Saturday, 17 January 2009

राज्य माहिती आयोगाचे काम ठप्प

ऍड. फर्नांडिस यांच्याकडून जनहित याचिका दाखल
पणजी, दि.१६(प्रतिनिधी) : गोवा राज्य माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त वेंकटरत्नम दीर्घ रजेवर गेल्याने तसेच राज्य माहिती आयुक्त जी.जी.कांबळी यांचे १ जानेवारी रोजी निधन झाल्याने आयोगाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. राज्य सरकारने वेंकटरत्नम यांना तात्काळ सेवेत रुजू होण्याची आदेश जारी करून स्व.कांबळी यांच्याजागी नव्या आयुक्तांची नेमणूक करावी अशी मागणी करीत फेलिसिया फर्नांडिस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्य माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त वेंकटरत्नम हे दीर्घ रजेवर गेले असताना गेल्या १ जानेवारी रोजी राज्य माहिती आयुक्त जी.जी.कांबळी यांचे अचानक निधन झाले. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आयोगाचे संपूर्ण कामकाजच ठप्प पडले आहे. सध्या या आयोगाकडे सुनावणीस असलेल्या प्रकरणांना केवळ कारकुनाकडून पुढील तारखा देण्यात येत असल्याचेही ऍड. फर्नांडिस यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. मुळातच माहिती हक्क कायद्याअंतर्गत एखादी माहिती ३० दिवसांच्या आत मिळाली नाही तर त्याबाबतची दाद मागण्यासाठी राज्य माहिती आयोगाकडे धाव घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यासंबंधी आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर संबंधित माहिती अधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या आत माहिती देण्याचे आदेश व त्यात अपयश आल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. सध्या सुनावणी घेण्यास आयोगात कुणीच हजर नसल्याने या कायद्याचा मूळ हेतूच नष्ट होत चालल्याने त्यामुळे सामान्य लोक भरडले जात असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, हा आयोग मुख्य सचिव जे.पी.सिंग यांच्या अखत्यारीत असून माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक आयुक्तांची नेमणूक करतात त्यामुळे त्यांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. याप्रकरणी ऍड.रणजीत सातार्डेकर यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री,मुख्य सचिव व राज्यपालांना निवेदन सादर केले होते पण सरकारकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर ऍड. फर्नांडिस यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा