पणजी, दि. १
कळंगुटचे माजी आमदार श्रीकांत केशव मळीक यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. गोवा विधानसभेत एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जनतेच्या समस्यांना वाचा फोडली होती. स्वकष्टातून मोठे झालेले एक आदरणीय व्यक्तित्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. त्यांच्या पार्थिवावर मायणा-पिळर्ण स्मशानभूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुष्पांजली वाहिली.
स्व. मळीक यांच्या पश्चात पत्नी अंजली, पुत्र समीर, दोन कन्या व नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा