बस आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद
• सरकारची पर्यायी व्यवस्था नाही
• ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल
• अनेक विद्यार्थ्यांची ससेहोलपट
पणजी, दि.१५ (प्रतिनिधी)
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकार चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ आज पुकारलेल्या बस बंद आंदोलनाला संपूर्ण गोव्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरी भागात काही बसेस चालू होत्या तर ग्रामीण भागातील बस सेवा बंद राहिल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अनेकांनी भाड्याच्या वाहनांनी घर गाठले मात्र विद्यार्थ्यांची बरीच ससेहोलपट झाली. संध्याकाळी मात्र बंद मागे घेण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली. यावेळी प्रतिक्रिया देताना बस संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी बंद पूर्णपणे यशस्वी झाला मात्र काही फुटीर बसमालकांनी बसेस चालू ठेवल्याचे सांगितले. तर वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी बंद पूर्णपणे फसल्याचे सांगून गोव्यात सर्वत्र बसेस चालू होत्या व त्या चालू राहाव्यात यासाठी वाहतूक खात्याने पोलिसांच्या मदतीने नियोजन केल्याचे सांगितले.
शहरी बसेस चालू, ग्रामीण बंद
बसेस बंद ठेवल्यास एस्मा (अत्यावश्यक सेवा कायदा) लागू करण्याची व तात्पुरता परवाना घेतलेल्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा सरकारने दिल्याने शहरी भागातील काही बसेस चालू होत्या. यात तात्पुरता परवाना घेतलेल्या बसेसची संख्या जास्त होती. या बसेस चालू राहिल्याने पणजी, म्हापसा आदी शहरी बस स्थानकावर खाजगी व कदंब बसेस दिसत होत्या. मात्र एस्माचा परिणाम ग्रामीण भागातील बसेसवर दिसला नाही. ग्रामीण भागातील बहुतेक बसेस बंद होत्या. ज्या चालू होत्या त्या अर्ध्यावरून परतून गेल्या. वाळपईच्या बसेस साखळीपर्यत, कुंभारजुवेच्या माशेलपर्यंत येऊन पहिली फेरी मारून गेल्या. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांचे दिवसभर अतोनात हाल झाले.
पर्यायी व्यवस्थेबाबत सरकार अपयशी
खाजगी बसेस बंद राहिल्यास पर्यायी व्यवस्था सरकार करेल. तसेच परराज्यातून बसेस आणू, अशी घोषणा वाहतूक खात्याने केली होती. मात्र या बंदला पर्यायी व्यवस्था सरकारकडून झालीच नसल्याने राज्यातील अनेक बस स्थानकावर प्रवासी अडकून पडले. दरम्यान, साखळी येथून माशेल बाणस्तारी येथे जाण्यासाठी जवळजवळ दीड तास बस नसल्याने साखळी आरोग्य केंद्राजवळ उभे राहून कंटाळलेल्या प्रवाशांनी या मार्गावरून पणजीला परतणार्या एका शववाहिकेतून प्रवास करत बाणस्तारी, पणजी गाठली.तर काही लोकांनी या मार्गावरून जाणार्या रेती ट्रकांच्या आधारे आमोणा माशेल भागात जाणे पसंत केले.
ठोस आश्वासन नसूनही बंद मागे
गेले चार दिवस वाहतूक खात्याच्या जुन्ता हाउस येथील कार्यालयासमोर आपल्या मागण्यांवर सरकारने गंभीरपणे विचार करावा म्हणून बस संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर उपोषणाला बसले होते. त्यांना सदस्यांनी साखळी उपोषण करून साथ दिली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज बस बंद आंदोलन पुकारण्यात आहे. त्यामुळे जागे झालेल्या वाहतूक खात्याने बसमालकांना आज दुपारी चर्चेला बोलावले व चर्चा केली. या चर्चेत वाहतूक संचालक अरुण देसाई, उपसंचालक प्रल्हाद देसाई, पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, बस संघटनेचे सल्लागार ऍड. सुभाष सावंत, अध्यक्ष विशाल देसाई, श्री. ताम्हणकर, उत्तर गोवा प्रमुख सुदेश कलंगुटकर आदींनी भाग घेतला. या वेळी बस मालकांच्या सर्व पंधराही मागण्यावर चर्चा करण्यात आली. यातील प्रवासी कर, बसेसवर जाहिराती आदी काही मागण्यांवर वाहतूक संचालकांनी विचार करण्याचे आश्वासन दिले. तर बस स्थानकावर जागा, ‘आरटीए’त संघटनेच्या सदस्यांची नेमणूक आदी काही मागण्या फेटाळून लावल्या. बसमालकांनी ‘सोसायटी’ करून मागण्या पुढे केल्यास त्या लवकर मान्य होतील अशी सूचना श्री. देसाई यांनी केली असता सोसायटी स्थापन करण्यात अडचण ठरणार्या गोष्टींची जाणीव श्री. ताम्हणकर यांनी संचालकांना करून दिली. या वेळी श्री. देसाई यांनी आपण बसमालकांच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी मेरशी मार्गावरील तसेच फोंडा मार्गावरील काही मोजक्याच बसेसना वाहतूक खाते सांभाळून घेत संघटनेच्या सदस्यांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप बसमालकांनी केला. यावेळी वातावरण बरेच तापले. मात्र श्री. देसाई यांनी काही बाबतीत तसे घडल्याचे कबूल केले. मात्र संघटनेच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगून चर्चा संपवली. या चर्चेनंतर बाहेर येऊन श्री. ताम्हणकर यांनी उपोषण मागे घेतल्याचे व उद्यापासून बसेस चालू होणार असल्याची घोषणा केली. या प्रसंगी सुमारे २०० च्या आसपास बसमालक उपस्थित होते.
कुंकळ्ळीत दोघांना अटक
मडगाव, (प्रतिनिधी)
खासगी बसमालकांनी पुकारलेल्या बस बंद आंदोलनाच्या दिवशी बसवाहतूक चालू ठेवलेल्या बसेस अडविल्याबद्दल कुंकळ्ळी पोलिसांनी आज भिवसा-कुंकळ्ळी येथे दोघांना अटक केली. त्यांची नावे नीलेश बाबुसो देसाई व हलेश पुरसो देसाई अशी आहेत. त्यांनी मडगावहून काब द राम येथेे निघालेली बस भिवसा येथे अडविली होती. त्यांच्याविरुद्ध भा.दं.स. कलम ३१ खाली गुन्हा नोंदविलेला आहे.
पेपर लांबणीवर
बस बंदमुळे पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा दि. १५ एप्रिलचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. हा पेपर कधी घेतला जाईल याची माहिती येत्या काही दिवसांत संबंधित सर्व महाविद्यालयांना कळवली जाईल अशी माहिती आज गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. व्ही. पी. कामत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच, उद्या दि. १६ पासून असलेले सर्व पेपर ठरलेल्या दिवशी घेतले जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बस मालकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर झालेल्या परिणामाचा एनएसयुआचे अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी निषेध केला.
Saturday, 16 April 2011
सुनावणीच्या अर्जावरून बाबूश यांना नोटीस?
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी गोव्यात न घेता महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायालयात घेण्यासाठी केलेल्या अर्जावरून शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना नोटीस बजावल्याची जोरदार चर्चा आज सुरू होती. मात्र, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी ‘सीबीआय’शी संपर्क साधला त्याला अधिकृतपणे दुजोरा मिळू शकला नाही. गेल्या आठवड्यात ‘सीबीआय’ने पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी मुंबई घेतली जावी, अशी विनंती करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात केला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित तथा राज्याचे शिक्षणमंत्री असलेले बाबूश मोन्सेरात हे वजनदार व्यक्ती असल्याने ते साक्षीदारावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी गोव्यात न घेता मुंबईत घेतली जावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाकडे केली आहे.

आरियालवासीयांच्या संतापाचा उद्रेक
पंचायत मंडळालाच सभागृहात कोंडले
मडगाव, दि.१५ (प्रतिनिधी)
सां जुझे आरियालमधील ‘त्या’ वादग्रस्त मेगा प्रकल्पप्रकरणी तेथील रहिवाशांच्या सहनशक्तीचा आज अंत झाला. त्यांनी साळावलीच्या ओलितक्षेत्रात उभ्या राहिलेल्या त्या प्रकल्पाला दिलेला परवाना विनाविलंब मागे घ्यावा, अशी मागणी करून पंचायत बैठकीसाठी जमलेल्या संपूर्ण पंचायत मंडळालाच पंचायत घरात कोंडले. रात्री उशिरापर्यंत ही स्थिती तशीच होती.
गेल्या काही महिन्यांपासून या गृहप्रकल्पाविरुद्ध आरियालमध्ये असंतोष खदखदत आहे. कायद्यानुसार ओलितक्षेत्रात घरांच्या बांधकामांना परवाना देता येत नाही; पण आरियालमध्ये मेगा प्रकल्पाला परवाना देण्यात आला. त्यात पंचायतीपासून सर्व सरकारी खाती त्यात सामील झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. याच मुद्याला अनुसरून आधीच्या दोन तीन ग्रामसभा तंग वातावरणात तहकूब झाल्या आहेत.
आपला या प्रकल्पाच्या परवान्याशी संबंध नाही. आधीच्या मंडळाने तो दिला होता आणि तोही नगर नियोजन खात्याच्या शिफारशीवरून अशी भूमिका सध्याच्या पंचायत मंडळाने घेतली आहे. त्यामुळेे विचित्र कोंडी झालेली आहे. गावकर्यांनी त्यानंतर साळावली ओलितक्षेत्र प्राधिकरण, नगरनियोजन खाते याकडे संपर्क साधून परवाना मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आपला सगळा रोख पंचायतीपुरता मर्यादित ठेवला.
आज पंचायत मंडळाच्या बैठकीची संधी साधून नागरिक जमले. त्यांनी पंचायत घराजवळ येऊन सदर मेगा प्रकल्पाचा परवाना मागे घेण्याची मागणी केली. प्रभारी सरपंच व्हिन्सी मास्कारेन्हस त्यांना ठोस आश्वासन देऊ न शकल्याने पंचायत मंडळालाच कोंडून परवाना मागे घेईपर्यंत बाहेर सोडणार नाही, असा इशारा दिला. दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे सर्वत्र खळबळ माजली. मायणा कुडतरीचा पोलिस फौजफाटा तेथे धावून गेला; पण सरपंचांनी त्यांना कोणतीच कृती करू नये असे सांगितल्याने ते गप्प राहिले. रात्री उशिरापर्यंत तशीच स्थिती होती.

अखेर गवाणे खाण बंद
• खाण संचालकांना स्थानिकांचा घेराव
• कोणतेही परवाने नसल्याचे सिद्ध
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
गवाणे सत्तरी येथील चौगुले खाणीला राज्य प्रदूषण मंडळाचे कोणतेही परवाने नसल्याचे आज जनसेवा प्रतिष्ठानने खाण संचालकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर खाण बंद करण्याचे आदेश काढण्यात आले. तसेच, चौगुले खाण व्यवस्थापनाकडे राज्य नियंत्रण मंडळाचे परवाने असल्यास ते सादर करावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
आज सायंकाळी डॉ. क्लॉड आल्वारीस आणि डॉ. दत्ताराम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खाण संचालक अरविंद लोलयेकर यांना घेराव घालण्यात आला. यावेळी येथील स्थानिकांनी संचालक लोलयेकर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. बेकायदा खाणीला खाण संचालनालय संरक्षण देत असल्याचा आरोप यावेळी संचालकांवर करण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून सदर खाण बेकायदा खनिज उत्खनन करीत आहे. त्यांनी परवान्यासाठी अर्ज केला असला तरी त्यांच्याकडे अद्याप कोणतेही परवाने नाहीत. ५४ हजार चौरस मीटर सरकारी जमीनही त्यांनी बळकावली असून तेथेही खनिज उत्खनन केले जात असल्याचा दावा यावेळी डॉ. आल्वारीस यांनी केला. त्यामुळे या खाणीवर त्वरित बंदी घातली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, जोवर खाण बंदचा आदेश काढला जात नाही तोवर येथून हालणार नाही, अशी भूमिका खाणविरोधी कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर अखेर ही बेकायदा खाण बंद करण्याचे आदेश काढण्यात आले.
तीन वर्षांपासून ही खाण सुरू आहे तर, अजून काही दिवस तुम्ही कळ सोसा, असा सल्ला यावेळी खाण संचालकांनी या लोकांना दिला. तसेच, ती खाण बेकायदा असल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नसून त्याबद्दल आपल्याला अभ्यास करावा लागेल, असा युक्तिवाद श्री. लोलयेकर यांनी करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना बरेच फैलावर घेतले. तीन वषार्ंपासून बेकायदा सुरू असलेल्या खाणीबाबत तुम्ही अजूनही कसला अभ्यास करता, असा प्रश्न यावेळी डॉ. देसाई यांनी केला.
या खाणीला स्थानिक आमदारांचे संरक्षण मिळते. त्यामुळे पोलिस स्थानकात तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी विश्वेश परब यांनी केला. दरम्यान, खाण संचालनालयाचे वरिष्ठ तंत्रज्ञान साहाय्यक अधिकारी डॉ. फर्नांडिस यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना मोबाईलवर संपर्क साधला असता या खाणीकडे परवाने नसल्याचे उघड झाले.
दरम्यान, गवाणे खाण बंद करण्याचे आदेश काढण्यात आल्याचे वृत्त पसरताच गवाणेवासीयांनी विजय मिरवणूक काढली. यात वाळपईवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

खारीवाड्यात मासेमारी ठप्प
• जलवाहतूक रोखली
• आज वास्को बंदचे आवाहन
वास्को, दि. १५ (प्रतिनिधी)
पंधरा दिवसांपूर्वी खारीवाडा येथील ६६ घरे बुलडोझरच्या साहाय्याने पाडल्यानंतर उर्वरित घरे वाचवण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्याला सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’ समितीने काल (दि.१४) मध्यरात्री सुरू केलेल्या बेमुदत आंदोलनाला मच्छीमारांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर येथील सुमारे ३०० मासेमारी ट्रॉलर्स व २५० मासेमारी नौका येथील समुद्रात नांगरून मुरगाव बंदराचा (एम.पी.टी) पाण्यातील पूर्ण व्यवसाय पूर्ण ठप्प केला. जोपर्यंत सरकार आमच्या पाच मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून उद्या (दि.१६) वास्को बंदचे आवाहन खारीवाडावासीयांनी केले आहे.
‘एम.पी.टी’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर बंदराच्या विस्तारीकरणासाठी व अन्य कारणांसाठी खारीवाडा येथील जागा रिकामी करून देण्याबाबत याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने पालिकेला याबाबत आदेश जारी केले होते. यानंतरच्या सुनावणीत ज्या घरांनी स्थगिती मिळवलेली नाही त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई का केली नाही असा सवाल करत पालिकेला येथील ६६ घरे पाडण्याचे आदेश दिले होते. सदर ६६ घरे पाडल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला. यातूनच ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’ समितीने गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सदर मुद्यावर तोडगा काढण्याची विनंती काही दिवसांपूर्वी केली असता त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली, मात्र दहा दिवसांहून अधिक वेळ उलटूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे समितीने आजपासून हे आंदोलन छेडले आहे.
या बंदमुळे आज ‘एम.पी.टी’चा पाण्यातील सर्व व्यवसाय ठप्प झाला असून त्यामुळे सुमारे तीन ते चार कोटींपेक्षा जास्त रुपयांची हानी झाल्याचाअंदाज आहे. तसेच ‘एम.पी.टी’ ची पाण्यातील वाट बंद केल्याने गोव्यातील बार्ज मालकांना सुमारे चार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी दिली. खारीवाडा प्रश्नांवर आम्ही सरकारशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान सदर आंदोलनामुळे वास्कोतील मासळी मार्केट तसेच फळबाजारही आज बंद ठेवण्यात आला. खारीवाडा येथील शेकडो महिलांनी पालिकेच्या बाहेर धरणे धरले होते. आज सकाळी ६ वा. आंदोलन करणार्यांनी ‘एम.पी.टी’ च्या गेट क्रमांक ९ बाहेर आपले टेंपो तसेच इतर वाहने उभी करून येथील वाहतूकही ठप्प केली, मात्र १० च्या सुमारास वाहतूक पोलिसांनी सदर मार्ग मोकळा करून दिला. आंदोलनाच्या दरम्यान एम.पी.टी तसेच आंदोलकांत समुद्रात दगडफेक झाल्याची माहिती उघड झालेली असून यात नुकसान झालेले नाही असे सूत्रांनी सांगितले. अनुचित घटना उद्भवू नये म्हणून खारीवाडा मासेमारी जेटीवर कडक पोलिस सुरक्षा तसेच एम.पी.टी च्या धक्क्यावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’ समितीचे फादर बिर्स्माक डायस यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे आंदोलन मागे घेण्णार नसल्याचे स्पष्ट केले. गोव्यातील सर्व मासेमारी गावे पारंपरिक मासेमारी गावे म्हणून जाहीर करा,एमपीटीचे कार्य सध्याच्या क्षेत्रापुरते मर्यादित ठेवा, तात्पुरती स्थगिती मिळालेल्या घरांना कायम करा, गोव्याच्या किनारपट्टीवर असलेली मच्छीमारांची घरे वैध करा, जमीनदोस्त केलेली ६६ घरे बांधून द्या व येथे ठेवण्यात आलेले सर्व राष्ट्रीय सुरक्षा औद्योगिक दलाचे जवान हटवा अशा ह्या पाच मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतसरकार कोणतीच मदत करत नसल्याने सदर आंदोलन छेडण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
दरम्यान आज संध्याकाळी समितीच्या सदस्यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिवांची भेट घेऊन त्यांच्याशी सदर पाच मागण्या ठेवल्या असता मुख्यमंत्री गोव्यात नसून ते आल्यानंतर सदर मागण्या त्यांच्यासमोर ठेवण्यात येणार असे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज पासून बोलावण्यात आलेले आंदोलन येणार्या काही दिवसात आणखीन आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळालेले असूनउद्या सदर आंदोलनात भाजी मार्केटातील व्यावसायिक तसेच इतर काही जण भाग घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, आज संध्याकाळी मुरगाव उपजिल्हाधिकार्यांनी वास्को पोलिसांसोबत खारीवाडा इफेक्टेड पीपल्सची बैठक बोलावली होती. यावेळी हे आंदोलन मागे घ्या असे पोलिसांनी समितीला सांगितले मात्र मुख्यमंत्रीच याबाबत काहीसांगत नसल्याने हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे समितीने सांगितले.
‘एम.पी.टी’कडून अनेक वेळा येथील जनतेला सतावण्यात आलेले असून येत्या काळात त्यांच्या अनेक कृत्यांबद्दल जनता रस्त्यावर येणार आहे. ‘एम.पी.टी’ आपल्या कायदेशीर कामकाजाचा ढोल वाजवत असते, मात्र त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या बेकायदा कृत्यांची कोण दखल घेणार असा प्रश्न मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी केला. खारीवाडाप्रकरणी सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन येथील जनतेच्या हिताचा विचार करणे एकदम गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आमदार श्री. नाईक यांनी व्यक्त केली.

नार्वेकर जन्मतारीख फेरफारीची तक्रार सीबीआयकडे द्या
• शेखर साळकर यांची मागणी
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
माजी मंत्री तथा आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आपल्या मुलाच्या जन्मतारखेत फेरफार करून फसवणूक केल्याच्या तक्रारीवर तपास करण्यास म्हापसा पोलिसांना अपयश आल्याने सदर तक्रार येत्या ४८ तासात गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवावी, अशी मागणी आज (दि.१५) तक्रारदार डॉ. शेखर साळकर यांनी केली. या मुदतीत मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि गृहमंत्री रवी नाईक यांनी हे प्रकरण ‘सीआयडी’कडे न सोपवल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही डॉ. साळकर यांनी आज दिला. ते पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ऍड. नार्वेकर यांच्यावर त्यांनी आरोपांच्या जोरदार फैरी झाडल्या.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. ऍड. नार्वेकर यांचा मुलगा गणेशराज याची जन्म तारीख २८ फेब्रुवारी १९९२ अशी आहे. के. जीमध्येही त्याच्या दाखल्यावर ही जन्मतारीख आहे, असा दावा यावेळी डॉ. साळकर यांनी केला. परंतु, या प्रकरणाची चौकशी करणारे म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेशकुमार हे ‘तो दाखला ऍड. नार्वेकर यांच्या पत्नीनेच शाळेत दिल्याचा काय पुरावा आहे’ असा प्रश्न केल्याची माहिती डॉ. साळकर यांनी दिली. हा दाखला त्यांच्या पत्नीने शाळेत दिला नसल्यास त्या तारखेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी बदल केला आहे का, असा सवाल करत तसे असल्यास पोलिसांनी त्या मुख्याध्यापकाची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. साळकर यांनी केली.
आपण ऍड. नार्वेकर यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्याने आपल्याला तसेच डिचोली क्रिकेट क्लबला लक्ष केले जात असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. त्यामुळे आपण गेल्या २८ ऑक्टोबर रोजी या क्लबच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, येत्या सोमवारी ऍड. नार्वेकर यांनी विशेष कार्यकारिणी बैठक बोलावली आहे. त्यात त्यांनी आपल्यावर कारवाई करूनच दाखवावी, असे जाहीर आवाहन डॉ. साळकर यांनी दिले आहे. आपण आजीवन गोवा क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असून त्यावरून आपल्याला कोणीच हटवू शकत नाही. गेल्या दहा वर्षात ‘बीसीसीआय’कडून गोवा क्रिकेट असोसिएशनला सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी आला आहे. ते शंभर कोटी रुपये ऍड. नार्वेकर यांनी कुठे खर्च केले, याची माहिती त्यांनी उघड करावी. ‘जीसीए’ची वाहने ते आपल्या कुटुंबीयांसाठी वापरत आहेत. प्रत्येक क्लबला लागणारी बॅट आणि बॉल हे त्यांच्या पत्नीकडूनच घ्यावे लागतात. तसेच, नार्वेकर यांचा पर्वरी येथे एक फ्लॅट असून त्याचा ‘जीसीए’साठी गेस्ट हाउस म्हणून वापर करून त्याचेही पैसे कमावले जात असल्याचा आरोप यावेळी डॉ. साळकर यांनी केला. त्याचप्रमाणे एक बस असून ती निवडणुकीच्या काळात शिर्डीला जाण्यासाठी वापरली जाते, असेही ते शेवटी म्हणाले.

Friday, 15 April 2011
फातोर्डा भंगारअड्ड्यावर स्फोटात १ कामगार ठार
दोघे जखमी - टँकर कापताना घडलेली दुर्घटना
मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी)
चंद्रावाडो - आर्ले येथे भरवस्तीत असलेल्या एका भंगारअड्ड्यावर भंगारातील एक पेट्रोल टँकर कापताना त्याच्या एका कंपार्टमेंटचा भयावह स्फोट होऊन १ जण ठार झाला, तर तेथील दोघे कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला बांबोळीच्या ‘गोमेकॉ’ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भंगारअड्डा मालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा ठपका ठेवून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. त्यामुळे सार्या परिसरात घबराट माजली. लोक सैरावैरा पळत सुटले. सदर भंगारअड्डा अमन उल्ला याच्या मालकीचा आहे. तेथे भंगारासाठी आणलेल्या एक टँकरचे पत्रे गॅसकटरने कापून काढत असताना अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, तेथे काम करणारा गिलू पवार (३५, सांगली - महाराष्ट्र) नामक कामगार टँकरवरून सुमारे ५० मीटर दूर उडाला आणि जागीच ठार झाला. विमलेश (५०) व राकेश कुमार (२३) हे उत्तरप्रदेशातील दोघे कामगार गंभीर जखमी झाले. त्यात विमलेश जास्त होरपळल्याने त्याला बांबोळीच्या ‘गोमेकॉ’त उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राकेश कुमारवर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत.
हा भंगारअड्डा भरवस्तीत आहे. त्यामुळे स्फोटानंतर तेथे घबराट माजली. स्फोटानंतर ते तिघेही होरपळलेल्या व रक्तबंबाळ अवस्थेत तेथे पडले होते. मडगाव पोलिसांना व अग्निशामक दलाला याची माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना हॉस्पिसियोत दाखल केले व नंतर स्फोटाचा पंचनामा केला.
आमदार दामू नाईक, पालिका मुख्याधिकारी प्रसन्न आचार्य यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी या स्फोटाची पुढील चौकशी सुरू केली आहे.
भरवस्तीत असलेल्या भंगारअड्ड्यांत आता अशा प्रकारचे टँकर कापण्याची कामे चालतात. त्याकडे संबंधित अधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. त्यातूनच असे भयंकर अपघात घडतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आज टँकर कापताना जो स्फोट झाला त्या टँकरच्या तिन्ही कंपार्टमेंटना छिद्रे पाडून त्यातील वायूला वाट मोकळी करून देण्यात आली होती. तथापि, त्याचा चोरकप्पा तसाच राहून गेला व नेमका तोच स्फोटाचे कारण ठरला. सदर टँकर मळीची वाहतूक करण्यासाठी वापरला जात होता; पण परत गोव्याबाहेर जाताना दारू नेल्याच्या कारणावरून पकडला गेला होता व मोले नाक्यावर तसाच पडून राहिल्यावर त्याचा लिलाव पुकारला गेला. या भंगारवाल्याने तो घेतला व आणून तसाच वर्षभर राहिल्यावर तो कापण्याचे काम हाती घेतले असता सदर स्फोट झाला. त्यानंतर धातू कापण्यासाठी वापरल्या जाणार्या गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाला अशी अफवा सर्वत्र पसरली; पण नंतर तो स्फोट गॅसचा नव्हे तर टाकीचा असल्याचे दिसून आले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
मयेतील आठवणी
ताज्या करणारी घटना
केळबायवाडा - मये येथे ८ एप्रिल रोजी वेल्डिंग करताना अशाच प्रकारे एका जीपवरील केरोसीन टाकीचा स्फोट होऊन कुंदन मोहन मयेकर हा (वय ३२) वेल्डर ठार झाला होता. तसेच वाहनचालक दादासाहेब राणे जखमी झाला होता हे वाचकांना आठवत असेलच. फातोर्डा स्फोट दुर्घटनेमुळे मयेतील अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.

.. तर सरकार पाडू!
कॉंग्रेसमधील दबावगट पुन्हा सक्रीय
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
विदेशी चलन तस्करी प्रकरणाची गंभीर दखल कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतल्याने आपले मंत्रिपद वाचवण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांनी जोरदार ‘लॉबींग’ चालवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. चर्चिल आलेमाव व इतर काही आमदारांना सोबत घेऊन बाबूश यांनी आपल्या विरोधातील कारवाई टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले असून बाबूशच्या मंत्रिपदाला हात लावाल तर सरकार पाडू, अशी गर्भित धमकीच या गटाने मुख्यमंत्री दिगंबर यांच्यापर्यंत पद्धतशीरपणे पोचवल्याची खबर आहे.
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्ध ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई कस्टम्सने तक्रार नोंदवल्याने दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राज्यात भाजपने या विषयावरून रान उठवले आहे. या विषयी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी जगमीतसिंग ब्रार हे आज गोव्यात दाखल होणार होते; पण त्यांची भेट लांबणीवर पडल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. दरम्यान, बाबूश यांचे मंत्रिपद काढून घेण्यात येऊ नये यासाठी कॉंग्रेसच्या काही मंत्री व आमदारांनी एक गट स्थापन करून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर दबाव टाकण्याचे सत्र आरंभले आहे. बाबूश यांच्या मंत्रिपदाला हात लावल्यास सरकार गडगडेल, असाच संदेश त्यांनी श्रेष्ठींपर्यंत पोचवून बाबूश यांना पाठीशी घालण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. आज त्यासंबंधी पणजीत एका बड्या हॉटेलात या नेत्यांची गुप्त बैठक झाल्याचीही माहिती मिळाली आहे.

जुझेंचा पाय खोलात!
मुरगाव पालिकेकडूनही पोलिस तक्रार
वास्को, दि. १४ (प्रतिनिधी)
महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी मुरगाव नगरपालिकेची जागा बेकायदा पद्धतीने आपल्या तसेच आपल्या तीन भावांच्या नावे केल्याचे प्रकरण आता अधिकच रंगू लागले असून आज या प्रकरणी मुरगावच्या नगराध्यक्षा सौ. सुचिता शिरोडकर यांनी जुझेंविरोधात वास्को पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.
काल संध्याकाळी मुरगाव नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत डिसोझा यांच्यावर सदर घोटाळा प्रकरणाबाबत तक्रार नोंद करण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला होता. त्यानुसार, आज त्यांच्यासह त्यांच्यासह त्यांचे बंधू पास्कॉल, क्लेमेन्त व जुझे निक्लाव यांच्याविरुद्ध तक्रार नोंद करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी वास्कोचे आमदार तथा राज्याचे महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी खारीवाडा येथील मुरगााव पालिकेची १०२ चौरस मीटर जागा आपल्या तसेच इतर तीन बंधूंच्या नावावर केल्याचे प्रकरण उघडकीस येताच हा विषय चर्चेचा ठरला होता. काल पालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती व जुझेंविरुद्ध पोलिस तक्रार तसेच त्यांचे बंधू नगरसेवक पास्कॉल व पत्नी नॅनी यांना अपात्र करण्याचा ठराव बहुमताने संमत केला होता. आज या ठरावाची अंशतः अंमलबजावणी करण्यात आली.
जुझेंविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत महसूल खात्यातर्फे घोटाळा करण्यात आल्याचे नमूद करून डिसोझा यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. लेखी तक्रारीसोबत कालच्या ठरावाची प्रतही जोडण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी संपूर्ण चौकशी करूनच पुढील पावले उचलण्यात येतील, असे वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन निगळे यांनी सांगितले.

मलेरिया सर्वेक्षकप्रश्नी सोमवारी निर्णय
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, तरीही उपोषण सुरूच
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
सेवेत कायम करावे म्हणून गेल्या ७ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मलेरिया कर्मचार्यांना अखेर आज शुक्रवारी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या शासकीय बंगल्यावर पाचारण केले व त्यांना सेवेत कायम करण्याबाबत सोमवारी बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांचा पूर्वानुभव असलेल्या मलेरिया कर्मचार्यांनी जोपर्यंत या संदर्भात लेखी आदेश हातात मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, हा पवित्रा कायम ठेवला आहे.
आरोग्य खात्यात गेली १२ ते १५ वर्षे मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करणारे ५९ कर्मचारी आरोग्य संचालनालयासमोर ७ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकारने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. आज आठव्या दिवशी मात्र मुख्यमंत्र्यांना या कर्मचार्यांना आपल्या बंगल्यावर चर्चेसाठी पाचारण केले व त्यांच्या मागणीविषयी सोमवारी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या कर्मचार्यांची दखल का घेतली नाही असे पत्रकारांनी विचारता, सदर कर्मचारी उपोषणाला का बसलेत हेच आपल्याला ठाऊक नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यापूर्वीच्या आश्वासनाची आठवण करून देताच, सोपस्कार पूर्ण होण्यास अवधी लागतोच, अशी सबब त्यांनी सांगितली.
उपोषण सुरूच राहणार
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ऍड. सुभाष सावंत, सुदेश कळंगुटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला सोमवारी या प्रकरणी निर्णय घेण्याचे आश्वासन दिलेले असले तरी लेखी आदेश मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असे मलेरिया कर्मचारी संघटनेच प्रमुख प्रेमदास गावकर यांनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांची धमकी?
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चाललेल्या कुजबुजीनुसार, मुख्यमंत्री आज या कर्मचार्यांची आरोग्य संचालनालयाजवळ भेट घेणार होते. मात्र, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांनी तसे केल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी धमकी दिली. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांनी या कर्मचार्यांची आपल्या बंगल्यावर भेट घेण्याचा निर्णय घेतला.

Subscribe to:
Posts (Atom)