पेडणे, दि. ५ (प्रतिनिधी)
ओशेलबाग - धारगळ येथे काल दि. ४ रोजी रात्री दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर पादचार्याचे आज दि. ५ रोजी गोमेकॉत निधन झाले.
पेडणे पोलिसांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ रोजी रात्री ८च्या सुमारास जीए ०३ एफ ००१७ या क्रमांकाच्या मोटरसायकलने जात असताना शाणू राधाकृष्ण परब (२७, रा. मधलावाडा - विर्नोडा) याने ओशेलबाग - धारगळ येथे मुख्य रस्त्यावर संतोष नवलू झोरे (मुळगाव - डिचोली) या इसमाला रस्ता ओलांडताना जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल रस्त्याच्या कडेला २० फूट खाली कोसळली व त्यात शाणू परब जागीच ठार झाला.
जखमी संतोष झोरे याला गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज मंगळवारी त्याचे निधन झाले. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा