पणजी, दि. 8 (प्रतिनिधी) - ऍड.दयानंद नार्वेकर यांनी दाखल केलेली आव्हान याचिका आजच सुनावणीसाठी घेण्याची यापूर्वी विनंती केली नसल्याने आणि सदर खटला गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याने याचिका आता पुढील आठवड्यात सुनावणीसाठी घेतली जाणार आहे.
बनावट क्रिकेट तिकीट घोटाळा प्रकरणी मडगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आरोपपत्र निश्चित करण्यासंबंधीच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायालय कोणता निवाडा देणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. या मुद्यावरूनच ऍड. नार्वेकर यांना आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे या याचिकेवरील निवाडा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांना अपेक्षित असलेला आदेश दिला गेला तर ते पुन्हा मंत्रिपदाची मागणी करण्याची शक्यता आहे. 6 एप्रिल 2001 साली फातोर्डा येथे भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय सामन्यावेळी बनावट तिकिटे छापल्याने ऍड. नार्वेकर यांच्यासह अन्य संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा