पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम खाते हे केवळ ‘खातेच’ आहे, या खात्यात प्रचंड भ्रष्टाचार माजला आहे. या खात्याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आपण कमिशन खातो हे या खात्याच्या मंत्र्यांनीच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले असल्यामुळे आता त्याविषयी आणखी पुरावा देण्याची गरजच नाही, अशी घणाघाती टीका आज फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी केली.
कपात सूचनांवर बोलताना चर्चिल आलेमाव यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दामूंनी आज आमदारांनी केलेल्या कामांचे श्रेय उपटणार्या उपटसुंभांवरही तिखट वार केले. सरकारी खात्यात आणि मंत्र्यांकडे खेपा मारून आम्ही कामे मंजूर करून घ्यावयाची आणि या कामांचे उद्घाटन करायला सा. बां. खा. मंत्र्यांनी आपल्या मर्जीतल्या माणसांना बोलवायचे हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला. कुठलीही योजना न बनवता चर्चिल यांनी केलेले पाण्यांच्या टाक्यांचे वाटप हा एक महाघोटाळा असल्याचा दामूंनी पुनरुच्चार केला. कुठलेही काम करण्यासाठी सा. बां. खा. मंत्री पाच - दहा हजारांचे कमिशन मागतात असा त्यांच्यावर सर्रासपणे आरोप केला जात असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा