Sunday, 29 May 2011

गोवा अर्बन बँकेच्या मडगाव शाखेतून ३० लाखांची चोरी

मडगाव, दि. २८(प्रतिनिधी)
येथील गजबजलेल्या जुन्या मासळी बाजारात असलेल्या गोवा अर्बन सहकारी बँकेतून आज सकाळी अकराच्या सुमारास ३० लाखांची रोकड असलेली बॅग पळवण्याचा प्रकार घडला असून पोलिसांसह बँक अधिकारी व लोकही त्यामुळे भांबावले आहेत. शहरात गेल्याच आठवड्यात अपना बाजारातील ‘मुनाफ’ या विदेशी चलन विनिमय केंद्रात तेथील मुलींना सुर्‍याचा धाक दाखवून १.२० कोटीचे देशी व विदेशी चलन चोरून नेल्याचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडल्यामुळे सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे.
पोलिसांत नोंद झालेल्या तक्रारीनुसार गोवा अर्बन बँकेच्या कॅशियर वंदना काणे यांनी ऍक्सीस बँकेत भरण्यासाठी बँकेच्या तिजोरीतून ३० लाखांची रक्कम काढून त्याच बंद खोलीत ती बॅगेमध्ये भरली. नंतर उपव्यवस्थापक आलेक्स रिबेलो यांच्यासमवेत रोखपाल कक्षातून बाहेर येऊन बॅग त्यांच्या टेबलाजवळ ठेवून तेथून काही अंतरावर त्या बसल्या आलेक्स रिबेलो हे टॅक्सी मागवण्यासाठी फोन करायला व्यवस्थापकांकडे गेले. तेथून ते बाहेर आपल्या कक्षात आले तेव्हा बॅग गायब झाल्याचे दिसून आले. नंतर शोधाशोध झाली. तरीही बॅग सापडली नाही. मग यावरून हलकल्लोळ माजला व त्यांनी ही गोष्ट व्यवस्थापकांच्या निदर्शनाला आणून दिली. व्यवस्थापक नाथकिरण देसाई यांनी तात्काळ मडगाव पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. उपनिरीक्षक नीलेश धायमोडकर आणि कपिल नायक हे पोलिस पथकासह तेथे दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला.
ही बॅग नेमकी कोणी पळवली ते कॅशियरच्याही लक्षात आलेले नाही. आज दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठाही बंद होता. बँकेत ५ जणांची टोळी आल्याचा संशय व्यक्त करून बाहेरही काही जण असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
ही बँक जुन्या मासळी बाजारासमोरील बहुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असून तळमजल्यावर सर्व दुकाने व दुकानासमोर फळभाज्या व विक्रेते बसतात. हा सर्व भाग गजबजलेला असतो. नोकरी धंद्यासाठी परप्रांतीयांची गर्दी या ठिकाणच्या मोकळ्या जागेत असते. त्यापैकी कोणीतही या रकमेवर डल्ला मारला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या बँकेत कोणतीच सुरक्षा व्यवस्था अथवा सुरक्षा रक्षकही नाही. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेलेे नाहीत असे पोलिसांना आढळून आले आहे.


चोरीबाबत पोलिसही बुचकळ्यात!
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यंानी बँकेत येऊन पाहणी केली व त्यांनी एकंदर प्रकाराबाबत संशय व्यक्त केला. अधीक्षक ऍलन डिसा यांच्या म्हणण्याप्रमाणे जेथून बॅग नाहीशी झाल्याचे सांगितले जाते तो भाग आतील आहे. तेथे बाहेरचा कोणी इसम जाणे शक्य वाटत नाही. बाहेरून कोणी तेथे घुसून, खाली वाकून, बॅग उचलून पळून जाणे, ते कोणाच्याही लक्षात न येणे, आरडाओरडा न होणे या न पटणार्‍या बाबी आहेत व म्हणून पोलिस सर्व शक्यता अजमावून पाहात आहेत.

2 comments:

  1. News looks fabricated, please cross check with other newspapers for the correct news.

    ReplyDelete
  2. We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the

    most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi

    offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.


    modeling agencies in Delhi
    modeling agencies
    modeling jobs
    modeling auditions
    model coordinators
    modeling jobs in Delhi

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा