मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी)
मडगावात आज (दि. १६) झालेल्या दोन वाहन अपघातांत दोघांना मृत्यू आला असून मृतांपैकी एकाची ओळख पटू शकलेली नाही.
पहिला अपघात पहाटे साडेचारच्या सुमारास कोंब येथे झाला. कोणा अज्ञात वाहनाची धडक बसून एक अनोळखी इसम येथे गंभीर जखमी झाला व नंतर हॉस्पिसियोत त्याला मृत्यू आला. पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
दुसरा अपघात सकाळी सव्वानऊच्या सुमारास पाजीफोंड भागात बीग जी जवळच्या जंक्शनवर घडला. आकेहून येणार्या जीए ०२ यू ६७०८ या पिकअपची धडक मोपेडने रस्ता ओलांडणार्या विष्णू बोरकर (६०) यांना बसली व त्यात ते रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच मरण पावले तर पल्लवी ही त्यांची मुलगी या अपघातात जखमी झाली. तिला हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले आहे. सदर इसम रावणफोंड येथील आहे. पोलिसांनी पंचनामा करून पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा