Wednesday, 26 August 2009

रावणाच्या मूर्तीची
पर्रा येथे तोडफोड

म्हापसा, दि. २५ (प्रतिनिधी)- राज्यात गणेश चतुर्थी साजरी केली जात असतानाच काल रात्री पर्रा - आसगाव आणि हणजूण भागातील जोड सीमेजवळ दशशीरा या रावणाच्या घुमटीची आणि मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर गोव्यातील मूर्तिभंजनाची ही पहिलीच घटना असून दक्षिण गोव्यात झालेल्या मूर्तिभंजनाच्या घटनांचा छडा अद्याप लागलेला नाही.
हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्रा - आसगाव आणि हणजूण येथील दशशीरा या रावणाच्या देवळातील घुमटी आणि रावणाची मूर्ती अज्ञातांनी फोडून बाहेर फेकून दिली होती. हा प्रकार आज (दि. २५) सकाळी येथून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला. या घटनेची माहिती हणजूण पोलिसांना देण्यात आली. हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर यांनी पोलिस पथकासोबत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच म्हापशाचे उपअधीक्षक सॅमी तावारीस आणि निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पर्रा - आसगाव आणि हणजूण गावचा राखणदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दशशीरा देवाची मूर्ती एका भक्ताने येथे बसवली होती. पर्वरी येथील वडाजवळ असलेल्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्यानंतर पोलिस बंदोबस्तात ती पुन्हा बसवण्यात आली होती. या घटनेनंतर उत्तर गोव्यातील हे पहिलेच मूर्ती तोडफोड प्रकरण आहे. दक्षिणेत मूर्तिभंजन प्रकरणाचा छडा लावण्यात सरकारला अपयश आलेले असल्याने उत्तरेत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी येथून होत आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा