पर्रीकरांचा विश्वजितवर पलटवार
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’ करण सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नाही व या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आपण केला होता. परंतु, या आरोपांवरून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जी आदळआपट केली त्यावरून ‘खाई त्याला खवखवे’ या उक्तीचा प्रत्ययच त्यांनी आणून दिला, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज लगावला.
भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणातील भानगडींवर आपण बोट ठेवले होते. हा गैरव्यवहार कुणी केला हे मात्र सांगितले नव्हते. पण, विश्वजित राणे यांनी स्वतःहूनच या गैरव्यवहारांत आपला हात असल्याचे दाखवून दिले आहे. जुने आझिलो इस्पितळ कोसळण्याच्या मार्गावर आहे. तेथील रुग्णांची दयनीय परिस्थिती पाहता या इस्पितळाचे तात्काळ नव्या इमारतीत स्थलांतर होण्याची गरज आहे. या धोकादायक परिस्थितीची कोणतीच काळजी नसलेले आरोग्यमंत्री ‘पीपीपी’साठी अट्टहास धरून बसले आहेत व त्यामुळे या व्यवहारात त्यांचा स्वार्थ असल्याचेच दिसून येते, असा आरोपही पर्रीकर यांनी केला. सर्वसामान्य जनतेला मूलभूत आरोग्य सेवा प्रदान करण्यास अपयशी ठरलेल्या आरोग्यमंत्र्यांना या पदावर राहण्याचा कोणताच अधिकारी नाही, असेही ते म्हणाले.
जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणात सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. राज्य सरकारच्या ‘पीपीपी’ विभागाचे अधिकारीही या गैरव्यवहाराला तेवढेच जबाबदार आहेत. जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणासाठी सुरुवातीला प्रस्ताव मागवताना केंद्रीय आरोग्य योजनेच्या २००७ च्या उपचार शुल्कांची यादी दिली होती. प्रत्यक्षात निविदा सादर झाल्यानंतर २०१० च्या नव्या दरांप्रमाणे उपचार शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरांत बरीच तफावत असल्याने ही बेपर्वाई जाणीवपूर्वक करण्यात आल्याचीच अधिक शक्यता आहे, असे पर्रीकर म्हणाले. केंद्रीय आरोग्य योजनेचे उपचारांसाठीचे शुल्क दर ‘पॅकेज’ पद्धतीचे आहेत व त्यामुळे राज्य सरकारतर्फे औषधांचा वेगळा पुरवठा करण्याचे प्रयोजन काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला. बांबोळी येथे दंत महाविद्यालयाची जागा एका खाजगी कंपनीला सुपर स्पेशलिटी इस्पितळ उभारण्यास दिली आहे. पण, त्याचे काम अजूनही सुरू झालेले नाही. जिल्हा इस्पितळाला पर्यायी इस्पितळाचा दर्जा देण्यात आला असला तरी त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्या हातात ठेवून दबावतंत्राची वाट मोकळी करून ठेवली आहे, असेही पर्रीकर म्हणाले.
वाळपईत ‘पीपीपी’ करा
विश्वजित राणे यांना ‘पीपीपी’ची एवढीच घाई झाली असेल तर त्यांनी वाळपई इस्पितळाचे ‘पीपीपी’करण करावे, असेही पर्रीकर म्हणाले. जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणामुळे सरकारवर दरवर्षी अतिरिक्त ४० ते ४५ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे व त्यामुळे हा पांढरा हत्ती ठरण्याचीच जास्त शक्यता आहे, असेही ते म्हणाले. केवळ ऐच्छिक प्रकल्पांचेच ‘पीपीपी’ करण करण्याची मुभा आहे. पण, इथे अत्यावश्यक आरोग्यसेवेचे ‘पीपीपी’करण करून विश्वजित राणे आरोग्य क्षेत्राचा बट्याबोळ करण्यास पुढे सरसावले आहेत, असा आरोपही पर्रीकर यांनी केला.
Tuesday, 12 July 2011
मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा उपनिरीक्षक
प्रसन्न भगत निलंबित
बचावलेल्या विद्यार्थ्यांकडून १.३० लाखांची उपटली रक्कम
मडगाव, दि. ११(प्रतिनिधी): गेल्या शुक्रवारी काब द राम येथे समुद्रात बुडून मृत्यू आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यांकडे दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झालेले कुंकळ्ळीचे पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न भगत यांनी या दुर्घटनेतून बचावलेल्या अन्य चार विद्यार्थ्यांना खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्याची धमकी देऊन १.३० लाख रुपये त्यापूर्वीच उकळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस महानिरीक्षकांनी आज त्यांना तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेशही त्यांनी दिला.
अपघाती मृत्यू आलेल्या प्रकरणातही संबंधितांचा पोलिस अधिकारी कसा मानसिक छळ करतात हे या प्रकरणातून सिद्ध झाले असून त्यामुळे या खात्याबाबत आज येथे संतापाची लाट पसरलेली आढळून आली.
शुक्रवारी दुपारी ती दुर्घटना घडली होती. सायंकाळी एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता तर दुसरा बेपत्ता होता. त्या दुर्घटनेतून बचावलेल्या सर्वांना कुंकळ्ळी पोलिसांनी ठाण्यावर आणून चौकशीच्या नावाखाली बसवून ठेवले. रात्री उशिरा त्यांचे पालक आले व अल्पवयीन मुलांना तुम्ही कसे ठेवणार, असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना तेव्हा जाऊ दिले पण, दुसर्या दिवशी परत बोलावले. भगत याने पहिल्या दिवशीच या बचावलेल्या विद्यार्थ्यांना, तुम्हीच मृतांना पाण्यात ढकललेत त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करून तुम्हांला अडकवतो, अशी भीती दाखविण्यास सुरुवात केली होती. बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याला कुठे दडवून ठेवले आहे ते सांगा असा आग्रहही त्यांनी धरला होता.
दुसर्या दिवशी त्याने त्याच धमकावणीच्या सुरात चौकशी सुरू केली तेव्हा त्याच्याच एका हस्तकाने प्रत्येकी २५-२५ हजार चुकते करा व प्रकरण मिटवा; अन्यथा खडी फोडायला जाल अशी भीती घातली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष प्रसन्न याच्याशी बोलणी करून सायंकाळी ६ वाजेपर्यंत रक्कम आणून देण्याचे मान्य केले तर एकाने कुंकळ्ळी येथील एटीएममधून पैसे देण्याची तयारी दर्शवली. ते पैसे नेण्यासाठी भगत स्वतः पांढरी गाडी घेऊन आला व ती रक्कम आपण गाडीच्या मागच्या सीटवर ठेवल्याचे एका विद्यार्थ्याने पोलिसांत दिलेल्या जबानीत म्हटले आहे. पुराव्यादाखल त्याने एटीएममधून पैसे काढल्याची पावतीही सादर केली आहे.
आता उघडकीस आलेल्या माहितीप्रमाणे, भगत याने अन्य तिघांकडून त्यापूर्वीच प्रत्येकी पंचवीस तर एकाकडून ३० हजार रुपये उकळले होते. त्या सर्वांनी तशी जबानी पोलिसांना दिली असून पैसे कुठून उभे केले त्याची माहितीही सादर केली आहे.
मात्र, पाण्यात पडलेल्या एका मुलीला वाचविणार्या जेसन गोयस या मालभाटमधील विद्यार्थ्याकडूनही त्याने याच मार्गाने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला व तोच त्याच्या अंगलट आला. त्यालाही त्या दिवशी भगतने चौकशीच्या नावाखाली उशिरापर्यंत पोलिस स्टेशनवर बसवून ठेवले व नंतर जाऊ दिले. पण शनिवारी पुन्हा बोलावले व त्यावेळी त्याला, तूच या दुर्घटनेस जबाबदार असल्याने तुझ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जाईल, असे धमकावले. या प्रकरणातून मोकळे व्हायचे असेल तर दहा हजार रुपये घेऊन ये, असेही त्यांनी सांगितले.
तेथून बाहेर पडलेल्या जेसन व त्याच्या आईने थेट पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांच्या कानावर ही सारी हकिकत घातली त्यांनी लगेच कुंकळ्ळी पोलिस स्थानक निरीक्षकांशी संपर्क साधला. जेसन याला या प्रकरणी रीतसर तक्रार देण्यासही सांगितले. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनीही चौकशीचा आदेश दिला होता.
आता बाहेर आलेल्या माहितीनुसार, दुर्घटना झाली तो एकच गट असला तरी भगत याने त्यातील विद्यार्थ्यांना चौकशीसाठी वेगवेगळे बोलावून आपले ईप्सित साध्य करण्याचा बेत आखला होता. त्यामुळे एकाकडून घेतलेल्या रकमेचा पत्ता दुसर्याला लागला नाही. मात्र, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा हे एकच हत्यार त्याने सर्वांसाठी वापरले व तेच त्याच्या अंगलट आले.
भगत याच्यावर काब द राम येथे दोन वर्षांपूर्वीच्या अशाच एका प्रकरणात दवर्लीतील एकाकडून पन्नास हजारांची लाच घेतल्याचाही आरोप आहे.

राणे पितापुत्रांना भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडा
माध्यमप्रश्नी वाळपईत प्रा. वेलिंगकरांचे आवाहन
वाळपई, दि. ११ (प्रतिनिधी): आपण कसेही वागलो तरी जनता आपल्याच मागे राहणार अशा भ्रमात काही नेते वागत आहेत. या नेत्यांची मुजोरी जिरवणे अत्यंत आवश्यक आहे. सत्तरीतील राणे पिता-पुत्रांनी आजवर माध्यमप्रश्नी ‘नरो वा कुंजरोवा’ अशीच भूमिका घेतली आहे. सत्तरीतील जनतेने राजकीय हितसंबंध बाजूला सारून भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याबरोबरच योग्य कृती करण्यास भाग पाडले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आज वाळपईतील भाषाप्रेमींच्या बैठकीत केले.
यावेळी व्यासपीठावर भाषा सुरक्षा समितीचे सत्तरी तालुका अध्यक्ष रणजीत राणे, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, वल्लभ केळकर, आनंद शिरोडकर, ऍड. शिवाजी देसाई यांची उपस्थिती होती.
मातृभाषेबरोबरच आपल्या संस्कृतीचा गळा घोटण्यासाठी पुढे सरसावलेल्या दिगंबर कामत सरकारला रोखण्यासाठी संपूर्ण गोवा पेटून उठला असताना अजूनही काही नेते दुतोंडी भाषा करत आहेत. सरकारमध्ये राहून ते एका बाजूने सरकारला खूष करीत आहेत, तर दुसर्या बाजूने मातृभाषेच्या समर्थनार्थ बोलण्याचे नाटक करत आहेत. लोकांना गृहीत धरत असलेल्या या दुतोंडी नेत्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. आपल्याला कोणत्याही स्थितीत हा लढा जिंकायचा असून विजयी मानसिकता घेऊनच पुढे जायचे आहे. आज आपण मागे पडलो तर भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही असेही प्रा. वेलिंगकर म्हणाले.
यावेळी रणजीत राणे म्हणाले की, काही नेते केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी आम आदमीला लाचार बनविण्याचे हीन कृत्य करीत असून अशा वृत्तीपासून आज युवा पिढीने सावध राहायला हवे. येत्या २४ जुलै रोजीची सभा यशस्वी करण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊया, असे आवाहनही त्यांनी केले.
२४ जुलै रोजी होणारी ही सभा यशस्वी करण्यासाठी पंचायत पातळीवर विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठका १५ जुलैपर्यंत पूर्ण करून घरोघरी हा विषय पोहोचविण्याचे ठरविण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक ऍड. शिवाजी देसाई यांनी केले तर रणजीत राणे यांनी आभार मानले.

पणजी बसस्थानकावर महिलेचा नग्न मृतदेह
खुनाच्या संशयावरून तरुणाला अटक
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): पणजी येथील कदंब बसस्थानकावर एका महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह सापडला असून सदर महिलेचा खून केल्याच्या संशयावरून पणजी पोलिसांनी रोहन भीमबहादूर गुरुंग या २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, मयत महिलेचे नाव पौर्णिमा पेडणेकर (४५) असे असून गेल्या काही महिन्यांपासून ती रात्रीच्या वेळी बसस्थानक किंवा उद्यानातच झोपत असे. काल रात्री सुमारे १२.३० वाजता संशयित तरुण रोहन आणि मयत महिलेला एका ठिकाणी बसून गप्पा करताना बसस्थानकावर असलेल्या सुरक्षारक्षकाने पाहिले होते. यावेळी त्याने त्यांना हटकल्याने दोघेही बसस्थानकाच्या मागच्या बाजूला गेली. काही वेळाने आपल्याला किंचाळी ऐकू आल्याची जबानी त्या सुरक्षारक्षकाने दिली आहे. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन संशयिताला बस स्थानकावरच ताब्यात घेतले. यावेळी तो नशेत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
खाली पडलेल्या महिलेच्या अंगावर एकही कपडा नव्हता. पंचनामा करून मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून देण्यात आला. यावेळी शवचिकित्सा अहवालात महिलेचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला असल्याचे मत व्यक्त केले आहे. यावरून संशयिताच्या विरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला. संशयित रोहन हा मूळ धाजेंद्र - सिक्कीम येथे राहणारा असून बागा येथील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून नोकरीला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर करीत आहेत.

पुरुष मेडिसीन वॉर्ड अखेर खाली
आझिलोच रुग्णशय्येवर
म्हापसा, दि. ११ (प्रतिनिधी): म्हापसा येथील आझिलो इस्पितळातील पुरुष मेडिसीन वॉर्डचे छप्पर अतिशय धोकादायक अवस्थेत असून तो त्वरित खाली करा, अशी सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेली सूचना दुर्लक्षून संबंधितांनी तेथील अनेक रुग्णांचे जीव धोक्यात घातले होते. येथील दारुण अवस्थेचे वृत्त ‘दै. गोवा दूत’ने प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ माजली होती. अखेर रविवार दि. १० रोजी हा धोकादायक वॉर्ड खाली करण्यात आला.
दि. ९ जुलै रोजी ‘गोवा दूत’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा आणि भाजप कार्यकर्त्यांनी इस्पितळाची पुन्हा पाहणी केली. तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या आमदार डिसोझांनी, एखादी दुर्घटना घडल्यास त्याचे संबंधितांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन अखेर काल पुरुष मेडिसीन वॉर्डातील रुग्णांना महिला वॉर्डात हालवून तो वॉर्ड खाली करण्यात आला.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले आहे तर, काहींची इमारतीतील अन्य खोल्यांत खाटा टाकून तात्पुरती व्यवस्था लावण्यात आली आहे.

शांताराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): कॉंग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार शांताराम नाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीतील सर्व घटक पक्षांचा आपल्याला पाठिंबा असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आज सकाळी पर्वरी सचिवालयात शांताराम नाईक यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री दिगंबर कामत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, उपसभापती माविन गुदिन्हो, राष्ट्रवादीचे नेते तथा महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा तसेच अन्य मंत्री व कॉंग्रेसचे आमदार हजर होते. उद्या १२ रोजी संध्याकाळी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. विरोधी भाजपतर्फे अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. आमदार दामोदर नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी उद्या १२ रोजी भाजप आपली भूमिका स्पष्ट करेल,असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर म्हणाले. मगो पक्षाने शांताराम नाईक यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला असला तरी या पक्षाचे दोन्ही आमदार विद्यमान आघाडीचे घटक असल्याने त्यांचा पाठिंबा आपल्यालाच मिळेल, असे शांताराम नाईक म्हणाले.
खासदार शांताराम नाईक यांची उमेदवारी सरकार पक्षातील सगळ्याच सदस्यांना मान्य आहे असे नाही व त्यामुळे सत्ताधारी गटांतून सहा ते सात मते मिळवण्याची एखाद्याची तयारी असेल तर त्याला भाजप पाठिंबा देण्याची शक्यता श्री. पर्रीकर यांनी बोलून दाखवली.

मळा प्रकल्पामुळे स्थानिकांत असंतोष
नगरसेवक शुभम चोडणकर यांची चिंता
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): ‘एनजीपीडीए’कडून मळा मार्केट व तलाव प्रकल्पाच्या मूळ आराखड्याला बगल देऊन हा प्रकल्प ‘पीपीपी’ धर्तीवर ‘मेसर्स कनका इन्फ्राटेक कंपनी’ ला देण्याचा निर्णय घेताना स्थानिकांना अजिबात विश्वासात घेतले गेले नाही. या प्रकल्पामुळे स्थानिकांना होणारा त्रास तसेच इथे निर्माण होणार्या अडचणी याबाबत स्पष्टीकरण हवे, अशी मागणी मळा येथील नगरसेवक शुभम चोडणकर यांनी केली.
मळा येथील ‘एनजीपीडीए’चा मूळ प्रकल्प हा स्थानिक व्यापारी व लोकांना नजरेसमोर ठेवून तयार केला होता. या मार्केट प्रकल्पात पणजी व आसपासच्या परिसरातील व्यापार्यांना संधी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु, आता या प्रकल्पाच्या ‘पीपीपी’करणामुळे स्थानिक बाहेर फेकले जाणार असून हा तारांकित प्रकल्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मळा भागातील स्थानिकांना सध्याच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाटो वगळता पणजी शहरात प्रवेश करण्यासाठी दुसरा एकमेव पर्याय म्हणून रूआ दे ओरेम या रस्त्याचा वापर होतो. हा रस्ता आधीच वाहतुकीसाठी अपुरा पडतो व त्यात हा प्रकल्प उभा राहिल्यास इथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होणार असल्याचे श्री. चोडणकर म्हणाले. एका बड्या प्रकल्पासाठी रूआ दे ओरेम रस्ताच आराखड्यात दाखवण्यात आला आहे. मळा येथील अंतर्गत रस्त्यांचाही वापर या प्रकल्पासाठी होणार असल्याने स्थानिकांची कोंडी होण्याचीच जास्त शक्यता आहे. मळा भागात पाण्याची टंचाई, मलनिस्सारण प्रक्रियेचा अभाव व त्याचबरोबर येथे पावसाळ्यात पाणी भरण्याचा प्रकार याबाबत काहीच विचार करण्यात आला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. मुळात ‘एनजीपीडीए’ची ही जागा ‘रूआ दे ओरेम’ खाडीशी संबंधित आहे. या खाडीला भरती ओहोटीचा प्रभाव जाणवत असल्याने या प्रकल्पामुळे या भागांत पुराची समस्या जाणवेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. पणजीत कचर्याची समस्या आधीच बिकट बनली आहे व त्यामुळे या नव्या प्रकल्पात कचरा विल्हेवाटीची काय सोय असेल, याचाही उलगडा झालेला नाही, असेही ते म्हणाले.
या ठिकाणी पाच विद्यालये, लहानमोठी हॉटेल्स व इतर व्यापारी संकुले असल्याने या प्रकल्पामुळे निर्माण होणारा अतिरिक्त ताण रूआ दे ओरेम रस्ता कसा पेलेल, याचीही चिंता या भागातील लोकांना लागून राहिली आहे. या प्रकल्पाचा स्थानिकांना कोणताच लाभ होणार नसेल तर त्याचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला. येथील हस्तकला महामंडळाचा ‘शिल्पग्राम’ हा प्रकल्पही ‘पीपीपी’ पद्धतीवर उभारण्यात येणार आहे व त्यामुळे मळावासीयांना घरातून बाहेर पडणेच मुश्कील होईल, असेही श्री. चोडणकर म्हणाले. येत्या १८ रोजी बोलावण्यात आलेल्या बैठकीत या सर्व विषयांवर सखोल चर्चा होणार असून या बैठकीला मळा तसेच पणजी भागांतील स्थानिकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Monday, 11 July 2011
जनताच धडा शिकवेल
फ्रान्सिस डिसोझा यांचा खणखणीत इशारा
सडा वास्कोत माध्यमप्रश्नी प्रचंड मोर्चा
मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
वास्को, दि. १० (प्रतिनिधी)
कुठल्याही समाजाला संपवायचे असल्यास त्या समाजाच्या संस्कृतीवर प्रथम हल्ला करावा याची जाणीव गोव्याच्या कॉंग्रेस सरकारला पूर्णपणे असल्याने त्यांनी माध्यम प्रश्नावरून कोकणी व मराठी भाषेवर हल्ला केलेला आहे. राज्याची भाषा हेच राज्याचे प्रथम व खरे अस्तित्व असून दिगंबर सरकारने कोकणी व मराठीवर केलेल्या आक्रमणाला योग्य धडा जनताच शिकवेल असा खणखणीत इशारा आज वास्कोत म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी दिला.
प्राथमिक भाषा माध्यम प्रश्नावरून गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून संपूर्ण गोव्यात आंदोलने छेडण्यात येत असून आज ‘सडा नागरिक कृती समितीने’ ह्या भागात सरकारच्या निर्णयाविरुद्ध भव्य असा मोर्चा काढला. सडा येथील सरकारी विद्यालयाकडून काढण्यात आलेल्या ह्या मोर्चात ह्या भागातील शेकडो वृद्ध, महिला, पुरुष तसेच विद्यार्थिवर्गाची उपस्थिती दिसून आली. ह्या मोर्चाच्या दरम्यान बनवण्यात आलेला गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याला फटकेही मारण्यात आले. ‘एक दोन तीन चार, मराठी, कोकणी भाषेचा जयजयकार’ अशा वेगवेगळ्या घोषणांनी काढण्यात आलेल्या भव्य अशा मोर्चाची शेवटी सडा येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरासमोर सांगता करण्यात आली. यानंतर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत म्हापसाचे आमदार श्री. डिसोझा यांच्याबरोबर मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, गोवा शिवसेना प्रमुख रमेश नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे संजय सातार्डेकर, मुरगावचे माजी नगरसेवक तसेच ज्येष्ठ नागरिक रमाकांत रेवणकर, माजी नगरसेविका अर्चना कोचरेकर, उल्का गावस, श्रीकांत धारगळकर तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थित नागरिकांशी बोलताना आमदार डिसोझा यांनी, माध्यम प्रश्नावरून सरकारने घेतलेला निर्णय गोव्याची संस्कृती पूर्णपणे मिटवण्याचा असल्याचे सांगून अशा प्रकारच्या अपराधाचा जनतेने निषेध करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस सरकारकडून करण्यात येत असलेले विविध भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जनतेत वाद निर्माण करून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचाही हा एक प्रयत्न असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. येणार्या काळात अशाच प्रकारे हे सरकार गोव्याचे अस्तित्व मिटवणार असून यंदाचे वर्ष गोव्याच्या इतिहासाचे सुवर्ण वर्ष असून आनंद साजरा करण्याऐवजी आपली भाषा वाचवण्यासाठी जनतेला रस्त्यावर येणे यासारखी लज्जास्पद गोष्ट आणखीन काय असेल असा सवालही श्री. डिसोझा यांनी केला. ह्या सरकारला खरोखरच धडा शिकवण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. एवढी वर्षे कॉंग्रेस सरकारने गोव्यात राज्य करूनही गोव्याची प्रगती झालेली नाही. आता तर ते भाषेवरही हल्ला करत आहेत. त्यामुळे आता जनता गप्प बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोकणी व मराठी भाषेवर हल्ला करून ह्या सरकारने पुन्हा एकदा दोन धर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डिसोझा यांनी केला.
मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी, आमच्या भाषेचे रक्षण करण्यासाठी आज ही सभा बोलवण्यात आल्याचे सांगण्यास सुद्धा लाज वाटत असल्याचे सांगितले. कामत सरकार याला पूर्ण जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. काही वर्षापूर्वी कोकणी व मराठी या भाषांत वाद निर्माण करून चर्चिल आलेमाव यांनी दोन धर्मात वाद निर्माण केल्याची आठवण श्री. नाईक यांनी करून दिली. याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न चर्चिल करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. इंग्रजी भाषेच्या विरोधात आम्ही नाहीच मात्र प्राथमिक माध्यम आपल्या मातृभाषेत केल्यास भविष्यात याचा मोठा चांगला फायदा विद्यार्थ्याला मिळतो असा इतिहास असल्याचे नाईक यांनी सांगून कामत सरकारने केलेली चूक लवकरात लवकर सुधारण्याची गरज असल्याचे ते शेवटी म्हणाले.
शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख रमेश नाईक यांनी आपल्या भाषणात बोलताना शांत असलेल्या गोव्यातील नागरिकांना विनाकारण ह्या सरकारने क्रोधीत केल्याचे सांगून हे त्यांना महाग पडणार असल्याचा इशारा दिला. इंग्रजी भाषेला आमचा कुठेही विरोध नव्हता, मात्र मराठी व कोकणी भाषेची तुलना करून आमच्या ह्या राजभाषेवरच हल्ला केल्यानेच येथील बहुसंख्याक जनता याविरुद्ध पेटलेली असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस ही फक्त गोव्याला नव्हे तर संपूर्ण भारताला लागलेली कीड असल्याचे श्री. नाईक म्हणाले. जनतेने ह्या सरकारला हाणून टाकण्याची गरज असल्याचे ते शेवटी म्हणाले. सदर सभेच्या वेळी इतर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. सभेच्या नंतर उपस्थित असलेल्या नागरिकांनी लक्ष्मी नारायण देवाशी साकडे घालून कामत सरकारला लवकरात लवकर चांगली बुद्धी देण्याबाबत मागणी केली. तसेच येथे असलेला चपलांचा हार घातलेला मुख्यमंत्र्यांचा पुतळा शेवटी दहन करण्यात आला.

सर्वच पालकांची मते जाणून घ्या - करमली
माध्यमप्रश्नी शिक्षणखात्याकडून दिशाभूल
• ११९२ पैकी फक्त १४५ शाळांचे अर्ज गृहीत
पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
गोवा सरकारने काही नतद्रष्टांच्या दबावाला बळी पडून गोव्यातील प्राथमिक शाळांचे माध्यम इंग्रजी करण्याचा जो घोळ घातला आहे, त्या बाबतीत सरकार सगळ्यांचीच दिशाभूल करीत आहे, असा आरोप ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला.फक्त १४५ नव्हे तर सर्व ११९२ प्राथमिक शाळांतील पालकांची मते जाणून घेतल्यास मराठी व कोकणी या स्थानिक भाषांचीच सरशी होईल, असा दावाही श्री. करमली यांनी केला आहे.हे कटकारस्थान सरकार फक्त सत्ता राखण्यासाठीच करत असल्याचेही ते म्हणाले. शिक्षण खात्याने सरकारची तळी उचलून धरण्यासाठी चर्चच्या नेतृत्वाखालील शाळांनाच या प्रकरणी आपले ईप्सित साध्य करण्यासाठी वापर करण्याचे ठरवले आहे, असे एकंदरीत चित्रावरून स्पष्ट होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
गोव्यात प्राथमिक शाळांची संख्या सुमारे १ हजारापेक्षा अधिक आहे. सरकारने ‘पालकांची निवड’ या गोड नावाखाली या हजारभर प्राथमिक शाळांना इंग्रजीतून प्रतिज्ञापत्रे (अर्ज) दिले व त्यात पालकांनी आपल्या मुलांसाठी कोणते माध्यम हवे हे लिहून देण्याचे आदेश दिले. चर्चच्या अखत्यारीतील कॉन्व्हेंट शाळांनी लगेच अर्ज भरून दिले. भाषाप्रेमी पालकांनी मात्र हे अर्ज कोकणी व मराठी या भाषेतून उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली. तेव्हा सरकारने मराठी व कोकणी भाषेतील अर्ज साध्या कागदावर लिहून त्यांच्या झेरॉक्स प्रती शाळांत दिल्या. (या अर्जावर पालकांनी दूरध्वनी क्रमांक लिहीणे क्रमप्राप्त आहे, मात्र इंग्रजी अर्जावर तो नाही) चर्चच्या अखत्यारीतील शाळांमध्ये पालकांवर दबाव आणून इंग्रजीच माध्यम हवे असे पालकांकडून लिहून घेण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार १४५ शाळांच्या पालकांनी इंग्रजी माध्यम हवे आहे मात्र गोव्यात ११९२ प्राथमिक शाळा असताना फक्त १४५ शाळांतील पालकांची मते (?) ग्राह्य धरून श्रीमती पिंटो यांनी समस्त गोवेकरांची धजाच उडवली आहे अअसा आरोपही श्री. करमली यांनी केला आहे.
दि. ६ जुलैरोजी शिक्षण उपसंचालकांनी पालकांची प्रतिज्ञापत्रके अजून तपासायची आहेत असे निवेदन पत्रकारांकडे केले होते व शिक्षण संचालनालयात पडून असलेले प्रतिज्ञापत्रकाचे (अर्जांचे) गठ्ठे हे निवेदन सत्य असल्याची जाणीव करून देत होते. या वरून एकतर श्रीमती पिंटो यांनी प्रतिज्ञापत्रके न तपासता माहिती पुरविली किंवा चर्चच्या अखत्यारीतील शाळांची प्रतिज्ञापत्रके वेगळी गोळा करून फक्त तीच नोंद ठेवली असा संशय अनेक पालकांनी व्यक्त केला आहे.
वरील कार्यक्रमात श्री. करमली यांनी हीच माहिती लोकांच्या निदर्शनास आणताना सांगितले की, गोव्यात एकूण १,१९२ प्राथमिक शाळा असताना केवळ इंग्रजी धार्जिण्या १४५ शाळांतील पालकांच्या अर्जांचे भांडवल शिक्षण खाते करत असून उर्वरित शाळांच्या पालकांची मते (जी अजून शिक्षण खात्याकडे जमा झालेलीच नाहीत) गृहीत धरण्याची गरज नाही का? असा प्रश्नही श्री. करमली यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, गोव्यात प्राथमिक शाळा ८३४ मराठी (सरकारी), ४६ मराठी (खाजगी), १३९ कोकणी (खाजगी सरकारी अनुदानित), ३३ कोकणी (सरकारी) व १४० इंग्रजी ( विनाअनुदानित) अशा एकूण ११९२ शाळा आहेत.

विठ्ठल नामे आज दुमदुमणार पंढरी
आषाढी एकादशीदिनी आज भक्तांचा महापूर
गोव्यातही भक्तीला उधाण
पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
हिंदू समाजातील थोर संतमंडळींनी ज्या पांडुरंगाचे गुणगान गात आपल्या वारकरी संप्रदायाची पताका भारतभर फडकावली त्या श्री विठ्ठलाच्या चरणी पंढरपुरात उद्या लाखो भक्तांचा महापूर लोटणार आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातील श्री पंढरपूर क्षेत्र येथील सर्वांत मोठा उत्सव असलेला ‘आषाढी एकादशी’ सोहळा आज साजरा होत आहे.
श्री कृष्णाचा अवतार असा उल्लेख संतमंडळींनी ज्या रखुमाईवराचा केलेला आहे त्या विठुरायाच्या भक्ताच्या भक्तीला तोड नाही. भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या तीरावर भक्त पुंडलिकाच्या सान्निध्यात देशाच्या कानाकोपर्यातून आलेले विठ्ठलभक्त जातीपातीच्या, भाषांच्या भिंती तोडून उद्या सावळ्या विठ्ठलाचा गजर करत ‘विठ्ठलाच्या पायी भक्तीचे स्वर्गीय सुख’ अनुभवणार आहेत. टाळ मृदंगाच्या जयघोषात पाऊस वार्याची तमा न बाळगता गेले कित्येक दिवस पायी पंढरपूरला आलेली संत तथा भक्त मंडळी ‘आनंदाचे डोई आनंद तरंग’ होऊन जाणार आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून तसेच कर्नाटक व गोवा याचबरोबर भारतील अनेक राज्यातून दरवर्षी पंढरपुरात येणारे ‘वारकरी’ आजचा दिवस ‘सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला’ म्हणून जीवनाचे सार्थक करून घेणार आहेत. वारकर्यांच्या दिंड्या ‘जय हरी विठ्ठल’ आणि ‘विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला’ म्हणत गुढ्या व भगवे झेंडे आसमंतात उंचच उंच फडकत श्री विठ्ठल, राही व रुक्मिणी यांचा जयजयकार करणार आहेत. आणि ‘पुंडलीक वर दे हरी विठ्ठल’च्या नादाने भीमातीर मंत्रमुग्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास, संत जनाबाई आदी महान संतांनी रचलेल्या अभंग व कवनांनी सारे पंढरपूर एका वेगळ्याच वातावरणात वावरणार आहे.
१२ व्या शतकात स्थापन झालेल्या वारकरी संप्रदायाची मोहिनी गोव्यातसुद्धा अनेक भक्तांवर आहे. गेल्या काही वषार्ंपासून मुळगाव व माशेल येथून पायी पंढरपूरला जाणार्या पथकांना मोठ्या प्रमाणात भक्तांचा पाठिंबा लाभत आहे. तसेच वैयक्तिकरीत्या दर आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी व अन्य प्रकारे जाणारे अनेक भक्त गोव्यात आहेत.
उत्तर गोव्यातील साखळी येथील श्री विठ्ठल मंदिर हे गोव्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. उद्याच्या दिवशी साखळीतील श्री विठ्ठल मंदिरात अनेक भक्त श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेण्यास येणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)