नवीन निश्चल निवर्तले
मुंबई, दि. १९ : प्रख्यात चित्रपट अभिनेते नवीन निश्चल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पत्नीने २००६ मध्ये आत्महत्या केली होती.
नवीन निश्चल आणि त्यांचे जवळचे मित्र तथा चित्रपट निर्माते, अभिनेते रणधीर कपूर हे दोघेही आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कारने पुण्याकडे जायला निघाले होते. मध्येच निश्चल यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.
रंगीत गे मारणार्यांना दहा वर्षांची सक्तमजुरी
मुंबई, दि. १९ : होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंगीत पाण्याने भरलेले ङ्गुगे मारल्याने गंभीर जखमा होण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता असे ङ्गुगे मारणार्यांविरुद्ध दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा असणारे कलम लावण्याचे आदेश मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबईत होळी आणि रंगपंचमीदिवशी रंगीत पाण्याने भरलेले ङ्गुगे मारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषत: लोकलने प्रवास करणारे प्रवासी हे ङ्गुगे मारणार्यांचे लक्ष्य असतात. यामुळे गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर असे फुगे मारणार्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा असलेले कलम लावण्यात येणार आहे.
दीड लाखाचा चरस जप्त
म्हापसा, दि. १९ (प्रतिनिधी) : अमली पदार्थ मोहिमेअंतर्गत कारवाई करताना हणजुण पोलिसांनी आज आंद्रिया डेनिको सेच्चिओ (४६) या इटालियन नागरिकाकडून सुमारे १ लाख ५६ हजार रुपयांचे २५ ग्रॅम हेरॉईन जप्त केले. यासंबंधी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आंद्रिया याला ताब्यात घेण्यात आले अशी माहिती पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी दिली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा