपली जीवन कथा सांगताना त्यांचा ऊर अगदी भरून यायचा. परंतु सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितल्या. आपल्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगावा असा त्यांचा हा जीवनपट आहे पण आजही त्यांना त्याचा कोणताच अभिमान वा गर्व नाही. उलट त्या म्हणतात. जे आपल्या वाट्याला आले त्याचा आपण आनंदाने स्वीकार केला. त्याचे यश आज आपल्या पदरी पडले आहे. त्याचाही आपण आनंदाने स्वीकार करत आहे.
जीवन हे असेच आहे, जे आहे ते चांगले आहे म्हणून स्वीकारावे यालाच जीवन म्हणतात. शून्यातून विश्व निर्माण करणार्या राजबी अगदी निर्विवाद आणि मोकळेपणाने बोलत होत्या. पतीच्या आणि सासुरवाडीच्या छळणुकीला आणि पतीच्या माराला कंटाळून स्वतःकडचे घड्याळ केवळ ५० रुपयाला गहाण ठेवून अवघे ५० रुपये आणि सोबत तीन चिमुकल्या मुलांना घेऊन राजबी गोव्यात आल्या. सुरुवातीला त्यांनी मडगाव येथे काय मिळेल ते काम केले. त्यानंतर देवगड सावंतवाडी या भागात गटार खोदण्याचे काम करून मिळेल त्या आसर्याला राहत होत्या. काही काळा नंतर त्या पुन्हा गोव्यात आल्या. सोबत मुले होतीच. त्यांच्यासाठीच तर त्या जिवाचे रान करत जगत होत्या. गोव्यात आल्यावर त्यांनी बाबा टाइल्स कंपनीत काम करून एका झोपडीत आपल्या मुलांचे संगोपन करू लागल्या. बाबा टाइल्स कंपनीत काम करतानाच काहीतरी जास्त काम करून जास्त कमावणे आवश्यक आहे याची त्यांना जाणीव होऊ लागली. कारण आता मुले मोठी होत होती आणि त्यांच्या गरजाही वाढत होत्या. म्हणूनच त्यांनी पर्वरी भागात छोट्या प्रमाणात भाजीची टोपली घेऊन घरोघरी फिरणे सुरू केले. सकाळी म्हापसा बाजारातून भाजी आणून ती विकणे आणि नंतर कामावर जाणे असा त्यांचा नित्यक्रम ठरला होता. नंतर त्यांच्या लक्षात आले की भाजीविक्रीच्या व्यवसायात चांगला जम बसत आहे. म्हणून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. गोड वाणी आणि व्यवसायातील सत्यता, चिकाटी या गुणांच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यवसायात चांगलाच जम बसवला. नंतर टोपली घेऊन फिरणे शक्य होत नसल्याने त्या रिक्षा चालवायला शिकल्या आणि कंपनीतून मिळालेला भविष्य निर्वाहनिधी व भाजी व्यवसायातील पैशांतून वापरलेली रिक्षा विकत घेतली व रिक्षेतून दारोदारी फिरून भाजी विकणे सुरू केले. आज या भाजी विक्री व्यवसायाच्या जोरावर त्यांच्या सार्या कुटुंबाचा चांगलाच जम बसला असून शून्यातून स्वबळावर निर्माण केलेल्या विश्वात त्या अगदी सुखात आहे. आज त्यांच्याकडून रोज भाजी खरेदी करणारे त्यांचे ग्राहकही त्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत राहतात. याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या ग्राहकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास होय. म्हणूनच कुठल्याही व्यवसायात चिकाटी आणि ग्राहकाचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे.

लिबियातील भारतीयांच्या थरारक आठवणी...!
नवी दिल्ली, दि. २७ : लिबियातील भारतीय सुरक्षितपणे मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या चेहर्यावर तणावरहित आनंद दिसून येत होता. गेल्या दोन आठवड्यांत लिबियात चाललेल्या सरकारविरोधी हिंसाचाराच्या थरारक आठवणी अजूनही ताज्या असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसून येत होते. या घटनांबद्दलची भीती त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. तेथील लूट, हिंसाचार आपल्या डोळ्यांनी बघितलेले अनेकजण लिबियातील ङ्गा थरारक आठवणींना इंदिरा गांधी विमानतळावर गोळा झालेल्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीसमोर उजाळा देत होते.
केरळमधील कोची येथील रहिवासी असणारे मुहम्मद सली गेल्या ३१ वर्षांपासून लिबियात राहत होते. ते या घटनेविषयी सांगतात की, लिबियातील परिस्थिती भडकल्यानंतर लोक कित्येक दिवस अन्न-पाण्याशिवाय जगत होते. ज्यावेळी लिबियातील हिंसाचार पराकोटीला पोहोचला तेव्हा लोक जगण्यासाठी घाबरत होते. मी आणि माझ्याबरोबर काही भारतीय दोन दिवस एका कॅम्पमध्ये राहिलो आणि काही लोकांनी आमच्या लॅपटॉप व मोबाईलसारख्या वस्तू लुटल्या. इंजीनिअर असलेल्या सली यांनी सांगितले की, लिबियात कोणताही कायदा चालत नाही. त्रिपोली येथील अनेक पोलिस स्टेशन हिंसाचारादरम्यान जाळण्यात आले होते. स्थानिकांनी खूप लूट केली.
एका बांधकाम कंपनीतील सुताराचे काम करणारा करमवीर सांगत होता की, लिबियातील परिस्थिती शांत झाली तरी तो पुन्हा परत जाऊ इच्छित नाही. तिथली परिस्थिती अतिशय वाईट होती. लोक लुटालूट करत होते. वेळ पडली तर ते हत्या करायलादेखील सरसावत होते. पोलिस नाही व संरक्षणही नाही, अशी स्थिती होती.
डॉ. नवबीर या काही वर्षांपासून लिबियात एकट्याच राहत होत्या. त्या आपले अनुभव सांगताना म्हणतात, हिंसाचार चालू होण्याअगोदर मी परदेशात असल्याची भावना कधीच निर्माण झाली नाही. मला त्या देशात कधीच असुरक्षित वाटले नाही. मी भारतात परतत असताना अनेकांनी मला थांबविले. त्या म्हणाल्या की, त्रिपोली विमानतळावर पोहचण्यासाठी लोक १० तास रांगेत उभे होते. विमानतळावर लांबचलांब रांगा होत्या आणि प्रवेशद्वारापासून चेक काऊन्टरपर्यंत पोहचण्यासाठी १५ तास लागले.
उत्तर प्रदेशातील बीजनोरचे रहिवाशी असणार्या मोबीन कुरेशी यांची कहाणी काही वेगळीच आहे. ते राहत होते तिथे एकही घर वाचले नव्हते. सर्व घरे जळून गेली होती. अन्नपाण्यावाचून त्यांना बरेच दिवस राहावे लागले. त्यांचे पैसे, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू चोरून नेण्यात आल्या.
परंतु, त्रिपोलीजवळ असणार्या गावातील हॉस्पिटलमध्ये काम करणार्या हैदराबादच्या सज्जनलाला यांनी मात्र लिबियन नेता गडाङ्गी हा एक चांगला माणूस असल्याचे सांगितले. लिबियात कामकरी व मजूर म्हणून काम करणार्या काही भारतीयांनी सांगितले की, तेथील पोलिसांनी आम्हाला सुरक्षा तर दिली नाहीच पण आमच्या जवळचे मोबाईल, पैसे आदी वस्तू हिसकावून घेतल्या.
राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील काही मजूर लिबियात काम करण्यासाठी गेले होते. आपली व्यथा सांगताना त्यातील काही मजुरांनी सांगितले की, एजन्टने त्यांना काम करण्याविषयीचा व्हिसा न देता दोन महिन्यांचा पर्यटन व्हिसा दिला. तिथे गेल्यावर त्यांच्याजवळ काम करण्याचा अधिकृत व्हिसा नसल्यामुळे त्यांना तिथे योग्य काम मिळाले नाही. ज्या कंपनीद्वारे ते काम करण्यासाठी गेले होते त्यांनी या मजुरांना खाण्याचे पदार्थ किंवा कोणतीही आरोग्य सुविधा पुरविली नाही. या मजुरांपैकी एका मजुराला हिंसाचाराच्या घटनेत डोक्याला मार लागला. परंतु, तरीही कंपनीने कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा पुरविली नाही.
असे अनेक चित्तथरारक व भयानक अनुभव घेऊन परतलेल्या लिबियातील भारतीयांना मायदेशी आणण्याची व्यवस्था केल्याबद्दल सर्वांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.
-----------------------------------------------------------------
५३० भारतीय परतले
लिबियातील हिंसक बंडाकडे बघता तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले असून काल एअर इंडियाची दोन विमाने कैरोकडे रवाना केली होती त्यापैकी एक विमान काल उशिरा रात्री दिल्लीला आले. यातून २९१ भारतात आले तर आज भल्या पहाटे आलेल्या दुसर्या विमानातून २३५ भारतीय परतले. अशाप्रकारे या दोन विमानांमधून एकूण ५२६ भारतीय मायदेशी परतले आहेत. लिबिया सरकारने भारताला १० मार्चपर्यंत दररोज दोन विमानांच्या उड्डाणांची परवानगी दिली आहे. ८८ भारतीयांनी ट्युनिशियात आश्रय घेतला आहे. लिबियात जवळपास १८ हजार भारतीय असावेत, असा अंदाज आहे.

Sunday, 27 February 2011
बेशिस्त खनिज वाहतुकीविरोधात कारवाई सुरू
- २२० ट्रकांना दंड, २० ट्रक जप्त
- उसगावात तिघांवर गुन्हा दाखल
- वाहतूक अधिकार्यांना धमक्या
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): राज्यात बेदरकार खनज वाहतूक विरोधातील जनतेच्या उद्रेकाची गंभीर दखल लोक लेखा समितीने (पीएसी) घेऊन सरकारी यंत्रणेला चांगलेच फैलावर घेतल्यानंतर आज (शनिवारी) या विरोधात जोरदार प्रत्यक्ष कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. राज्यातील विविध खाण प्रभावित भागात वाहतूक खात्याने सकाळपासूनच खनिज वाहतुकीविरोधात कारवाईला प्रारंभ केला. दिवसभरात एकूण २२० ट्रकांना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला, तर सुमारे २० ट्रक जप्त करण्यात आले. काही ठिकाणी ट्रकवाल्यांकडून कारवाईत अडथळे आणण्याचे प्रयत्न झाल्याचीही खबर असून त्याविरोधात पोलिस तक्रार दाखल झाल्याचे वृत्त आहे.
राज्यात खनिज वाहतुकीवर कोणतेच नियंत्रण राहिले नसल्याने स्थानिक जनता आक्रमक बनली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद ‘पीएसी’ बैठकीत उमटले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील ‘पीएसी’ समितीकडून वाहतूक, पोलिस, खाण व जिल्हाधिकार्यांना कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. खनिज वाहतुकीसाठी वाहतूक खात्याने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशाने ही कारवाई राबवण्यात येत आहे. आज सकाळपासूनच विविध ठिकाणी वाहतूक अधिकार्यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे खनिजमालवाहू ट्रक व्यावसायिकांत एकच खळबळ उडाली. आज दिवसभरात सुमारे २२० ट्रकांना दंड ठोठावण्यात आला तर वीस ट्रक जप्त करण्यात आले.
रिवण भागात जोरदार कारवाई
आमच्या सावर्डे प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार या भागात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त खनिजमाल वाहून नेणार्या सुमारे ५० हून जास्त ट्रकांना रिवण येथे चलन देण्यात आले. जोपर्यंत खनिज वाहतुकीला शिस्त येत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार अशी माहिती फोंडा वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक नंदकुमार आरोलकर यांनी दिली. एका ट्रकामध्ये जास्तीत जास्त १० टन खनिजमाल भरण्याचा न्यायालयाचा आदेश आहे, तरीही १५ ते १७ टन माल भरला जात असल्याचे या मोहिमेत आढळून आले. दरम्यान, दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी सरकारने लवकरात लवकर बगल रस्त्याची मागणी पूर्ण करावी असे सांगितले. दिवसाला फक्त एक खेप मारून ट्रकमालक आणि ट्रकचालकांनाही परवडणारे नाही व अशाने या व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळ ओढवेल असा इशारा त्यांनी दिला.
फोंडा भागात कारवाईला अडथळे
आमच्या फोंडा प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार आज धारबांदोडा, तिस्क, उसगाव आदी भागांत वाहतूक खात्याकडून जोरदार कारवाई सुरू केल्याने ट्रकचालक व मालकांचे धाबे दणाणले आहे. आज सकाळी ९.४५ च्या सुमारास उसगाव बगल रस्त्यावर खनिजमालवाहू ट्रकांची तपासणी सुरू करताच काही लोकांनी या कारवाईत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक प्रल्हाद देसाई यांनी फोंडा पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नीलेश शिलकर, उल्हास पालकर आणि अर्जुन (नाव पूर्ण नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे या भागात खनिज वाहतूक ट्रकांची कशी दादागिरी चालते याचा अनुभव वाहतूक अधिकार्यांनाही पाहायला मिळाला. वाहतूक खात्याच्या अधिकार्यांनी काही ट्रक ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे काही ट्रकमालकांनी हितसंबंधी लोकांना सोबत घेऊन वाहतूक खात्याच्या अधिकार्यांच्या गाडीला घेराव घालून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला. वाहतूक अधिकार्यांना कारवाई न करता ताबडतोब परत जाण्याची धमकीही देण्यात आली. यावेळी एका इसमाने वाहतूक खात्याच्या जीप गाडीची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल पालेकर तपास करीत आहेत.

अनैतिक संबंधातून इसमाचा निर्घृण खून?
डिचोली, दि. २६ (प्रतिनिधी): वाठादेव - डिचोली येथे एका इसमाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्याची घटना आज घडली. त्यामुळे डिचोली परिसरात एकच खळबळ माजली असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबी विठो मोटे (५२) या इसमाचा अज्ञातांनी खून केला आहे. त्याच्या अंगावर व मानेवर तीन ठिकाणी जखमा होत्या. अंगात फाटलेला बनियन तर कंबरेखाली कसलेच वस्त्र नव्हते. घटनास्थळी पोलिसांना धारदार शस्त्र आढळून आले असून महिलेचे केसही आढळून आले आहेत.
बाबी मोटे हा गेली अनेक वर्षे वाठादेव (धाट) येथील बेग यांच्या घरात ‘केअर टेकर’ म्हणून राहत होता. तो एकटाच या घरात राहायचा व मोलमजुरी करायचा. आज दुपारी घराचे मालक बेग यांनी बाबीला बोलाविण्यासाठी दोन इसमांना पाठविले होते. त्यानुसार ते ‘त्या’ घरात गेले असता बाबी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण केले. श्वानपथक अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन पुन्हा माघारी परतले. घटनास्थळी सांडलेल्या रक्तावर अज्ञाताच्या पायांचे ठसे मिळाले आहेत. पोलिसांना घटनास्थळी ‘कोयती’ सादृश्य हत्यार सापडले असून महिलेचे केसही आढळून आले आहेत. त्यामुळे प्रकरणाला वेगळी गती मिळाली आहे. सदर इसम विवाहित आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तो एकटाच राहत होता. बायकोला त्याने सोडले होते. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काल रात्री ८.३० नंतर ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

आता ऍड. नार्वेकरांचे थेट विश्वजित यांनाच आव्हान!
‘गोवा लोकशाही मंच’तर्फे आज आमोण्यात जाहीर सभा
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): हळदोण्याचे आमदार तथा माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना थेट आव्हान देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ‘गोवा लोकशाही मंच’तर्फे उद्या २७ रोजी आमोणा येथील श्री महालक्ष्मी देवस्थानजवळ एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सरकारी इस्पितळांचे ‘पीपीपी’द्वारे खाजगीकरण व बेकायदा खाण व्यवसायाविरोधात जोरदार दंड थोपटण्यात येणार आहेत.
ऍड. नार्वेकर यांनी सध्या ‘गोवा लोकशाही मंच’च्या माध्यमातून आपल्याच सरकारविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. म्हापसा, कळंगुट येथील जाहीर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा पाळी मतदारसंघाकडे वळविला आहे. पाळी मतदारसंघावर विश्वजित राणे आपले वर्चस्व असल्याचा दावा करतात. पाळीचे आमदार प्रताप गावस यांना विश्वजित यांनीच निवडून आणल्याचे बोलले जाते. आता ऍड. नार्वेकर यांनी पाळी मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन करून सरकारी इस्पितळांचे खाजगीकरण व बेकायदा खाणींविरोधात दंड थोपटण्याचे ठरवले आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात खाणउद्योग चालतो. त्यामुळे उद्भवणार्या समस्यांना तेथील लोक रोज तोंड देत आले आहेत. पाळीतील खाणप्रभावित लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यास आमदार प्रताप गावस यांना अपयश आल्याचा दावा त्यांचे विरोधक करीत आहेत. सध्या आमोणे येथील ‘सेझा गोवा’च्या पीग आयर्न प्रकल्पाच्या विस्तारीकरणावरून वातावरण बरेच तापले आहे. या विस्तारीकरणामुळे आमोणे भागातील लोकांना प्रदूषणाचा मोठा त्रास होईल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात तेथील लोक बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून २८ रोजी जाहीर जनसुनावणीचे आयोजन केले आहे. या जनसुनावणीच्या पूर्वसंध्येलाच ही बैठक होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘गोवा लोकशाही मंच’च्या या सभेला माजी आमदार प्रकाश फडते, कॉंग्रेस पक्षाचे आघाडीचे कार्यकर्ते खेमलो सावंत हजर राहणार आहेत. पाळी मतदारसंघातील लोकांनी मोठ्या संख्येने या सभेला हजेरी लावून सरकारच्या झुंडशाहीविरोधात एकत्रित यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इफ्फी २०१० खर्च कॅगच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता
मोठाच घोटाळा झाल्याची चर्चा
पणजी, दि. २५ (विशेष प्रतिनिधी): कोणतीही तपशीलवार माहिती उपलब्ध नसताना त्याकडेसाफदुर्लक्ष करून, गोवा मनोरंजन संस्थेच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत गत वर्षीच्या इफ्फीच्या अवाढव्य खर्चाला मंजुरी देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या खर्चाबाबत संशयाची पाल चुकचुकली असून २०१० च्या ‘इफ्फी’त मोठा घोटाळा झाला असण्याचा संशय बळावला आहे. तसेच या खर्चाला दिलेली मंजुरी ही महालेखापाल व ऑडिटच्या (‘कॅग’) कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खर्चाचा सविस्तर तपशील नसतानाही त्याला दिलेल्या मंजुरीवरून आता २०१०च्या इफ्फीबाबत वादाचे मोहोळ उठण्याचे संकेत मिळत आहेत. आधीच विविध कारनाम्यांनी वादात सापडलेला २०१०चा इफ्फी आता अधिकच वादग्रस्त ठरण्याची शक्यता स्पष्टपणे दिसू लागली आहे.
सार्वजनिक निधीचे योग्य नियोजन होऊन त्याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक ठरते. मात्र नुकत्याच झालेल्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत खर्चाबाबतची फारशी तपशीलवार माहिती नसली तरी खर्चाला मान्यता देण्याआधी ती मागवण्याचे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळेच हा खर्च वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या खर्चाची वर्गवारी करताना प्रवास तसेच निवास खर्च तब्बल दोन ठिकाणी वेगवेगळा दाखवण्यात आला असून इफ्फीच्या किरकोळ खर्चावर ८६ लाख ९० हजार ५१४ रुपये उधळण्यात आले आहेत. संस्थेच्या कार्यकारी समितीने मांडलेली खर्चाची आकडेवारी लक्षात घेता त्यात घोळ असण्याचीच प्रथमदर्शनी शक्यता दिसत आहे. गोवा विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरावर सरकारने दिलेली माहिती विचारात घेता या इफ्फीच्या खर्चात कोणताही ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे.
इफ्फीत कार्यक्रम सादर करणारे कलाकारांचे मानधन, निवास व प्रवासावर २१ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. २०१०च्या इफ्फीत आयोजन समितीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत असे स्पष्ट केले होते. त्याऐवजी चित्रपट कार्यशाळा व तत्संबंधी उपक्रम राबविण्यात येतील असे सांगण्यात आले होते. मात्र असे असतानाही खर्चाच्या वर्गवारीत आता कलाकार मानधन, प्रवास व निवासावर २१ लाखांचा खर्च दाखविण्यात आल्यामुळे त्याचेही स्पष्टीकरण संस्थेला द्यावे लागणार आहे. हा २१ लाखांचा खर्च का व कोठे केला त्याबाबत सविस्तर माहिती बाहेर आल्याशिवाय खर्चाचा संशयकल्लोळ दूर होणे अशक्य आहे.
विशेष म्हणजे जाहिरात खर्चापोटी केवळ ३ लाख ९६ हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. छपाई व स्टेशनरीवर अठ्ठावन्न हजारांचा खर्च दाखवण्यात आला आहे. संस्थेच्या कार्यकारी समितीवरील सदस्य वेगवेगळ्या संस्था व उद्योगाशी संबंधित असून इफ्फीची कंत्राटे ही सदस्यांच्या त्या उद्योग व संस्थांना मिळालेली आहेत. त्यामुळेच इफ्फीच्या खर्चाबाबत घोटाळ्याचा प्रथमदर्शनी संशय दिसत आहे.
महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार समितीचा एखादा सदस्य एखाद्या संस्थेशी वा उद्योगाशी संबंधित असल्यास त्याला कामाचे कंत्राट देऊ नये अशी तरतूद आहे. तथापि, त्या नियमाला तिलांजली देत संस्थेच्या कार्यकारिणीवरील काही सदस्यांनाच इफ्फीची कंत्राटे लाटली गेल्याने एकंदर खर्चात घोटाळ्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे. यात काही हॉटेल व्यावसायिक, वृत्तपत्र सृष्टीशी संबंधित यांचा समावेश असून अनेक वादग्रस्त निर्णयामुळे दरवर्षी इफ्फीच्या चर्चेत राहणारे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना या सदस्यांचा त्यासाठी छुपा पाठिंबा मिळत असल्याची सध्या चर्चा आहे.
हल्लीच पुनर्गठीत केलेल्या कार्यकारी समितीत हॉटेल व्यावसायिक व वृत्तपत्रसृष्टीशी संबंधित दोन तीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गत इफ्फीत ‘यंग ज्युरी ऍवार्ड’ स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा संस्थेने जाहीर केली नव्हती. तथापि त्याचा बक्षीस वितरणाचा व इतर खर्च संस्थेकडून उकळण्याचा खटाटोप सध्या सुरू असून मागील कार्यकारी समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती मिळाली आहे. तथापि त्याला मान्यता मिळाली की काय याबाबत निश्चित माहिती मिळाली नाही.
लघु चित्रपट केंद्रावर संस्था लाखो रुपयांचा खर्च करत असून त्याचा लाभ संस्थेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मर्जीतील लोकांनाच मिळत असल्याने हे केंद्र कायमचे बंद करण्याची मागणी स्थानिक चित्रपट निर्मात्यांनी केली होती. गत इफ्फीत या केंद्रावर १८ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. तथापि माहिती अधिकाराखाली मागविलेल्या माहितीत तो ३४ लाखांवर पोचल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची मागणीही रास्त असल्याचे त्यातून स्पष्ट होत चालले आहे.

गोव्याचा सांभाळ करण्यास सज्ज व्हा!
* ‘गोंयच्या राखणदारांचोे आवाज’ संघटनेचे आवाहन
* १५ रोजी आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन
* इजिप्तप्रमाणेच उठाव करण्याचा निर्धार
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): गोव्यात सर्वत्र अराजकता माजली आहे. राज्याच्या भवितव्याचा सौदा करून आमचे राजकीय नेते गोमंतकीयांना देशोधडीला लावण्यास पुढे सरसावले आहेत. प्रशासन निर्ढावलेले व असंवेदनशील बनले असून भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. या अराजक परिस्थितीत गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इजिप्तप्रमाणेच उठाव करण्याची वेळ आली आहे. ‘गोंयच्या राखणदारांचो आवाज’ संघटनेच्या झेंड्याखाली राज्यातील सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रितरीत्या ही चळवळ उभी करण्याचा संकल्प सोडला आहे. येत्या १५ मार्च रोजी आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करून या क्रांतीचा शंख फुंकला जाईल, अशी माहिती ऍड. यतीश नाईक यांनी दिली.
आज येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऍड. नाईक बोलत होते. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोव्याची अस्मिता व वेगळेपण सांभाळून ठेवायचे असेल तर हीच शेवटची संधी आहे व त्यासाठी राज्यातील युवकांनी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यटन, खाण व बांधकाम व्यवसायावर सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. एकीकडे गरीब जनतेला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी खरेदी केल्या जात आहेत तर दुसरीकडे याच जमिनी अव्वाच्या सव्वा दरांत विकून काही लोक आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. आपल्याच भूमीत परकीय बनण्याची नामुष्कीच गोमंतकीयांवर ओढवली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर गोव्यात गोमंतकीय फक्त नावापुरताच राहील, अशी भीती ऍड. नाईक यांनी व्यक्त केली.
१५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत विविध विषय हाताळले जाणार आहेत. त्यामध्ये पोलिस- ड्रग माफिया - राजकारणी साटेलोटे, प्रादेशिक आराखडा - २०२१, बेकायदा खाणी व खनिज वाहतूक, मोपा भूसंपादन, भारतीय नौसेना भूसंपादन, कचरा समस्या, पर्यावरणाचा र्हास, मेगा प्रकल्प, कोमुनिदाद जमिनींची विक्री, सेझ आदी विषयांचा समावेश असेल. शिवाय या सभेत काही महत्त्वाचे ठरावही घेण्यात येणार आहेत. त्यात गोव्यातील जमीन पुढील पिढीसाठी राखून ठेवण्याकरिता राज्याला विशेष दर्जा मिळवून देण्याचा ठराव राज्य विधानसभेत मंजूर करावा, लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात यावे, मतदार यादी तयार करताना खबरदारी घेणे आदींचा समावेश असेल.
पुढील पिढीसाठी गोवा सुरक्षित राहावा यासाठी राज्यातील बहुतांश सामाजिक संघटना झटत आहेत. पण युवा पिढी मात्र अशा चळवळींपासून अद्याप दूर राहणेच पसंत करते. जोपर्यंत या क्रांतीची मशाल युवा पिढी आपल्या हातात घेत नाही, तोपर्यंत ही क्रांती यशस्वी होणे शक्य नाही. त्यामुळे १५ मार्च रोजी होणार्या जाहीर सभेत युवा पिढीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व गोव्याच्या संरक्षणाची धुरा आपल्या हातात घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Subscribe to:
Posts (Atom)