वाळपईत मातृभाषाप्रेमींची निदर्शने
मुख्यमंत्री फिरकलेच नाहीत
वाळपई, दि. १३ (प्रतिनिधी): सत्तरीची राजकीय धुरा सांभाळणार्या राणे पितापुत्रांनी माध्यमप्रश्नी अजूनही ठोस भूमिका न घेतल्याने खवळलेल्या सत्तरीतील मातृभाषाप्रेमींनी आज बुधवारी संध्याकाळी सभापती प्रतापसिंग राणे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले असता त्यांना काळे बावटे दाखवून आपला संताप व्यक्त केला.
वाळपई येथील वन प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात धनगर समाजातील बांधवांना गॅस जोडण्यांचे वितरण करण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत उपस्थित राहणार असल्याची वार्ता येथे पसरली होती. त्यानुसार, गोव्याच्या मातृभाषांचा गळा घोटून इंग्रजीची तळी उचलणार्या मुख्यमंत्र्यांना काळे बावटे दाखवून त्यांच्या घातकी कृतीचा निषेध करण्यासाठी येथील मातृभाषाप्रेमी मोठ्या संख्येने वन प्रशिक्षण केंद्राच्या गेटजवळ एकत्र आले होते. पण, मुख्यमंत्र्यांनी ऐन वेळी येथे येण्याचे रद्द केले. याच कार्यक्रमासाठी सभापती प्रतापसिंग राणे आले असता संतप्त आंदोलकांनी त्यांना काळे बावटे दाखवून त्यांनी माध्यमप्रश्नी घेतलेल्या गुळमुळीत भूमिकेचा निषेध केला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा