आमदार दामोदर नाईक यांची ग्वाही
मडगाव, दि. २७ (प्रमोद ल. प्रभुगावकर): गेल्या चार वर्षांत गोव्यात जे नानाविध प्रश्न उपस्थित झाले त्यातील एकाही प्रश्नावर तोडगा काढून सर्वसामान्यांना दिलासा देण्यास सरकार संपूर्णतः अपयशी ठरले आहे. लोकांचा संताप जागोजागी दिसत आहे. लोक सरकारला विटले आहेत. ते राजकीय पर्याय शोधत आहेत. तो देण्यासाठी जे काही हवे आहे ते देण्याचा भाजपचा प्रयत्न राहील व त्यासाठी यापूर्वीच पावले उचलली गेली आहेत, अशी माहिती भाजपचे फातोर्ड्याचे आमदार व भाजप प्रवक्ते दामोदर नाईक यांनी दिली.
गोवा विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यादृष्टीने सरकारने सादर केलेले लोकानुनय करणारे अंदाजपत्रक व जागोजागी सुरू असलेले शिलान्यास या पार्श्वभूमीवर दामू नाईक यांची भेट घेऊन भाजपच्या तयारीबाबत विचारले असता त्यांनी पक्षाचा संपूर्ण कार्यक्रमच समोर ठेवला. तसेच यापूर्वीच संपूर्ण तयारीनिशी निवडणुकांना सामोरे जाण्याची सिद्धता भाजपने केल्याचे दिसून आले.
खासदार श्रीपाद नाईक यांनी स्थानिक राजकारणात उतरण्याची केलेली तयारी, स्थानिक पक्षांशी निवडणूक युतीबाबत सुरू झालेले प्रयत्न, संघटन सचिवपदाची तरतूद, अल्पसंख्याकांना महत्त्व देणे, सर्व समाजांना प्रतिनिधित्व हे सर्व त्या तयारीचेच भाग आहेत असे सांगून दामू नाईक म्हणाले की, गोव्यातील मतदारसंघाची झालेली पुनर्रचना पाहिली तर १०० ते १५० मते इकडे तिकडे झाली तर निकाल उलटापालटा होऊ शकतो. त्यासाठी एकेका मताला महत्त्व येणार आहे. अशी मते आपल्याकडेे वळवण्यावर भाजपचा कटाक्ष असेल.
आपण पक्षाच्या कोअर समितीत असल्याने निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळत असल्याचे मान्य करून दामू नाईक म्हणाले, भाजप यावेळी गोव्याला गेल्या चार वर्षांत भेडसावू लागलेले जवळपास सर्व प्रश्न लोकांपर्यंत नेणार आहे. विविध प्रश्नांबाबतच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर लोक या प्रकारांना विटले आहेत. केंद्रीय स्तरावरील भ्रष्टाचार लोकांना तोंडात बोटे घालायला लावणारा ठरला आहे. काही प्रकरणात आकड्यावरील शून्ये किती आहेत तेच लोकांना कळेनासे झाले आहे. कॉंग्रेस या प्रकरणामुळे भलतीच अडचणीत आलेली असून कलमाडीसारख्यांना दूर लोटून ती आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र इतक्या सहजी ती प्रतिमा सुधारणार नाही. म्हणून भाजपला पुन्हा अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी भाजपने तयारी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने कधीच मतदारांना गृहीत धरलेले नाही. यापुढेही तसे करून चालणार नाही. सत्ता भाजपकडेे येण्यासाठी जमेचे अनेक मुद्दे आहेत. ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ हे मनोहर पर्रीकर यांनी सरकार कसे नसावे यापेक्षा सरकार कसे असावे या प्रयोगाने दाखवून दिले आहे. इच्छाशक्ती असली की अशक्य वाटणारी कामेही कशी साकार होतात हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. आजच्या अनेकविध प्रश्नांच्या वेळी लोक त्यांची काढत असलेली आठवण हे त्याचेच गमक आहे. त्याचा लाभ आगामी निवडणुकीत पक्षाला नक्कीच होईल, असे दामू नाईक यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.
Thursday, 28 April 2011
Wednesday, 27 April 2011
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट प्रकरणी एफआयआर नोंदवा
कायदा खात्याची सरकारला शिफारस
पणजी,द. २६ (प्रतिनिधी): उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी (एचएसआरपी) कंत्राटात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी सरकारला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट झाल्याने वाहतूक खात्याने या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ ‘एफआयआर’ नोंद करण्याची शिफारस कायदा खात्याने केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या कंत्राटाच्या अफरातफर प्रकरणी संबंधितांवर सरकार कारवाई करण्यास हयगय करीत असेल तर आपण फौजदारी गुन्हा करू, असा इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला होता.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीबाबत शिम्नित उत्च कंपनीला दिलेल्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचा पर्दाफाश विधानसभा अधिवेशनात केला होता. पर्रीकरांनी केलेल्या या आरोपांची चौकशी केल्यानंतर मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी पर्रीकरांच्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले होते. श्रीवास्तव यांच्या अहवालाचा आधार घेऊनच सरकारने हे कंत्राट रद्दही केले होते. मुख्य सचिवांच्या चौकशी अहवालात या प्रकरणातील गैरकारभार उघड झाल्याने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी पर्रीकर यांनी गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती व त्यावेळी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी कायदा खात्याचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
या प्रकरणी कायदा खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कंपनीकडून निविदा दस्तावेजांत फेरफार केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या कंत्राटासाठी कंपनीतर्फे सादर केलेल्या आर्थिक दस्तावेजांत क्रमांकपट्टी बदलताना ४८ टक्के प्रीमियम भरावा लागेल, अशी अट ऐनवेळी घुसडण्यात आल्याचा प्रकार पर्रीकरांनी उघड केला होता. निविदा प्रक्रियेतील हा फेरफार प्रथमदर्शनी स्पष्ट होतो व त्यामुळे यासंबंधी पोलिसांनी ‘एफआयआरि’ नोंदवून या गैरकारभाराचा तपास करावा, अशी शिफारस कायदा खात्याने आपल्या शिफारशीव्दारे केल्याची माहिती मिळाली आहे. मुळात या संपूर्ण कंत्राटाचा आर्थिक व्यवहार सुमारे ४०० कोटी रुपयांच्या आसपास होता. त्यात ४८ टक्के अतिरिक्त प्रीमियमची अट घालून गोमंतकीयांच्या खिशाला अतिरिक्त २४० कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता पर्रीकरांनी वर्तविली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे कारण पुढे करून हे कंत्राट घाईगडबडीत गोमंतकीयांच्या माथी मारण्याचा सरकारचा डाव होता. मात्र, पर्रीकरांनी या डावाचा वेळीच भांडाफोड केल्यानंतर या विरोधात राज्यव्यापी आंदोलनही छेडण्यात आले होते. भाजपने सुरू केलेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर अखिल गोवा खाजगी बस मालक संघटना, इतर वाहतूकदार व युवा कॉंग्रेसकडूनही या कंत्राटाला विरोध दर्शवण्यात आल्याने सरकारला अखेर या कंत्राटाची कार्यवाही रोखणे भाग पडले होते. दरम्यान, हे कंत्राट रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सदर कंपनीकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्याची सुनावणी सुरू आहे.
‘फाईल’ पोचलेली नाही
उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीसंबंधी कायदा खात्याकडे सल्ला मागण्यासाठी पाठवलेली ‘फाईल’ अद्याप आपल्याकडे पोहोचली नसल्याचे वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी ‘गोवादूत’ कडे बोलताना सांगितले. ही ‘फाईल’ कायदा खात्याकडून मुख्य सचिवांकडे गेल्याची माहिती आपल्याला मिळाली असून त्यात नेमकी काय शिफारस करण्यात आली आहे, हे मात्र आपल्याला माहीत नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

पत्नीचा निर्घृण खून!
नास्नोड्यातील घटना - दांपत्य विर्नोड्याचे
म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी): धारदार सुर्याने वार करून आपल्या पत्नीचाच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना आज दि. २६ रोजी संध्याकाळी भरणवाडा पाटा - नास्नोडा येथे घडली. स्नेहा गणपत शेटये हिचा खून करून पसार झालेला तिचा पती गणपत शेटये हा नंतर आज रात्री उशिरा पेडणे पोलिसांना शरण आला. पेडणे पोलिसांनी त्याला म्हापसा पोलिसांकडे सोपवले आहे.
सविस्तर वृत्तानुसार, आज रात्री आठच्या सुमारास भरणवाडा पाट्यावर एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडली असल्याची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली स्नेहा दृष्टीस पडली. त्यांनी त्वरित आपल्या गाडीतून तिला आझिलोत दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मयत स्नेहाच्या पोटावर, छातीवर धारदार चाकूने अंदाजे चार ते पाच वार करून व चाकू तेथेच टाकून खुनी फरार झाला होता. पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना घटनास्थळी दूरवर पडलेले स्नेहाचे सँडल सापडले. यावरून तिने आपला जीव वाचवण्यासाठी बरीच धावपळ केली असावी असा कयास आहे. स्नेहाच्या पर्समध्ये सापडलेल्या पॅनकार्डमुळे पोलिसांना तिची ओळख पटली.
दरम्यान, रात्री उशिरा स्नेहाचा पती गणपत शेटये पेडणे पोलिसांना शरण आला. खून केल्यानंतर तो म्हापशाला आला व आपल्या भावाला त्याने ही माहिती दिली. त्याच्या भावाने त्याला पेडणे पोलिसांकडे नेले. त्यानंतर पेडणे पोलिसांनी त्याचा ताबा म्हापसा पोलिसांकडे दिला. हा खून नक्की कोणत्या कारणास्तव झाला हे मात्र कळू शकले नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि तिचा पती गणपत हे दोघेही मयडे येथील एका वृद्धाश्रमात नोकरी करत होते व तेथेच ते राहत होते. निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

भ्रष्टाचाराविरोधात एकत्र या : स्वामी रामदेव
म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी): भारतातील अनेकांनी विदेशात मोठ्या प्रमाणात काळे धन साठवून ठेवले आहे. जोपर्यंत परदेशात असलेले हे धन बेकायदा असल्याचे सरकार जाहीर करत नाही व ही देशवासीयांची मालमत्ता देशात आणत नाही, तोपर्यंत ‘स्वाभिमाना’चा हा लढा सुरूच राहील. त्यासाठी येत्या ४ जून रोजी दिल्ली येथे सत्याग्रह केला जाणार असून त्यामध्ये संपूर्ण भारतातील देशप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांनी केले.
येथील श्री बोडगेश्वर मैदानावर आज सकाळी पार पडलेल्या योग शिबिरानंतर स्वामी बोलत होते. उपस्थितांना योगाचे धडे दिल्यानंतर रामदेव बाबांनी पत्रकारांशी मुक्त संवादसाधला. देशाला पडलेला भ्रष्टाचाराचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. या रोगाला समूळ निपटून काढण्यासाठी माणसाच्या जीवनात एकाग्रता व विनम्रता येण्याची गरज आहे. सर्वजण एकत्र आले तर भ्रष्टाचाराचा बिमोड करणे कठीण नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी गोव्यात चाललेल्या अनिर्बंध खनिज उत्खननाविषयी पत्रकारांनी छेडले असता स्वामी म्हणाले, हा प्रश्न संपूर्ण देशाला सतावत असून तेथेही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजला आहे. जोपर्यंत आम्ही सर्व शक्तीनिशी या प्रकाराला विरोध करत नाही तोपर्यंत अशा लोकांना चाप लावता येणार नाही. देशातील भ्रष्टाचाराची कीड ठेचून काढण्यासाठी आणि स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग शिबिरांत सामील व्हा, अभ्यासपूर्वक योग करा, तणावमुक्त जीवन जगा, सर्वांना सहकार्य करा, एकत्र येऊन लढा द्या, असे आवाहन रामदेव बाबांनी केले.
आज पहाटे ५ वाजता रामदेव बाबांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर सुरू झाले. त्यामध्ये प्रतिष्ठित नागरिकांबरोबरच असंख्य लोकांनी सहभाग घेतला.

मगोला युतीचा जाहीर प्रस्ताव
पर्वरीतून विधानसभा निवडणूक लढवणार?
सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय
पणजी, दि. २६ (किशोर नाईक गांवकर): आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह बहुतांश भाजप कार्यकर्ते व जनतेकडून होत आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत पर्वरी या उत्तर गोव्यातील नव्या मतदारसंघाची भर पडली आहे. हा पूर्णपणे नवा मतदारसंघ आहे व त्यामुळे आपण पर्वरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, असा हट्ट कार्यकर्त्यांनी धरला आहे. कार्यकर्ते व जनतेच्या मताचा आदर ठेवून याबाबत केंद्रीय नेते व स्थानिक पदाधिकार्यांशी चर्चा करून नंतरच अंतिम निर्णय घेणार, असा खुलासा खासदार श्रीपाद नाईक यांनी केला.
खासदार श्रीपाद नाईक यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याबाबत जी चर्चा सुरू आहे, त्याबाबत त्यांनी मनमोकळेपणाने खुलासा केला. २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण खासदार असताना विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव आला होता. यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आपण काही फरकाने पराभूत झालो असलो तरी भाजपचे सरकार आले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपकडेच सत्ता येईल, असा विश्वास श्रीपाद नाईक यांनी बोलून दाखवला. भ्रष्ट कॉंग्रेसच्या राजवटीतून गोव्याची मुक्तता करण्याची मोठी जबाबदारी आता गोमंतकीयांच्या खांद्यावर आहे व ही जबाबदारी पेलण्यासाठी जनता सज्ज बनली आहे. सत्तेचा वापर करून कमवलेल्या पैशांव्दारे मते विकत घेऊन पुन्हा एकदा सत्तासिंहासनावर आरूढ होण्याचा कॉंग्रेसचा बेत यंदा धुळीस मिळणार आहे. पणजी महानगरपालिकेत याचा अनुभव आला आहे. महापालिकेतील सर्वच जागा आपण जिंकणार व विरोधकांची अनामत जप्त करणार, अशी फुशारकी मारणार्या नेत्यांचा डाव धुळीस मिळाल्याचे गोमंतकीयांनी पाहिले आहे. पणजी महापालिकेतील निवडणुकीत पहिल्यांदाच बिगर सरकारी संस्था व जागृत नागरिक एकत्र आले. अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीतही या लोकांनी पुढाकार घेऊन भ्रष्ट नेत्यांना घरी पाठवण्यासाठी कंबर कसली तरच गोवा खर्या अर्थाने मुक्त होईल, असेही श्रीपाद नाईक म्हणाले.
राज्याचे शिक्षणमंत्री बेहिशेबी पैसा विदेशात नेताना कस्टम्सच्या ताब्यात सापडले; पण मुख्यमंत्र्यांना मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही. आपल्या सरकारची जनतेप्रतीची विश्वासार्हता टिकवण्याची जबाबदारी सरकारच्या नेत्यावर असते. पण ती जबाबदारीच मुख्यमंत्री विसरले आहेत, असेच खेदाने म्हणावे लागते असेही श्री. नाईक यांनी सांगितले.
आमदारांच्या बंडाबाबतची वृत्ते तथ्यहीन
पेडणे व काणकोण तालुक्यातील दोन मतदारसंघ रद्द झाले आहेत. हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडेच आहेत. त्यामुळे या आमदारांना अन्य ठिकाणी सामावून घेता येईल काय, याचा विचार पक्ष जरूर करेल. भाजप हा कॅडर आधारीत पक्ष आहे. पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या बळावरच आपण निवडून येतो याचे भान प्रत्येकाला आहे व त्यामुळे काही आमदारांच्या बंडाबाबत जे वृत्त पसरवले जाते त्यात अजिबात तथ्य नाही, असेही श्रीपाद नाईक म्हणाले. या आमदारांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन केले जाणार असून त्यांचा मान त्यांना दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये पक्षाला प्रथम स्थान आहे. आत्तापर्यंत भाजपच्या अनेक आमदारांना वेगवेगळ्या ‘ऑफर्स’ आल्या पण त्यांनी त्या फेटाळून लावल्या. यावरूनच पक्षाप्रति त्यांची निष्ठा दिसून येते. सत्ताधारी पक्षाकडून विनाकारण या आमदारांच्या बंडाचे वृत्त पसरवले जाते व ते पूर्णपणे निराधार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कलमाडींना ८ दिवसांची सीबीआय कोठडी
नवी दिल्ली, दि. २६ : राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात प्रचंड घोटाळे केल्याप्रकरणी अटकेत असणारे कॉंग्रेसचे माजी नेते आणि खासदार सुरेश कलमाडी यांना आज न्यायालयात सादर करण्यात आले असता त्यांना आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यांच्यासोबतच अटक करण्यात आलेले आयोजन समितीचे दोन अधिकारी सुरजीत लाल आणि एस. एस. व्ही. प्रसाद यांनाही ४ मेपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. विशेष सीबीआय न्यायाधीश तलवंत सिंग यांनी हे आदेश दिले. सीबीआयने कलमाडी यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. पण, न्यायाधीशांनी आठ दिवसांची कोठडी मंजूर केली.
आत्तापर्यंतच्या चौकशी प्रक्रियेत कलमाडींनी अजिबात सहकार्य केले नसल्याचे सीबीआयने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. एवढेच नव्हे तर ते आवश्यक माहिती दडपण्याचा प्रकार जाणीवपूर्वक करीत असल्याचेही सीबीआयने आरोप केले आहेत.
चप्पल भिरकावली
कॉंग्रेसमधून हकालपट्टीची नाचक्की झाल्यानंतर आज कोर्टाच्या आवारात कलमाडींना एका संतप्त नागरिकाच्या रोषालाही सामोरे जावे लागले. कपील ठाकूर नामक मध्यप्रदेशातील नागरिकाने कलमाडींवर चप्पल भिरकावत आपला संताप व्यक्त केला. सीबीआयच्या पटियाला विशेष न्यायालयात त्यांना हजर करण्यासाठी नेले जात असताना ठाकूर यांनी चप्पल ङ्गेकली. कलमाडी चालत असल्याने त्यांना चप्पल लागली नाही. पोलिसांनी लगेचच ठाकूर यांना ताब्यात घेतले.

मडगावातील सोनाराला साडेअठरा लाखांना गंडवले
टोळी पसार - ‘डील’ करून देणारा अटकेत
म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी): आपण सोन्याचांदीचे व्यापारी आहोत अशी बतावणी करून मडगाव येथील दिलीप वेर्णेकर या सोनाराला तब्बल साडे अठरा लाख रुपयांचा गंडा घालून एक सराईत टोळी आज पसार झाली आहे. दरम्यान, या भामट्यांशी वेर्णेकर यांचे ‘डील’ करून देणार्या मूळ कारवार येथील व सध्या मडगाव येथे राहणार्या जगदीप गोवेकर यांना मडगावात अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहितीनुसार, काही माणसांकडे उत्तम प्रतीचे सोने विक्रीस आहे असे जगदीप यांनी मडगावातील दिलीप वेर्णेकर यांना सांगितले. आज श्री. वेर्णेकर यासंबंधीचे व्यवहार करण्यासाठी करासवाडा येथील एका धाब्यावर आले असता त्या टोळीतील एकाने आपल्याकडील सोन्याचा नमुना त्यांना दाखवला. वेर्णेकर यांना तो पसंत पडला. सोने गाडीत आहे, तुम्ही पैसे द्या, असे सांगून त्याने वेर्णेकरांकडून साडे अठरा लाख रुपये घेतले. त्यानंतर ते गाडीकडे जात असतानाच एक स्कॉर्पियो गाडी सुसाट वेगाने त्यांच्यापाशी आली. त्यातून काही माणसे खाली उतरली व त्यांनी वेर्णेकरांशी व्यवहार करणार्याला मारहाण करण्याची बतावणी केली. त्यानंतर त्या इसमाला गाडीत कोंबून ते पसार झाले. दरम्यान, या सर्व प्रकारात कुठलीही इजा न पोचलेल्या वेर्णेकरांना या प्रकरणाचा संशय आला व त्यांनी त्वरित म्हापसा पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावरून या टोळीशी वेर्णेकरांचे ‘डील’ करून दिलेल्या जगदीप गोवेकर याला मडगावात अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

गोव्यात पोर्तुगिजांचे नामोनिशाणही नको!
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी कडाडले
पणजी, दि.२६ (प्रतिनिधी): पोर्तुगिजांनी गोव्याचा उद्धार केला व संस्कृती वाढवली अशी बेताल वक्तव्ये करणारे पोर्तुगालचे भारतातील राजदूत जॉर्ज रोजा द ऑलीवेरा हे भ्रमिष्ट झाले आहेत. तब्बल ४५० वर्षे गोमंतकीयांवर अमानुष अत्याचार करणार्या ‘मोंतेरो’, ‘जेरोम’ आदी पोर्तुगिजांची काळी कृत्ये गोव्यातील जनता अद्याप विसरलेली नाही. त्यामुळे पोर्तुगालच्या राजदूतांनी गोव्यात येऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करणे हे हास्यास्पद आहे. या जुलमी पोर्तुगिजांचे गोव्यात नामोनिशाणही राहता उपयोगाचे नसून गोव्यात राहून पोर्तुगालचा उदोउदो करणार्या पोर्तुगीजधार्जिण्यांनी गोवा सोडून पोर्तुगालला जावे, असे सणसणीत प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व निवृत्त पोलिस अधिकारी प्रभाकर सिनारी यांनी केले.
पोर्तुगालचे भारतातील राजदूत जॉर्ज रोजा द ऑलीवेरा यांनी रविवार दि. २४ एप्रिल रोजी गोव्यातील एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, ‘गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांना काय हवे आहे? ते पोर्तुगिजांच्या गोव्यातील कार्यक्रमांना विरोध का करतात? पोर्तुगिजांनी गोव्याचे भलेच केले आहे’ अशी वक्तव्ये केली आहेत. या वक्तव्यांवर स्वातंत्र्यसैनिक संघटनेने तीव्र आक्षेप घेतला असून त्या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आज दि. २६ रोजी पणजी येथील स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी बोलत होते. या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष नागेश करमली, सचिव चंद्रकांत पेडणेकर व खजिनदार कांता घाटवळ उपस्थित होते.
या प्रसंगी प्रभाकर सिनारींनी पोर्तुगाल राजदूतांच्या वक्तव्यावर तुफान हल्ला चढवला. पोर्तुगिजांचे गोडवे गाणार्या काही बाटग्या गोवेकरांमुळे गोव्यात आजही पोर्तुगिजांचे नाव शिल्लक आहे. हे त्वरित बंद व्हायला हवे. ज्यांना पोर्तुगिजांबद्दल प्रेम आहे व ज्यांनी पोर्तुगालचे पासपोर्ट घेतले आहेत त्यांनी तेथेच जाऊन कायमचे राहावे, असा सल्लाही श्री. सिनारी यांनी यावेळी दिला.
फुंदासांव ओरिएंट बंद करा : करमली
‘फुंदासांव ओरिएंट’ या पोर्तुगीज संस्थेमुळे राज्यात वारंवार पोर्तुगिजांच्या अत्याचारी कार्याचा उदोउदो होत असून ही संस्था बंद करण्याची तसेच राज्यातील अनेक रस्त्यांना व वास्तूंना दिलेली अत्याचारी पोर्तुगीज अधिकार्यांची नावे रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी केली. इंग्रजांनी देशावर पारतंत्र्य लादले व स्वातंत्र्यवीरांवर अत्याचार केले. पोर्तुगिजांनी याही पुढे जाऊन गोव्यातील देवदेवतांवर व धर्मावर आक्रमण केले. त्यासाठी त्यांनी हिंदूंची पवित्र मंदिरे तोडली, धर्मांतरासाठी अमानुषतेचा कहर केला. आणि एवढे सर्व करूनही त्याच देशाचे राजदूत आपण गोव्याचे भलेच केले असे सांगतात, ही तमाम गोमंतकीयांची क्रूर थट्टा आहे, असे ते म्हणाले. भारताने विज्ञान व तंत्रज्ञानात भरीव प्रगती केली असून ‘दरिद्री’ पोर्तुगालच्या कोणत्याही मदतीची भारताला व भारताचे अविभाज्य अंग असलेल्या गोव्याला गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------
राज्य सरकार कुचकामी
राज्यातील ‘फुंदासांव’सारख्या पोर्तुगिजांचे कार्यक्रम राबवणार्या संस्था बंद कराव्यात व राज्यातील रस्ते व इमारतींना दिलेली अत्याचारी पोर्तुगीज अधिकार्यांची नावे रद्द करावीत यासाठी पणजी महापालिकेला व केंद्र सरकारला पुन्हा नव्याने निवेदने देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नागेश करमली यांनी दिली. राज्य सरकार कुचकामी असल्याने त्या सरकारला निवेदने देऊन काहीही होणार नाही असे, त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Tuesday, 26 April 2011
तिंबलो खाणीवर १२ ट्रक जाळले तळे भाटी सांगेतील घटना
- सर्व ट्रक उगेतील
- अंदाजे ७० लाखांची हानी
सांगे, दि. २५ (प्रतिनिधी): तळे भाटी - सांगे येथील तिंबलो कंपनीच्या खाणीवर काल रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी १२ ट्रकांना आग लावून ते भस्मसात केल्याने एकच खळबळ माजली आहे. यात सुमारे ६० ते ७० लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. रात्री १२ ते ३च्या दरम्यान ही आग लावली गेली असावी. सदर कंपनीच्या मोकळ्या जागेत शेकडो ट्रक क्रमवार उभे केलेले असतात. त्यांतील वेचून १२ ट्रकांना आग लावण्यात आल्याने हे प्रकरण बरेच गुंतागुंतीचे असल्याचेही संकेत मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भस्मसात झालेले बाराही ट्रक तिंबलो खाणीच्या अगदी जवळच असलेल्या उगे येथील ग्रामस्थांचे आहेत. त्यामुळे सदर आग म्हणजे एक पूर्वनियोजित कट असल्याचे येथे बोलले जात आहे. सर्व ट्रकांची बॉनेट (समोरचा भाग) उघडून आग लावण्यात आलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की, येथे खनिज माल वाहतूक करण्यासाठी शेकडोच्या संख्येने ट्रक कार्यरत आहेत. त्यांतील काही ट्रकमालक सकाळी क्रमांक लवकर लागावा म्हणून आपले ट्रक कंपनीच्या आतील मोकळ्या जागेत ठेवून जातात. कालही असेच ट्रक उभे करून ठेवले असता केवळ उगे येथील मालकांच्या ट्रकांनाच आग लावण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सांगे भागात सर्वत्र खळबळ माजली व घटनास्थळी लोकांची एकच झुंबड उडाली. सांगे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही.
दरम्यान, तिंबलो कंपनीचे सर व्यवस्थापक श्री. काणेकर व अन्य पदाधिकार्यांनी येथे येऊन पाहणी केली. दक्षिण गोवा ट्रक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देसाई, सचिव सत्यवान गावकर यांनीही घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणात गुंतलेल्यांना त्वरित शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री. देसाई यांनी केली आहे. सांगेचे आमदार वासुदेव मेंग गावकर, नगराध्यक्ष संजय रायकर, पंच अनिल जांगळे आदींनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तळे खाणीवर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे व तिच्या निषेधार्थ आज खनिज माल वाहतूकदारांनी आपापल्या गाड्याही बंद ठेवल्या.
आगीत भस्मसात झालेल्या
ट्रकांचे क्रमांक व त्यांचे मालक
जीए ०९ टी ६००२- आंजेलिना डिसोझा, जीए ०२ टी ६५७५ - रेल्विस गोम्स, जीए ०२ झेड ६००२ - जुझे कायतान फर्नांडिस, जीए ०२ झेड ९८३३ तेरेसा सिक्वेरा, जीए ०९ यू २६८९ - जेम्स फर्नांडिस, जीए ०२ टी ५२४२ - केनेथ परेरा, जीए ०९ यू १२२७ - फ्रान्सिस मार्टीन्स, जीए ०२ झेड ६२३३ रुझारियो फर्नांडिस, जीए ०९ यू १२४८ - जॉन फर्नांडिस, जीए ०९ टी ९८३३ - मारिना फर्नांडिस, जीए ०२..... - मिलाग्रीस सिल्वा, जीए ०९ यू ०२०४ - नातालिना फर्नांडिस.

राष्ट्रकुल घोटाळा प्रकरणी अखेर कलमाडी गजाआड!
सीबीआयची कारवाई
नवी दिल्ली, दि. २५ : राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात ढिसाळपणा राहिल्याने आणि प्रचंड भ्रष्टाचाराने देशाचे नाक कापणार्या आयोजन समितीचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांना आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयने अखेर आज बेड्या ठोकल्या. क्वीन्स बॅटन रीलेच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करून ६७ वर्षीय कलमाडींना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रकुलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घोटाळा केल्याप्रकरणी एखाद्या खासदाराला अटक होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.
देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर धुळीस मिळविणारा राष्ट्रकुल हा घोटाळा ठरला. दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात एक नव्हे तर अनेक घोटाळे झाल्याचे निष्पन्न होताच सरकारने याची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रकुल आयोजन समितीवर वरिष्ठ अधिकार्यांची नेमणूक केली. या अधिकार्यांच्या देखरेखीखाली स्पर्धा पार पाडल्यानंतर राष्ट्रकुल घोटाळ्याची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक चौकशीतच अनेक पुरावे हाती आल्यामुळे कलमाडींना लवकरच अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्पर्धेच्या आयोजनासाठी एका स्वीस कंपनीला नियम धाब्यावर बसवून कंत्राट देण्यात आले होते. क्वीन्स बॅटन रीले प्रकरणी सीबीआयची दोन सदस्यीय चमू नुकताच लंडनला जाऊन आला. त्यानंतर ही कारवाई झाली. स्पर्धेनंतर सात महिन्यांच्या आत कलमाडी यांना अटक झाली आहे. अटकेपूर्वी कलमाडी यांची क्वीन्स बॅटन रीलेप्रकरणी सीबीआय अधिकार्यांनी कसून चौकशी केली. सीबीआयने कलमाडी यांना चौकशीसाठी बर्याचदा पाचारण केले. पण, त्यांनी काही-ना-काही कारण सांगून हजर होणे टाळले. प्रथम त्यांनी विदेश दौर्याचे कारण सांगितले. नंतर त्यांनी १९ एप्रिलला आल्यानंतरच हजर राहू शकणार असल्याचे सांगितले. त्यातच सीबीआयने कलमाडींच्या विरोधात ठोस पुरावे हाती आल्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर कलमाडींची अटक निश्चितच मानली जात होती.
याआधी राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी कलमाडी यांचे सहकारी ललित भानोत (आयोजन समितीचे सरचिटणीस), व्ही. के. वर्मा (आयोजन समितीचे महासंचालक) आणि कलमाडींचे स्वीय सचिव शेखर देवरूखकर यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय कलमाडी आणि त्यांच्या अटकेतील साथीदारांच्या घर तसेच कार्यालयांवर छापे टाकून अनेक दस्तावेजांची तपासणीही करण्यात आली होती.
--------------------------------------------------------------
आज कोर्टात हजर करणार
सीबीआयने कलमाडी यांना आज अटक केल्यानंतर उद्या मंगळवारी त्यांना न्यायालयात सादर केले जाणार आहे. सीबीआयकडून त्यांच्या कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे समजते. त्यानंतर घोटाळा प्रकरणात कलमाडींची प्रदीर्घ चौकशी होण्याची शक्यता आहे.

Subscribe to:
Posts (Atom)