Monday, 10 November 2008

डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन

पणजी, दि.१० - भाजपचे पाळी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्या मंगळवार ११ रोजी संध्याकाळी ४ वा. शेट्ये प्लाझा, सिंडिकेट बॅंकेजवळ साखळी येथे होणार आहे. उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, उमेदवार डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पाळी मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांनी तसेच हितचिंतकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे सरचिटणीस तथा प्रवक्ते गोविंद पर्वतकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा