Wednesday, 26 August 2009

हुंड्यासाठी छळणाऱ्या
पती, सासऱ्याला अटक

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) - हुंड्यासाठी छळवणूक केल्यामुळे झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेचा पती नीलेश ऊर्फ लक्ष्मण बांदोडकर (३१) व सासरा शशिकांत बांदोडकर यांना म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. तर, सासू आणि दीर फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याविषयीची पोलिस तक्रार मुलीच्या वडिलांनी सादर केले होती.
प्राप्त माहितीनुसार गिरी म्हापसा येथे राहणाऱ्या सदर मुलीचे चार महिन्यांपूर्वी (दि. २७ एप्रिल ०९ रोजी) नीलेश बांदोडकर याच्याशी सावंतवाडी येथील एका मंगल कार्यालयात लग्न झाले होते. दोघांचा विवाह रीतसर दोन्ही कुटुंबीयांनी ठरवून केला होता. विवाहाच्या चौथ्या दिशीच पती नीलेश बांदोडकर दुबई येथे निघून गेला होता. यानंतर सासू, सासरा आणि दिराने हुंड्यासाठी तिची छळवणूक सुरू केली. माहेरहून चार लाख रुपये आणि सोने आणण्यासाठी तिची मारहाण व छळवणूक करण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दि. २१ ऑगस्ट ०९ रोजी तिचा पती दुबईतून घरी आल्यानंतर त्यानेही आपल्या आईसोबत मिळून हुंड्यासाठी तिची छळवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती माहेरी निघून गेली होती. दि. २२ रोजी म्हणजेच चतुर्थीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले.
मुलीच्या वडिलांनी याविषयीची तक्रार म्हापसा पोलिस स्थानकात करताच पोलिसांनी चतुर्थीच्या दिवशीच नीलेश आणि त्याचे वडील शशिकांत यांना अटक करून तुरुंगात डांबले. याविषयीची अधिक चौकशी म्हापसा पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक ब्रॅंडन डिसोझा करीत आहेत.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा