मडगाव, दि.१५ (प्रतिनिधी) - बेताळभाटी पंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत एकूण सारी चचार्र झाली ती पंचायतकक्षेत वाढलेल्या परप्रांतीयांच्या संख्या व समस्येवर व अखेर संपूर्ण पंचायत कक्षेचे सर्वेक्षण करून किती परप्रांतीयांचे वास्तव्य आहे ते शोधून काढण्यासाठी एक १४ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मायकल फर्नांडिस हे होते. पंचायत कक्षेत भाड्याने दिलेली घरे व त्यात राहणारे भाडेकरू, तेथील वातावरण, भाडेकरूंसाठी उपलब्ध केलेल्या मूलभूत सोयी या सर्वांची पाहणी करून सदर समितीला येत्या १३ डिसेंबरच्या ग्रामसभेपूर्वी तो पंचायतीस सादर करावा लागणार आहे.
पंचायत कक्षेतील बेकायदा बांधकामावरही सभेत खडाजंगी झाली व येत्या ग्रामसभेपूर्वीं तमाम बेकायदा बांधकामावर कारवाई केली जावी व अहवाल सादर करावा असा निर्णय आजच्या सभेने घेतला. पंचायत कक्षेत नोंद झालेले गुन्हे व पोलिस तपास यावरही चर्चा झाली.
मेगा प्रकल्पांचाही प्रश्र्न चर्चेस आला असता मेगा प्रकल्पांच्या फायली प्रथम ग्रामसभेत सादर करून मंजूर कराव्यात व नंतर पुढील सोपस्कार पार पाडावेत असा निर्णय सभेने घेतला. यावेळी सरपंच मायकल यांनी पंचायतीने अजून एकाही मेगा प्रकल्पाला वास्तव्याचा दाखला दिलेला नसल्याचे सांगितले.
सभेने बालहक्करक्षण कायद्यावर एक अभ्यास समिती स्थापन केली. ती समिती या कायद्याखालील गुन्ह्यांचा अभ्यास करील. ग्रामसभा चालू असताना अकस्मात वीज गेली व साधारण २० मिनिटे काळोखांतच काम चालले. यावेळी वीजमंत्र्यांच्या नावे गदारोळ माजविला तर काहींनी आगामी ग्रामसभेत वीजमंत्र्यांना पाचारण केले जावे अशी मागणी उपस्थितांनी केली. वीजमंत्र्यांनी अन्य भागात भूमिगत वीज केबल टाकल्या पण बेताळभाटी अजून त्यापासून वंचित असल्याने तेथे ही योजना राबवावी अशी मागणी सदस्यांनी केली.
Monday, 16 November 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment