पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)ः माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक मिनीन पिरीस यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी गोवा हस्तकला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा गोवा मनोरंजन संस्थेचे सरव्यवस्थापक निखिल देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आज कार्मिक खात्यातर्फे यासंबंधीचा बदली आदेश जारी करण्यात आला. गोवा हस्तकला महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा ताबा उद्योग खात्याचे संचालक सखाराम नाईक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मनोरंजन संस्थेच्या सरव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त ताबा निखिल देसाई यांच्याकडेच राहणार आहे. मिनीन पिरीस यांना अद्याप कोणतेही पद बहाल केले गेले नसून कार्मिक खात्याशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.
कायदा सचिवपदी उत्कर्ष बाकरे?
उत्तर गोवा सत्र न्यायाधीश उत्कर्ष बाकरे यांना पुन्हा एकदा कायदा सचिवपदी आणण्याच्या हालचाली खात्याअंतर्गत सुरू झाल्या आहेत. कायदा खात्याकडून अशा प्रकारचा शेरा मारलेली फाईल सध्या मुख्य सचिव जे. पी. सिंग यांच्याकडे पोहोचल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ही फाईल जरी पोहचली तरी अद्याप आदेश जारी करण्यात आले नसल्याचे श्री. सिंग यांनी सांगून या माहितीला दुजोरा दिला. सध्याच्या कायदा सचिव अनुजा प्रभूदेसाई यांची उत्तर गोवा सत्र न्यायाधीशपदी फेर नेमणूक करण्यात येणार असल्याचे कळते.
Thursday, 24 January 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment