मस्त सराव झाला! टीम इंडियाने किवींना धुतले
चेन्नई, दि. १६ : विश्वचषकापूर्वीच्या पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला दणका दिल्यानंतर बुधवारी टीम इंडियाने दुसर्या सामन्यात न्यूझीलंडलाही चारी मुंड्या चीत करून महास्पर्धा सुरू होण्यापूर्वी मस्त सराव करून घेतला. कर्णधार धोनीने खूप दिवसांनी आपले जुने रूप दाखवत ठोकलेले तुफानी शतक (नाबाद १०८) व त्याला सुरेश रैना (५०), गौतम गंभीर (८९), विराट कोहली (५९) या प्रमुख फलंदाजांची मिळालेली उत्तम साथ भारतीय संघासाठी अतिशय जमेच्या बाजू ठरतील यात शंकाच नाही.
प्रथम फलंदाजी करताना भारताने धोनीच्या तडाखेबाज शतकाच्या जोरावर न्यूझीलंडपुढे ३६० धावांचा महाकाय डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघ २४३ धावांतच गारद झाला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा