Thursday, 28 April 2011

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

अनेक विषयांवर चर्चेची शक्यता
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार असून त्यात अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. गत विधानसभा अधिवेशनानंतर ही पहिलीच बैठक होणार आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पत्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवल्याने त्याचेही तीव्र पडसाद या बैठकीत उमटतील, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रातील तिलारी धरण प्रकल्पग्रस्तांनी १ मेपासून तिलारीचे पाणी अडवण्याचा इशारा दिला आहे. गोवा सरकारकडून तिलारी प्रकल्पाबाबतच्या सामंजस्य कराराची पूर्तता केली नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याविषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. रिव्हर प्रिन्सेस जहाज हटवण्याचे काम सुरू झाले असले तरी अद्याप अरीहंत शीप ब्रेकर्स कंपनीकडे करार करण्यात आला नाही तसेच या जहाजाचे भंगार त्यात कंपनीला देण्याचाही निर्णय राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतल्याने उद्याच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे कळते. खनिज वाहतूक तथा बेकायदा खाणींवरून विविध ठिकाणी स्थानिकांचा उठाव होत आहे. सरकारने खास खनिज रस्ते तयार करण्याची योजना आखली असून त्याची कार्यवाही सुरू करण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
अर्थसंकल्पातील विविध योजनांची कार्यवाही करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. या योजनांवर विस्तृत चर्चा या बैठकीत करण्यात येणार असल्याचे कळते. शिक्षण हक्क कायद्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवरही या बैठकीत प्रकाश टाकला जाईल. केंद्रीय नियोजन मंडळाने गोव्यासाठी संमत केलेल्या अंदाजपत्रकाची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत आपल्या सहकार्‍यांना देणार आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

1 comment:

  1. We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.


    modeling agencies in Delhi
    modeling agencies
    modeling jobs
    modeling auditions
    model coordinators
    modeling jobs in Delhi

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा