पार्टी परवानगीबाबत प्रशासन अनभिज्ञ
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून गेली अडीच वर्षे बंद पडलेला हडफडे येथील कथित ‘क्लब क्युबाना’ पुन्हा एकदा संगीत रजनी पार्ट्यांनी गजबजणार आहे. येत्या नवीन वर्षांच्या निमित्ताने हा ‘नाईट क्लब’ सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून प्रशासकीय यंत्रणा मात्र त्याबाबत अद्याप अनभिज्ञ असल्याची खबर मिळाली आहे.
हडफडे येथील ‘क्लब क्युबाना’ हा संगीत रजनी पार्ट्यांसाठी प्रसिद्ध होता. हा क्लब बेकायदा कार्यरत असल्याची याचिका हेमंत शिरसाट यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती. या क्लबच्या कारभाराबाबत अनेक गैरप्रकार चौकशीत आढळून आल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशावरून हा क्लब बंद करण्याचा अंतरिम आदेश जारी करण्यात आला होता. दरम्यान, हा क्लब पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या क्लबचे मालक डेनियल शाह यांनी अलीकडेच ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्क संकेतस्थळावर नवीन वर्षांच्या निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १ जानेवारी २०११ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पार्टी आयोजित केल्याची जाहिरात केली आहे. ’’ Club Cubana is not open....Yet! Only on New Year Eve - a grand Party!,” असे ‘फेसबुक’ वरील या जाहिरातीत म्हटले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पार्टीबाबत अद्याप प्रशासकीय यंत्रणा मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असल्याची माहिती मिळाली आहे.बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पार्टीबाबत आपल्याला अद्याप कोणतीच माहिती मिळाली नसल्याचे स्पष्ट केले. हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजूनाथ देसाई यांनीही या पार्टीबाबत पोलिस स्थानकाकडे कोणतीही प्रस्ताव सादर झाला नाही, असे सांगितले. नाईट पार्टीबाबत एखादा प्रस्ताव सादर झाला तर तो गृह खात्याकडे पाठवला जातो व गृह खातेच अशा पार्टींना परवानगी देण्याचा निर्णय घेते, असेही ते म्हणाले. दरम्यान, या पार्टीबाबत थेट गृह खात्याकडेही अर्ज सादर केला जाऊ शकतो. अलीकडेच गृह खात्याकडून दोन ‘सेटर्डे नाईट मार्केट’ साठी परवाना दिल्याचे प्रस्ताव पोलिस स्थानकाला कळवण्यात आले होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
हडफडेचे सरपंच आग्नेलो डिसोझा यांच्याशी काही पत्रकारांनी संपर्क साधला असता ‘क्लब क्यूबाना’ सुरू करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. उच्च न्यायालयाने हा क्लब पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याचे कारण सांगून या क्लबच्या सूत्रांनी पंचायतीकडे संपर्क साधला आहे,असेही ते म्हणाले. दरम्यान, नवीन वर्षांच्या पार्टी आयोजनाबाबत मात्र पंचायतीला अद्याप काहीही कल्पना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत सादर करा व नंतरच पुढील निर्णय घेऊ,असे पंचायतीकडून त्यांना सांगण्यात आल्याची माहिती सरपंच डिसोझा यांनी दिली.
याप्रकरणी काही विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा क्लब शेत जमिनीत उभारण्यात आला आहे व सध्या नव्याने तयार करण्यात येणार्या प्रादेशिक आराखड्यात ही जमीन बिगरशेतीत रूपांतरित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी न्यायालयाकडे सादर झालेल्या कागदपत्रांनुसार हा क्लब उभारण्यात आलेले बांधकाम हे फार्महाऊस म्हणून उभारण्यात आले असून त्याचा केवळ राहण्यासाठी वापर करण्याची अट आहे. जिल्हाधिकार्यांनी वितरित केलेल्या सनद आदेशात या जागेचा बिगरशेतीसाठी वापर करण्यास निर्बंध घातले आहेत. तसा वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी पूर्वपरवानगी घेण्याची अट घातली आहे. न्यायालयाने या क्बलवर बंदी घालण्याचे आदेश जारी करताना या ठिकाणी संगीत रजनी पार्ट्या आयोजित करण्यासही मज्जाव केला होता,अशी माहितीही मिळाली आहे.
Monday, 13 December 2010
प्रायोगिक नाटकहे आव्हानच
गिरीश ओक यांचा मनमोकळा संवाद
पणजी, दि. १२ (शैलेश तिवरेकर): प्रायोगिक नाटक म्हणजे कलाकार दिग्दर्शकाबरोबरच प्रेक्षकालाही आव्हान असते. ते तशाच पद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचल्यास त्याचे सोने होते अन्यथा त्याची माती व्हायला वेळ लागत नाही, असे मराठी रंगभूमीवरील दिग्गज नाट्यकलाकार डॉ. गिरीश ओक यांनी आज (दि.१२) सांगितले.
डॉ. ओक म्हणाले की, आज व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात तसा काही फरक राहिलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आजचे प्रेक्षक केवळ विनोदी नव्हे तर वैचारिक नाटकही त्याच आवडीने पाहतात. त्यामुळे स्पर्धात्मक नाटकांचे अनेक प्रयोग होताना दिसतात. आज अनेक युवक या क्षेत्राकडे वळताना दिसतात. विविध विद्यालयांतून प्रशिक्षणही घेतात, परंतु त्यातील अधेर्र्अधिक पडद्याआड जातात. या तरुणांनी स्वतःची प्रतिमा तयार करण्यासाठी काय करावे यावर सांगताना ते म्हणाले की, कोणत्याही गोष्टीत यशस्वी होण्याकरिता मेहनत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नाट्यकलेत स्वतःला टिकवायचे असल्यास भरपूर मेहनत घेणे हाच रामबाण उपाय आहे.
‘तो मी नव्हेच’, ‘यू टर्न’, अशा सरस ५० हुन अधिक नाटकांतून गाजलेले डॉ. गिरीश ओक ‘तुझे आहे तुझ्यापाशी‘ या पु. ल. देशपांडे यांच्या नाटकात भूमिका करत असून त्यानिमित्त ते गोव्यात आले असता त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
नाट्यकलेविषयी कोणत्याही विद्यापीठाची पदवी न घेता नागपूर येथे महाविद्यालयीन काळात असताना विविध नाट्य आणि एकांकिका स्पर्धांंच्या माध्यमातून आपण इथपर्यंत मजल मारली. सुरुवातीला काही काळ डॉक्टरकीचा सराव केला परंतु त्याच्यात मन रमेना म्हणून गाव सोडून मुंबईला आलो. वैद्यकी सोडून नट व्हायला जातो म्हणून लोकांना आश्चर्य वाटले. १९७७ ते ८५ पर्यंत नाटके केली. मग मध्यंतराच्या काळात वाटले की, सगळे सोडून पुन्हा गावाला जाऊन डॉक्टरकीचा सराव करावा. परंतु आज मी समाधानी असून कला क्षेत्रात टिकून राहण्याचा त्यावेळचा माझा निर्णय खरोखरच बरोबर होता हे आता जाणवते, असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. डॉ. ओक यांनी आत्तापर्यंत सुमारे ३० मालिका आणि काही मोजक्या चित्रपटांतूनही भूमिका केल्या. आजच्या युगातील एक अष्टपैलू कलाकार विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत होता. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यातही वेगळाच आनंद वाटला.
डॉ. ओक दिग्दर्शकाबाबत म्हणाले की, नाटक हे कलाकारांचे माध्यम असले तरी पहिले दोन प्रयोग हे दिग्दर्शकाच्या हातात असतात. म्हणूनच एकंदरीत नाटकाचा तोल व्यवस्थित सांभाळण्यासाठी दिग्दर्शकांच्या मताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कारण कलाकार हा आपल्या व्यक्तिरेखेच्या दृष्टिकोनातून नाटकाकडे पाहत असतो तर दिग्दर्शक संपूर्ण नाटकाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहत असतो. आज नाटक हा पूर्णवेळ व्यवसाय असला तरी काही नाटके अशी असतात की त्याकडे केवळ पैशांसाठी म्हणून पाहिले जात नाही. तर अर्थ आणि स्वार्थ अशा दोन्ही गरजा पुरविणारी नाटके असतात. ज्या नाटकांना आपण अजरामर नाटक म्हणू अशा नाटकांतून काम करताना एक आत्मसमाधान मिळत असते.
आज मराठी कलाकार म्हणतो की, मराठी चित्रपटात नवनवीन युवा निर्माते दिग्दर्शक आधुनिक विचार घेऊन येत असल्याने मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. याबाबत ते म्हणाले की आपण चित्रपटांच्या फंदात जास्त पडलेलो नाही त्याची कारणे वेगवेगळी आहेत परंतु ही गोष्ट खरी आहे की चित्रपटांच्या निर्मितीला जरी चांगले दिवस आले असले तरी त्यांना अजूनही म्हणावी तशी चित्रपटगृहे उपलब्ध होत नाहीत. गोव्यातील चित्रपटगृहात तर मराठी चित्रपट चाललेले दिसतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या भवितव्याविषयी न बोललेलेच बरे. सध्या नवीन काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की, साम टीव्ही, स्टार टीव्ही या चॅनलवर मालिका सुरू असून ‘यु टर्न’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’ ही दोन नाटके चालत आहेत.

Sunday, 12 December 2010
हिंदू संघटनांकडून करकरेंच्या जीवास धोका होता : दिग्विजय
नवी दिल्ली, दि. ११: काही हिंदू संघटनांकडून स्वतःच्या जीवाला धोका असल्याची माहिती तत्कालीन महाराष्ट्र ‘एटीएस’चे प्रमुख हेमंत करकरे यांनी २६/११ च्या हल्ल्याच्या काही तास अगोदर आपल्याला दिली होती, असे विधान कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी करून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाने प्रखर टीका केली आहे.
‘२६/११ ला सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान हेमंत करकरे यांच्याशी माझी चर्चा झाली होती. त्याचदिवशी रात्री करकरे शहीद झाल्याचे ऐकून मला धक्काच बसला होता,’ असे दिग्विजयसिंग यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मालेगाव बॉम्बस्फोटात काही हिंदुत्ववादी संघटनांच्या लोकांविरुद्ध तपास करत असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. आपल्याला धमक्या देणारे काही दूरध्वनी येत आहेत. मात्र, ते कोणाकडून येत आहेत हे आपल्याला माहिती नसल्याचे करकरे यांनी मला सांगितले होते. करकरे यांच्या मुलाला दुबईतून एक ५० कोटींचे कंत्राट मिळाले असल्याचा आरोप करणारा एक लेख रा. स्व. संघाशी संबंध असणार्या एका मासिकात छापून आला होता, असेही दिग्विजयसिंग यांनी यावेळी सांगितले.
भाजपा नेते राजनाथसिंग यांच्यासह अनेक जण आपल्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेत असल्याने आपण व्यथित झालो असल्याचेही करकरे यांनी सांगितल्याचा दावा दिग्विजयसिंग यांनी केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी काही जणांना अटक केल्याबद्दल करकरे यांचे अभिनंदन केल्यानंतर आमच्या दोघांमध्ये जवळीक वाढली होती, असेही दिग्विजयसिंग यांनी पुढे सांगितले.
अफझल गुरूला त्वरित फाशी द्या
नवी दिल्ली, दि. ११: भारतीय लोकशाहीचे मंदिर असणार्या संसदभवनावर अतिरेकी हल्ल्याचा कट रचणार्या अफझल गुरूला तात्काळ फासावर लटकवून याप्रकरणी आपण गंभीर असल्याचे सरकारने दाखवून द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय दहशतवादविरोधी मंचाचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांनी आज केली आहे.
२६/११ आणि वाराणसी स्फोटासारख्या घटना अजूनही घडत आहेत. मग सरकारच्या दहशतवादविरोधी लढाईला काय अर्थ आहे, असा सवाल बिट्टा यांनी १३ डिसेेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांनी काढलेल्या निषेध मोर्चाला संबोधित करताना सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत अफझल गुरूला १३ डिसेंबरलाच फासावर लटकवा, अशी मागणी बिट्टा यांनी यावेळी केली.
आपल्या या मागणीच्या समर्थनार्थ बिट्टा यांनी आज आपले कार्यकर्ते आणि पीडित कुटुंबातील सदस्यांसह दिल्लीस्थित जंतरमंतर येथे निदर्शने केली.
अफगाणिस्तानातील बॉंबस्फोटात १५ ठार
कंदाहर, दि. ११ : दक्षिण अफगाणिस्तानमध्ये रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट झाल्याने एका मुलासह १५ नागरिक ठार झाले असून, तालिबानी अतिरेक्यांनी हा स्फोट घडवून आणला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हेलमांड प्रांतातील खैराबाद येथून खानसिन या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एका ट्रकला अतिरेक्यांनी आपले लक्ष्य केले. काल रात्री झालेल्या या घटनेत अतिरेक्यांनी गावठी बॉम्बचा उपयोग केला, असे या प्रांताचे प्रवक्ते दाऊद अहमदी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या स्फोटात आणखी चार जण जखमी झाले आहेत.
बेजबाबदारपणाचा कळस भाजपची प्रखर टीका
नवी दिल्ली, दि. ११ : मुंबईवरील २६|११ च्या हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन महाराष्ट्र ‘एटीएस’चे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी केलेले विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे असून, दहशतविरोधात भारताने सुरू केलेल्या लढाईला त्यामुळे जबर धक्का बसल्याची प्रखर टीका भाजपने केली आहे.
दिग्विजयसिंग यांनी केलेल्या या बेजबाबदार वक्तव्यप्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी आज केली आहे. दिग्विजयसिंग यांचे हे विधान अत्यंत दुर्दैवी असून त्यामुळे देशाची सुरक्षा आणि मुंबई हल्ल्याच्या तपासाला
जबर धक्का बसला आहे. दिग्विजयसिंग यांच्या या वक्तव्यामुळे सीमेपलीकडील दहशतवाद्यांना आयते कोलित हाती लागले असून, आता ते २६/११ च्या हल्ल्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात, असे प्रसाद यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याने अडचणीत आलेल्या कॉंग्रेस आणि ‘संपुआ’ सरकारपासून सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा दिग्विजयसिंग यांनी जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न आहे, असा आरोपही प्रसाद यांनी केला. कॉंग्रेसमध्ये एकाकी पडल्याने लक्ष वेधण्याचा दिग्विजयसिंग यांचा हा प्रयत्न आहेे. देशाची सुरक्षितता धोक्यात आणून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा दिग्विजयसिंग यांनी यासाठी वेगळ्या मार्गांचा अवलंब करावा, असा सल्लाही प्रसाद यांनी यावेळी दिला.

जकात खात्याची इमारत पर्वरी येथे जमीनदोस्त
सुदैवानेच प्राणहानी टळली
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): पर्वरी येथे जकातखात्याच्या निवासी वसाहतीतील देखभालीविना जीर्ण झालेली तीन मजली इमारत आज सकाळी पावणे सातच्या सुमारास अचानकपणे कोसळली. त्यामुळे या भागात एकच हलकल्लोळ उडाला. या इमारतीची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन तेथे वास्तव्य करणार्या दोन कुटुंबांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच आपला बाडबिस्तरा अन्यत्र हालवल्याने सुदैवाने प्राणहानी टळली. याच इमारतीच्या दुसर्या बाजूला राहणार्या तीन कुटुंबांना मात्र या घटनेनंतर तात्काळ सदनिका खाली करण्याचे आदेश जारी करून संभावित धोका टाळण्यात आला.
या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार जकात खात्याच्या मालकीची ही निवासी वसाहत असून तिथे फार पूर्वीपासून कर्मचार्यांसाठी या सदनिका बांधण्यात आल्या आहेत. दरम्यान, या सदनिकांच्या देखभालीकडे मात्र खात्याने पूर्णपणे दुर्लक्ष चालवले आहे. या सदनिकांच्या देखभालीची जबाबदारी केंद्रीय बांधकाम खात्याकडे आहे, परंतु हे खाते केवळ रंगरंगोटी व ‘पॅचअप’ करून वेळ मारून नेत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. आज अपघातग्रस्त झालेली इमारत अत्यंत धोकादायी बनली होती. ती कधीही कोसळू शकते हे लक्षात घेऊनच तेथे वास्तव्य करणार्या दोन कुटुंबांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच आपल्या सदनिका खाली केल्या होत्या. या वसाहतीत जीर्णावस्थेत असलेल्या अन्य एका इमारतीतील कुटुंबांनाही आजच्या घटनेनंतर बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आज सकाळी या घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलिस व म्हापसा अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या धोकादायक इमारतीच्या दुसर्या बाजूला वास्तव्य करणार्या तीन कुटुंबांचे सामान तात्काळ बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही यावेळी सामाजिक जबाबदारी ओळखून मदतकार्यात हिरिरीने भाग घेतला. दोड्डामणी व प्रकाश राव तसेच अन्य एक कुटुंब या कोसळलेल्या इमारतीच्या दुसर्या बाजूला राहत होती. दोड्डामणी हे सकाळी पावणे सातच्या सुमारास दूध आणण्यासाठी गेले असता अचानक त्यांना इमारत कोसळत असल्याचे जाणवले. इमारत कोसळत असताना अचानक वरून मातीचा धूर येत असल्याचे पाहत असतानाच अचानक ‘घस्’ असा आवाज करीत या इमारतीचा स्लॅब खाली कोसळला. या क्षणी नेमके काय होते हेच आपल्याला कळले नाही. आपले कुटुंब इमारतीत होते व हा प्रकार पाहून आपल्याला रडूच कोसळले, असे दोड्डामणी म्हणाले. इमारत पूर्ण जमीनदोस्त झाली असती तर काय झाले असते याचा विचारही मनात आला की थरकाप उडतो, असेही ते म्हणाले. ही संपूर्ण इमारतच खाली कोसळळी असती तर अनर्थ घडला असता.
दरम्यान, या घटनेमुळे या वसाहतीतील धोकादायक इमारतींचा विषय आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सदनिकांची बिकट अवस्था पाहता त्यात वास्तव्य करणार्या कुटुंबीयांच्या जिवाशी एक प्रकारे खेळ सुरू असल्याचेच उघड झाले आहे. या परिस्थितीकडे कुणाचेही लक्ष नसून या घटनेमुळे जकात खातेही खडबडून जागे झाले आहे. या धोकादायक इमारतीमुळे काही लोकांनी सदनिका खाली करूनही जकात खात्याकडून नव्या लोकांना या सदनिका बहाल करण्यात आल्याचीही खबर मिळाली आहे. या इमारतीची परिस्थिती पाहून या लोकांनी या सदनिकांचा ताबा घेतला नाही म्हणूनच त्यांचा जीव वाचला,अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षांपासून या इमारतींची कोणतीच देखभाल करण्यात आलेली नाही. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या इमारतींच्या देखभालीची जबाबदारी असून त्यांना अनेक निवेदने देऊनही कुणीही याची दखल घेण्यास राजी नसल्याचे ते म्हणाले. १९८२ च्या आसपास या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर एकदाही या इमारतींची महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली नाही. म्हापसा अग्निशमन दल व पर्वरी पोलिसांनी यावेळी तत्परता दाखवून मदतकार्य केले.

चर्चिल यांच्या मुक्ताफळांमुळे कारवारात संतापाची लाट..!
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): कर्नाटकातील कारवार भाग कोकणीभाषक असून विकासापासून वंचित राहिल्याने तेथील लोकांचा पाठिंबा मिळाल्यास कारवारचा भाग गोव्याला जोडण्यासाठी कायदेशीर लढा उभारू, या चर्चिल आलेमाव यांच्या वक्तव्यामुळे कारवार भागात संतापाची लाट निर्माण झाली आहे. याप्रकरणी माधव नाईक यांनी कारवार सदाशिवगड पोलिस स्थानकांत तक्रार नोंदवून चर्चिल यांनी स्फोटक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अलीकडेच कारवार भागातील कोकणीभाषक मंडळींनी सदाशिवगड येथे खास मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना आमंत्रित केले होते. या मेळाव्यात भाषण करताना चर्चिल यांनी कारवार गोव्यात सामील करण्यासंबंधी या मंडळींच्या लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केला होता. कारवारात बहुसंख्य लोक कोकणीभाषक आहेत. त्यामुळे कर्नाटकापेक्षा या लोकांचा ओढा गोव्याकडे आहे. या लोकांनी पाठिंबा दिल्यास त्यासाठी आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ही मागणी पदरात पाडून घेण्यास तयार आहोत,असेही चर्चिल म्हणाले होते.
मात्र चर्चिल यांच्या या वक्तव्यामुळे कन्नडभाषकांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. कर्नाटकाच्या कारभारात चर्चिल यांनी नाक खुपसण्याचे काहीही कारण नसून त्यांनी स्वतःच्या राज्याकडेच लक्ष द्यावे,असा सल्ला या मंडळींनी दिला आहे. यासंबंधी पोलिस तक्रार दाखल झाल्याने चर्चिल यांच्यासाठी हे भाषण अडचणीचे ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ज्या लोकांना गोवा जवळचा वाटतो त्यांनी तेथे स्थलांतर करून वास्तव करावे; पण कारवार भाग गोव्याला जोडण्याची स्वप्ने पाहू नये,असा सज्जड इशारा तेथील काही समाज संघटनांनी दिला आहे. कारवारात बहुभाषिक लोक वास्तव्य करतात. तेथे ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गोव्यातील राजकारण्यांनी येथे येऊन या लोकांत फूट पाडण्याचे प्रयत्न करू नयेत; अन्यथा त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा कारवारवासीयांनी दिला आहे.

‘एनएसजी’तर्फे गोव्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोव्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (‘एनएसजी’) पाच सदस्यीय पथक काल १० रोजी गोव्यात दाखल झाले. कॅप्टन सुरज रे लाला यांच्या नेतृत्वाखालील हे पथक येथील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून त्यासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानुसारच गोव्यातील सुरक्षेसंदर्भाचा आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आज ‘एनएसजी’ च्या पथकाने पर्वरी मंत्रालय व सचिवालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. गोवा पोलिस सुरक्षा विभागाचे निरीक्षक किरण पडवळ हे त्यांच्यासोबत होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर किनारी राज्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता व ही जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा दलाकडे सोपवली आहे. गोव्यासह महाराष्ट्र, गुजरात व दमण व दीव आदी भागांचा यात समावेश आहे.
दरम्यान, उद्या १२ रोजी या पथकाकडून राजभवन तथा विविध किनारी भागांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. गोवा हे दहशतवादी संघटनेच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याचे यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी अनेकदा सांगितले आहे. त्या अनुषंगानेच गोव्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याच्या दृष्टीने या पथकाची ही भेट असल्याचे सांगण्यात आले.
राजभवनची सुरक्षा गोवा पोलिसांकडे!
राजभवनाच्या सुरक्षेसाठी सध्या केंद्रीय राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. ही तुकडी हटवून यापुढे राजभवनाच्या सुरक्षेची जबाबदारी गोवा पोलिसांकडे देण्याचा विचार सुरू आहे. गोवा पोलिस खात्याच्या भारतीय राखीव दलाकडे ही कामगिरी सोपवली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाकडूनही यासंदर्भात आपली सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली जाणार आहे. राज्यपालांच्या सुरक्षेतही कपात करण्याचा प्रस्ताव असून त्यांना सध्या लागू असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा काढून घेण्याचे ठरले आहे, असेही कळते. दरम्यान, सध्या गोव्यात नाताळ व नवीन वर्षांचा उत्साह असल्याने तोपर्यंत सध्याची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. पुढील वर्षांच्या प्रारंभी ही सुरक्षा गोवा पोलिस खात्याच्या ताब्यात येण्याचा संभव आहे.

४४० जीवरक्षक सेवेत बिनशर्त रुजू
दमदार नेतृत्वाअभावी आंदोलन बारगळले
पणजी,द. ११ (प्रतिनिधी): जीवरक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनातील असंघटीतपणाचा लाभ उठवत 'दृष्टी स्पेशल सर्व्हिस प्रा. ली' या कंपनीने अखेर हे आंदोलन मोडीत काढण्यात यश मिळवले आहे. जीवरक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले असून उद्या १२ रोजी सर्व कामगार बिनशर्त सेवेत रुजू होणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी व्ही. कन्वर यांनी दिली.
राज्यातील किनारी भागांत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन खात्यातर्फे 'दृष्टी' या कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीतर्फे विविध किनारपट्टीवर जीवरक्षकांची भरती केली आहे. गेल्या आठवड्यात कंपनीच्या एका अधिकार्याकडून एका कामगाराला मारहाण करण्यात आल्याने बहुतांश कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यानिमित्ताने कंपनीकडून या कामगारांची पिळवणूक होत आहे व त्यांना मिळणारा पगारही अल्प असल्याची तक्रार या कामगारांनी केली होती.
या कामगारांनी सरकारकडे मध्यस्थी करण्याची केलेली मागणी राज्य सरकारतर्फे धुडकावून लावण्यात आल्याने हे कामगार एकाकी पडले होते. आंदोलनासाठी कामगारांकडे दमदार नेतृत्व नसल्याने कंपनीने हे आंदोलन मोडीत काढले आहे. नव्यानेच भरती केलेल्या कामगारांना सेवेतून निलंबित केल्यानंतर व नव्याने जीवरक्षकांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर या आंदोलनात फूट पडली. टप्प्याटप्पाने उर्वरित कामगारही सेवेत रुजू होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अखेर या कामगारांनी माघार घेणे पसंत केले. सेवेतून काढून टाकलेल्या ५४ जीवरक्षकांना परत भरती करून घेणार नाही, अशी भूमिका कंपनीने घेतली आहे.
सध्या ४४० जीवरक्षक कंपनीकडे असून अतिरिक्त जीवरक्षकांची भरती लवकरच केली जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण सहकार्य केल्याचा दावा कंपनीने केला आहे. या काळात कंपनीतर्फे मुंबईहूनही काही कामगारांना गोव्यात पाचारण करून त्यांना किनारपट्टीवर रुजू केल्याची माहिती मिळाली आहे. कामावर रुजू झालेल्या कामगारांच्या सुरक्षेसंबंधी पोलिसांना विनंती करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

‘विजित’ गस्तीनौकेचे शानदार जलावतरण
गोवा शिपयार्डच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा
वास्को, दि. १० (प्रतिनिधी): गोवा शिपयार्डनेबांधलेल्या ‘आयसीजीएस’ ‘ विजित’ या अत्याधुनिक गस्तीनौकेचे जलावतरण आज संरक्षण राज्यमंत्री एम. एम. पल्लम राजू यांच्या हस्ते शिपयार्डमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात पार पडले. नंतर सदर गस्तीनौका भारतीय किनारारक्षक दलात सामील झाली. या कामगिरीमुळे गोवा शिपयार्डच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
या जलावतरण कार्यक्रमावेळी भारताचे न्यूझीलंडमधील उच्चायुक्त सुरेश मेहता, खासदार फ्रान्सिस सार्दिन, किनारारक्षक दलाचे व्हाईस ऍडमिरल ए. के. चोप्रा, नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्लई, गोवा शिपयार्डचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विनीत बक्षी, केंद्र, राज्य प्रशासनातील व हवाई, किनारारक्षक दल तसेच लष्करातील उच्चाधिकारी उपस्थित होते.
या नौकेमुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीची सुरक्षायंत्रणा आणखी भक्कम झाली आहे.
या अत्याधुनिक गस्तीनौकेच्या बांधणीद्वारे अशा प्रकारच्या नौका बांधण्याची आपली क्षमता गोवा शिपयार्डने सिद्ध केली आहे. शिपयार्डमधील आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर दर्जा राखण्यासंबंधी शिपयार्डने केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे श्री. राजू यांनी अभिमानपूर्वक नमूद केले.
घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमची किनारी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली असून, ती मजबूत करण्यासाठी संबंधितांशी चर्चा सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ नऊ महिन्यांच्या अंतरात गोवा शिपयार्डने बांधलेल्या दोन सागरी गस्तीनौका भारतीय किनारारक्षक दलाला प्रदान करण्यात आल्या आहेत. यापूर्वी १७ मार्च २०१० रोजी पहिली गस्ती नौका आयसीजीएस ‘विश्वस्त’ चे जलावतरण झाले होते. आयसीजीएस ‘विजित’ उद्या हस्तांतरणानंतर राष्ट्रीय सागरी संपत्ती व मालमत्तेची सुरक्षा करण्याच्या ताफ्यात सहभागी होईल.
गोवा शिपयार्डने आत्तापर्यंत १८८ नौका बांधल्या असून त्यात समुद्रातील गस्ती नौका, क्षेपणास्त्रयुक्त नौका, सर्वेक्षण नौका, खलाशी प्रशिक्षण नौका, गतिमान गस्ती नौका, अतिजलद आक्रमण करणार्या नौका आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे १०० पेक्षा जास्त ‘ग्लास रिएनफोर्सड प्लॅस्टिक’ वेगवान गस्तीनौका १९६४ पासून देशाला अर्पण करण्यात आल्या आहेत.
-----------------------------------------------------
आधुनिक उपकरणांनी सज्ज आहे ‘विजित’
ही आधुनिक पद्धतीची गस्ती नौका ९० मीटर लांब आहे. त्यात इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टम व प्लॅटफॉर्म व्यवस्थापन सिस्टम या सुविधांचा समावेश आहे. दोन एमटीयू इंजिन्स असलेल्या या गस्तीनौकेची क्षमता २६ नॉट्स व गती ४५०० नॉटिकल माइल्स आहे. या नौकेवर घुसखोरांना कंठस्नान घालण्यासाठी ३० मिलीमीटरची स्वयंचलित गन बसवण्यात आलीआहे. हेलिकॉप्टर ऑपरेशनसाठी तिचा वापर होणार आहे. त्याखेरीज प्रदूषण नियंत्रण, अग्निशमन, शोध आणि बचाव कार्यासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध असलेली ही जागतिक स्तरावरील एकमेव नौका होय.

२६/११ नंतर कॉंग्रेसने धर्माचे राजकारण केले
विकिलिक्सने केला सनसनाटी गौप्यस्फोट
वॉशिंग्टन, दि. ११ : मुंबईवर २६/११रोजी झालेल्या हल्ल्यात काही हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याच्या बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या विधानाचा हवाला देत कॉंग्रेस नेतृत्वाने देशात धर्माचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट ‘विकिलिक्स’ या वेबसाईटने अमेरिकेच्या गोपनीय कागदपत्रांच्या आधारे केला आहे.
‘तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री ए. आर. अंतुले यांनी हे वादग्रस्त विधान केल्यानंतर प्रथम कॉंग्रेसने स्वत:ला त्यापासून दूर ठेवले. मात्र, दोनच दिवसांनंतर या विधानाला छेद देणारे विधान करून अंतुले यांच्या विधानाला पाठिंबा दिला. त्यावेळी अंतुले यांच्या वादग्रस्त विधानाला भारतीय मुस्लिम समाजाकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता’, असे अमेरिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत डेव्हिड मलफोर्ड यांनी २३ डिसेेंबर २००८ ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाठविलेल्या केबलमध्ये म्हटले आहे, असा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे. या गोष्टीचा २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत फायदा मिळेल, असा विचार करून कॉंग्रेसने प्रथम खंडन केल्यानंतर पुन्हा या विधानाला पाठिंबा दिला, असेही मलफोर्ड यांनी पुढे म्हटले असल्याचे विकिलिक्सच्या खुलाशावरून स्पष्ट होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी अंतुले यांच्या विधानाचे स्पष्टपणे खंडन केल्यानंतरही सुरक्षा यंत्रणा आपल्याला उगाचच लक्ष्य करत असल्याची भावना मुस्लिम समुदायाच्या मनात राहील आणि पर्यायाने याचा फायदा निवडणुकीत आपल्याला मिळेल, असा कॉंग्रेसचा विचार होता. जाती आणि धर्मावर आधारित राजकारण आपल्या हिताचे असेल तर कॉंग्रेस पक्ष स्वत:ला त्यामध्ये पूर्णपणे झोकून देतो, असेच या संपूर्ण घटनाक्रमावरून सिद्ध होत असल्याचे डेव्हिड मलफोर्ड यांनी पाठविलेल्या केबलमध्ये म्हटले असल्याचे, विकिलिक्सने काल आपल्या वेबसाईटवर केलेल्या खुलाशात म्हटले आहे.
अमेरिकेच्या नवी दिल्ली येथील दूतावासाकडून पाठविण्यात आलेल्या १३०० केबल्स आपल्याकडे असल्याचा दावा विकिलिक्सने केला आहे. मात्र, यापैकी फक्त सहाच केबल वेबसाईटवर सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी शहीद होणे हा केवळ योगायोग असल्याचे कॉंग्रेसने पहिले म्हटले होते. परंतु, अंतुले यांच्या विधानाला पाठिंबा मिळत असल्याचे ध्यानात आल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना याचा राजकीय फायदा घेण्याची कल्पना सुचली. या हल्ल्यापूर्वी झालेल्या काही विधानासभांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतरही कॉंग्रेसने मुंबई हल्ल्यासंदर्भात एक संशयाचे वातावरण तयार करून स्वार्थी राजकारण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली, असे मलफोर्ड यांनी पाठविलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी चौकशीत सहकार्य : ए. राजा
चेन्नई, ११ डिसेंबर: २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आपण पूर्णपणे निर्दोष आहे, असा दावा माजी केेंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी पुन्हा एकदा केला असून, हे सिद्ध करण्यासाठी या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.
‘सीबीआय सध्या २-जी स्पेक्ट्रमसंबंधीच्या सगळ्या कागदपत्रांची छाननी करत आहे. सीबीआयची तपास करण्याची जी कोणती कार्यपद्धती असेल त्यात पूर्णपणे सहकार्य करण्यास मी तयार आहे’, असे ए. राजा यांनी काल येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या घोटाळ्यासंबंधी सीबीआयने राजा यांच्या नवी दिल्ली आणि चेन्नई येथील निवासस्थानांवर टाकलेल्या धाडीसंबंधी विचारले असता, कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. त्यामुळे सीबीआयला जी कोणती मदत पाहिजे असेल ती करण्यास मी तयार आहे, असे राजा यांनी सांगितले.
स्पेक्ट्रम घोटाळ्यासंबंधी सीबीआयने ८ डिसेेंबरला ए. राजा आणि दूरसंचार खात्याच्या इतर चार अधिकार्यांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. याशिवाय राजा यांचा भाऊ आणि बहीण यांच्या तिरुचिरापल्ली व चेन्नई येथील निवासस्थानांची देखील झडती घेतली होती. सीबीआयने राजा यांचा निकटवर्ती असलेला सादिक पाशा याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती. या धाडसत्रात काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळल्याचा दावाही सीबीआयने केला होता.

Subscribe to:
Posts (Atom)