Sunday, 20 March 2011

थिवी अपघातात एक ठार, एक जखमी

म्हापसा, दि. १९ (प्रतिनिधी): थिवी येथील जुन्या टपाल कचेरीच्या इमारतीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार लक्ष्मण वरक (४५, रा. दोडामार्ग) जागीच ठार झाला तर मागे बसलेला लक्ष्मण शिंदे (भुईपाल - सत्तरी) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक तुळशीदास धावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री माटणे - दोडामार्ग येथे शिमगोत्सवानिमित्त नाट्यप्रयोग पाहण्यासाठी वरील दोघेजण गेले होते. परत येताना रात्री ३.३० च्या सुमारास हा अपघात घडला. त्यात लक्ष्मण वरक हा जागीच ठार झाला. शिंदे याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा