Friday, 21 August 2009

मूळ विचारधारा आणि अनुशासनाचा भंग : जेटली

सिमला, दि. २० - जसवंतसिंग यांचे थेट निष्कासन करण्यावरून होत असलेल्या टीकेला सपशेल नाकारीत, जसवंतसिंग यांनी आपल्या पुस्तकात जिना यांचे गुणगान आणि सरदार पटेल यांच्याविरोधात लिखाण केल्याची बाब भाजपाची मूळ विचारधारा आणि अनुशासनाचा थेट भंग करणारी असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या संविधानाने संसदीय मंडळाला बेशिस्तीच्या संदर्भातील सर्व प्रकरणांबाबत प्रक्रिया आणि कारवाईबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत, असे जेटली यांनी पत्रपरिषदेत सांगितले. जसवंतसिंग यांना कारणे दाखवा नोटीस का देण्यात आली नाही, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
सर्वच राजकीय पक्षांनी गंभीर बेशिस्तीच्या बाबतीत असेच पाऊल उचलले आहे. निवडणुकीत पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी केली गेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जिना यांच्याबाबत लालकृष्ण अडवाणी यांनी २००५ साली केलेले विधान आणि जसवंतसिंग यांनी केलेले लेखन यात फरक आहे. या दोन्ही नेत्यांच्या विधानांची तुलना होऊ शकत नाही, असे जेटली म्हणाले. अडवाणींनी पाकिस्तान भेटीच्या वेळी जिनांबाबत ओझरता उल्लेख केला होता. पण, जसवंतसिंग यांनी सरदार पटेल यांच्याविरोधात जे लिखाण केले आहे, ते आक्षेपार्ह आणि देशाच्या राष्ट्रीय भावनेचा अनादर करणारे आहे, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.
कुणी पुस्तक लिहावे की नाही, हा वादाचा मुद्दाच नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, तुम्ही पुस्तकात काय लिहिता आणि काय मत व्यक्त करता, हा आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारे लिखाण करून पक्षाच्या मूळ विचारधारेलाच तिलांजली दिली आहे. पक्षाने २००५ सालीच फाळणीला जिना हे जबाबदार असल्याचा ठराव केला होता. त्या ठरावाच्या अगदी विरोधी असे लिखाण जसवंतसिंग यांनी केल्याचे जेटली म्हणाले.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा